TheClearNews.Com
Sunday, April 12, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

Weekly-Horoscope : साप्ताहिक राशीभविष्य १६ ते २२ ऑक्टोबर २०२२ !

जाणून घ्या...कसा असेल तुमचा हा आठवडा !

The Clear News Desk by The Clear News Desk
October 16, 2022
in Uncategorized
0
Share on FacebookShare on Twitter

मेष : सध्या या दिवसात येणारे प्रस्ताव संधी मिळवून देतील. तसेच हे प्रस्ताव स्वीकारायचे की नाही यासाठी कोणताही उशीर करू नका. व्यापारी वर्गाने कलाकुसरीच्या वस्तूंचे भाव जरी वाढले तरी त्यामध्ये गुंतवणूक करायला हरकत नाही. त्यातून फायदाही निश्चित मिळेल. नोकरदार वर्गाच्या मागण्या मान्य होतील. आर्थिक लाभ होईल. राजकीय क्षेत्रात रेंगाळलेली कामे मार्गी लागतील. मित्रमंडळींचे सहकार्य मिळेल. भावंडाशी संवाद जपून करा. घरगुती वातावरण प्रसन्न राहील.

वृषभ : हाती घेतलेले काम पूर्ण होईल. वसुबारस व धनत्रयोदशी दिवशी उत्साह वाटेल. व्यावसायिकदृष्टय़ा भरभराट होईल. पूर्वीपेक्षा सध्या व्यवसायातली परिस्थिती फारच चांगली सुधारलेली असेल. व्यवसायातून मिळणारे उत्पन्न मोठय़ा प्रमाणात असेल. या मिळालेल्या उत्पन्नाची गुंतवणूक मात्र योग्य ठिकाणी करा. नोकरदार वर्गाला बोनस स्वरूपात मिळणारा आर्थिक लाभ समाधानकारक असेल. आर्थिक व्यवहार पूर्ण होतील. राजकीय क्षेत्रात मानाचे स्थान मिळेल. नातेवाईकांच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका. घरगुती वातावरण आनंदी राहील.

READ ALSO

सकारात्मक पत्रकारितेचा गौरव : पत्रकार ईश्वर महाजन यांना “पॉझिटिव्ह जर्नालिझम अवॉर्ड 2025”

शाळेत सोडण्याच्या बहाण्याने नेत विद्यार्थीनीवर अत्याचार

मिथुन : वसुबारस व धनत्रयोदशी या दिवशी सर्वासोबत मिळून-मिसळून सणावाराचा आनंद लुटाल. व्यावसायिकदृष्टय़ा वाटणारी हुरहुर कमी होईल. व्यावसायिकदृष्टय़ा पळापळ होईल. वेळेचे भान राहणार नाही. प्रगतीचा टप्पा पार पाडाल. नोकरदार वर्गाला वरिष्ठांकडून विशेष लाभ मिळेल. आर्थिकदृष्टय़ा फायद्याचे प्रमाण वाढेल. सामाजिक माध्यमांद्वारे केलेल्या जाहिरातीचा फायदा होईल. कौटुंबिक सौख्य मिळेल. मानसिक समाधान लाभेल. प्रकृती ठणठणीत राहील.

कर्क : वसुबारस व धनत्रयोदशी हे दिवस उत्साहाने साजरे कराल. व्यावसायिकदृष्टय़ा मोठी गुंतवणूक करण्यास हरकत नाही. मात्र उधारीचा व्यवहार करू नका. तरच व्यावसायिक वाटचाल यशस्वी राहील. नोकरदार वर्गाची कुचंबणा कमी होईल. आर्थिकदृष्टय़ा खर्च कमी करा. राजकीय क्षेत्रात सध्या बोलण्याच्या भरात नको ती जबाबदारी घेऊ नका. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. जोडीदाराला मदत कराल. दिनांक १६,१७ असे हे दोन दिवस कितीही शांत राहण्याचा प्रयत्न केला तरीही समोरून भांडणासाठीच आव्हान येईल. मात्र या आव्हानाला बळी पडू नका. हे दोन दिवस संयम ठेवून राहिले तर भांडणाचा प्रश्न येणारच नाही. बाकी दिवस चांगले असतील.

सिंह : दिनांक १८, १९ रोजी स्पष्ट बोलल्याने काही गोष्टी अंगलट येऊ शकतात. तेव्हा स्पष्ट न बोललेले चांगले. ज्या गोष्टीचा तुमचा काहीही संबंध येत नाही तिथे स्वत:हून काही गोष्टी ओढवून घेऊ नका. बाकी दिवस चांगले जातील. वसुबारस व धनत्रयोदशी हे दोन दिवस उत्तम असतील. वनस्पतीजन्य व्यवसायात मालाची साठवणूक जास्त प्रमाणात करणे टाळा. आवश्यक तेवढय़ा मालाची साठवणूक करा. खरेदी-विक्री करताना उधारी करणे टाळा. नोकरदार वर्गाला नवीन कामाची सुरुवात करावी लागेल. आर्थिकदृष्टय़ा खर्च आटोक्यात ठेवा.

कन्या : दिनांक २०, २१, २२ रोजी असे हे तीन दिवस चांगले कसे जातील. याकडेच लक्ष द्या. कारण या तीन दिवसांत विनाकारण एखादी व्यक्ती तुमच्या वैयक्तिक गोष्टीत ढवळाढवळ करू शकते. हे तुमच्या मनाला पटणारे नसेल. तुम्ही त्या व्यक्तीसोबत हुज्जत घालायला जाऊ नका. हे तीन दिवस सोडले तर बाकी दिवस चांगले जातील. वसुबारस, धनत्रयोदशी या दिवशीही तुमचे कामकाज व्यस्तच राहील. व्यवसायात परिश्रम वाढवा. त्याचा फायदाही वाढणारा असेल. नोकरदार वर्गाने कामाव्यतिरिक्त इतर गोष्टीत लक्ष देऊ नका. आर्थिक व्यवहार जपून करा.

तूळ : प्रत्येक कामात येणाऱ्या अडचणी कमी होतील. आपले मत इतरांना पटवून देण्यात यश मिळेल. वसुबारस व धनत्रयोदशी हे दोन दिवस अगदी आनंदाचे जातील. व्यवसायातील कोणतेही धाडसी निर्णय परिस्थिती बघून घ्याल. केलेली गुंतवणूक नफा मिळवून देईल. नोकरदार वर्गाला कामासाठी जास्त वेळ द्यावा लागेल. आर्थिक लाभ होईल. समाजसेवा करण्याचा मोह निर्माण होईल. मित्रमंडळींसोबत करमणूक घडेल. संततीची काळजी मिटेल. नातेवाईकांच्या भेटीगाठी होतील.

वृश्चिक : वसुबारस व धनत्रयोदशी या दिवशी ज्येष्ठांचे मार्गदर्शन मिळेल. हे मार्गदर्शन तुमच्यासाठी मोलाचे ठरेल. व्यापारी वर्गाने बाजारपेठेचा अंदाज घेऊन गुंतवणूक करा. व्यावसायिकदृष्टय़ा प्रगती होईल. नोकरदार वर्गाची पतप्रतिष्ठा वाढेल. आर्थिक आवक वाढेल. राजकीय क्षेत्रातील अस्थिरता कमी होईल. दिनांक १६, १७ हे दोन दिवस कोणतेही निर्णय घाईत घेऊ नका. स्वत:ला ज्या गोष्टी योग्य वाटतात त्याच करा. मात्र त्यासाठी कोणाशी वाद घालू नका. हे दोन दिवस शांततेत पार पाडा. बाकी दिवसांचा कालावधी चांगला जाईल.

धनू : वसुबारस व धनत्रयोदशी या दोन दिवशी प्रसन्नता वाटेल. व्यावसायिक पाश्र्वभूमी उत्तम राहील. मोठय़ा योजना हाती येतील. व्यवसायाला चालना मिळेल. नोकरदार वर्गाचा भाग्योदय होईल. आर्थिक बाबतीत इतरांकडून उधारी करणे टाळा. दिनांक १८, १९ रोजी अरेरावी न करता शांतपणे आपले विचार मांडा. यातच तुमचा फायदा असेल. तुमच्या मनाला कितीही वेदना होत असल्या तरी त्या स्पष्टपणे बोलून दाखवू नका. त्यामुळे होणाऱ्या कामांना अडथळा निर्माण होईल. हे दोन दिवस पुढे ढकलतच राहा. बाकी दिवस चांगले जातील.

मकर : या आठवड्यात क्रोधावर नियंत्रण ठेवा. इतरांचे मत नाही पटले तरी शांत राहा. वसुबारस व धनत्रयोदशी हे सणासुदीचे दिवस आनंदाने साजरे करा. व्यवसायात फार मोठी गुंतवणूक करू नका. कर्ज काढून व्यवसाय वाढवू नका. व्यावसायिक परिस्थिती स्वीकारण्याचा प्रयत्न करा. नोकरदार वर्गाला संयम ठेवून वागावे लागेल. आर्थिक बाबतीत खर्च जपून करा. राजकीय क्षेत्रात हस्तक्षेप करणे टाळा. घरगुती वातावरण बिघडू देऊ नका. आरोग्याची काळजी घ्या.

कुंभ : चांगल्या गोष्टींसाठी स्वत:मध्ये बदल करावे लागतील. बाकी दिवसांचा कालावधी चांगला असेल. वसुबारस व धनत्रयोदशी हे दोन दिवस जोडीदाराला सणासुदीनिमित्त मदत कराल. व्यवसायात इतरांच्या सल्ल्याने स्वत:चे मत ठरवू नका. व्यवसायातील किमती वस्तूंची जबाबदारी कोणावर सोपवू नका. नोकरदार वर्गाची धावपळ कमी होईल. आर्थिक बाबतीत नियोजनाला महत्त्व द्या. राजकीय घडामोडीत होणारे बदल स्वीकारावे लागतील. मित्र परिवाराशी जेवढय़ास तेवढे राहा. कुटुंबाशी एकनिष्ठ राहा.

मीन : दिनांक २० , २१ , २२ असे हे तीन दिवस शब्दाने शब्द वाढणार आहे. काही कारण नसताना विनाकारण कोणी तुमच्या वाटय़ाला गेल्यास तुम्ही त्याचा सोक्षमोक्ष लावल्याशिवाय राहणार नाही. मात्र हे त्रासाचे राहील. हे तीन दिवस डोक्यावर बर्फ तोंडात खडीसाखर असेच सूत्र लक्षात ठेवा. नेमकेच वसुबारस व धनत्रयोदशी ही याच दिवसात असणार आहे. सणासुदीचा आनंद सोडून नको त्या भानगडीत पडू नका. स्वत:ला कसे आनंदी ठेवता येईल हेच बघा. व्यवसायात कोणताही अंदाज वर्तवणे टाळा.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

Uncategorized

सकारात्मक पत्रकारितेचा गौरव : पत्रकार ईश्वर महाजन यांना “पॉझिटिव्ह जर्नालिझम अवॉर्ड 2025”

March 16, 2026
Uncategorized

शाळेत सोडण्याच्या बहाण्याने नेत विद्यार्थीनीवर अत्याचार

March 6, 2026
Uncategorized

भुसावळ अमृत पाणीपुरवठा योजनेच्या रखडलेल्या कामावरून एकनाथराव खडसे आक्रमक; विधान परिषदेत सरकारला धारेवर धरले

March 1, 2026
Uncategorized

वासुदेव जेष्ठ नागरिकासंघाचे सवलतीत तीर्थाटन

March 1, 2026
Uncategorized

दहावी–बारावीच्या परीक्षांसाठी कॉपीमुक्त व भयमुक्त वातावरण राखण्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे विद्यार्थ्यांना आवाहन

February 9, 2026
Uncategorized

अल्पवयीन मुकबधीर मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला २० वर्षांची शिक्षा

January 18, 2026
Next Post

जळगावात ६१ वर्षीय वृद्धाने केला महिलेचा विनयभंग ; गुन्हा दाखल !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

पूरस्थितीमुळे बाधित ९ जिल्ह्यांसाठी ७७४ कोटीची मदत : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

October 27, 2021

खळबळजनक : कारवर लघुशंका करताना हटकले ; सुरक्षा रक्षकाला जिवंत पेटवले !

November 18, 2020

दुचाकीला ट्रकची जोरदार धडक ; दोन वर्षाची चिमुकली जागीच ठार !

September 21, 2022

1xbet Казино 【официальный Сайт】 Регистрация, Вход В Рабочее Зеркало ᐈ 1хбет Казино

August 10, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group