मेष : आपल्या वैवाहिक जोडीदाराची प्रकृती बिघडून ते आजारी पडण्याची संभावना आहे. त्यामुळे वैवाहिक जीवनात काही समस्या निर्माण होऊ शकतात. नोकरीत आपणास चांगला पगार मिळण्याची संभावना आहे. त्यामुळे आपली पगारवाढ संभवते. आपण जर व्यापार करत असाल तर पूर्वी केलेल्या प्रयत्नांचा लाभ मिळेल. एखाद्या महिला मित्रामुळे आपल्या व्यापारात लाभ संभवतो. विद्यार्थ्यांवर ह्या आठवड्यात अभ्यासाचा ताण राहील. अशा परिस्थितीत त्यांना आपली मेहनत वाढवावी लागेल. ह्या आठवड्यात आपण आरोग्या विषयी काहीसे चिंतीत राहाल.
वृषभ : काही समस्या आपली वाट पहात असल्याने आपणास त्यांना सामोरे जाण्यास तयार राहावे लागेल. नोकरीत सुद्धा चढ – उतार येतील. त्यामुळे आपल्या कामाच्या पद्धतीत बदल घडून येईल. नोकरीच्या बाबतीत आपण काहीसे चिंतीत व्हाल. व्यापारात यश प्राप्ती होईल. आपण एखादे कर्ज घ्याल, परंतु ते फेडताना समस्या येऊ शकतात. तेव्हा सावध राहून गरजे इतकेच कर्ज घ्यावे. हा आठवडा विद्यार्थ्यांसाठी चढ – उतारांचा आहे. त्यांना अभ्यासाकडे अतिरिक्त लक्ष देण्याची गरज भासेल. ह्या आठवड्यात आपणास आपल्या प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल.
मिथुन : विवाहितांचे वैवाहिक जीवन आनंदाने भरलेले असेल. आपणास आपल्या जोडीदाराचे पूर्ण सहकार्य मिळेल. त्यामुळे आपले वैवाहिक जीवन अधिक चांगले होईल. हा आठवडा नोकरी करणाऱ्यांसाठी अनुकूल आहे. कार्यक्षेत्री आपल्या वरिष्ठांना प्रभावित करण्यात आपण कोठेही कमी पडणार नाही. व्यापाऱ्यांना सुद्धा आपल्या कामात चांगली स्थिती असल्याचे दिसू लागेल. आपली मेहनत यशस्वी झाल्याने आपल्या व्यापाराची व्याप्ती वाढेल. विद्यार्थी मन लावून अभ्यास करतील.
कर्क : आठवड्याच्या सुरवातीस आपणास कौटुंबिक जीवनातील तणावास सामोरे जावे लागू शकते. कुटुंबियात काही वाद संभवतात. त्याचा प्रभाव आपल्या कामगिरीवर सुद्धा होईल. तेव्हा सावध राहून कामे करावीत, जेणे करून कामात गोंधळ होणार नाही. आपल्या सहकाऱ्यांशी नीट वागावे. कोणालाही आपल्या विषयी तक्रार करण्यास वाव असणार नाही याची काळजी घ्यावी. व्यापाऱ्यांसाठी आठवडा चढ – उतारांचा आहे. सध्या कोणतीही नवीन गुंतवणूक करू नये. आपल्या व्यापारास चोहो बाजूने सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न करावा. सध्या जुन्या योजनांची अंमल बजावणी करण्याचा विचार करू शकता. त्याचा आपणास फायदा होऊ शकतो.
सिंह : नोकरीच्या ठिकाणी सहकाऱ्यांशी नीट वागा. त्याचा फायदा आगामी काळात आपणास बघावयास मिळेल. व्यापाऱ्यांना समजूतदारपणा दाखवावा लागेल. घाईघाईत कोणतेही असे कृत्य करू नका कि ज्यामुळे ते आपल्या अंगाशी येईल. कोर्ट – कचेरीच्या बाबतीत सावध राहावे. व्यापारात पारदर्शकता ठेवावी. विद्यार्थ्यांचे अभ्यासात मन रमेल. त्यांना त्यांच्या मेहनतीचे यथोचित फळ मिळेल. हा आठवडा आरोग्याच्या दृष्टीने चांगला आहे. असे असले तरी आपणास आपल्या आहारावर नियंत्रण ठेवावे लागेल.
कन्या : ह्या आठवड्यात आपल्या खर्चात वाढ होईल. प्राप्ती सामान्यच राहील. आपणास आपल्या पैश्यांचा सदुपयोग करण्यावर लक्ष केंद्रित करावे लागेल. कोणालाही कटू शब्द बोलू नये, अन्यथा कौटुंबिक संबंधात दुरावा निर्माण होऊ शकतो. नोकरी करणाऱ्यांसाठी आठवडा अनुकूल आहे. प्रयत्न करूनच आपण यशस्वी होऊ शकाल. एखाद्या दुसऱ्या खात्यात आपली बदली होण्याची संभावना आहे. आपल्या कामात एक लाभदायी स्थिती निर्माण झाली होती त्यात आता काहीशी कमतरता येईल. असे असून सुद्धा आपण कामाचा आनंद घेऊ शकाल. विद्यार्थ्यांना ह्या आठवड्यात अभ्यासातील समस्यांना सामोरे जावे लागेल.
तूळ : ह्या आठवड्यात आपण एखाद्या व्यक्तीच्या प्रेमात पडण्याची शक्यता असल्याने त्या पासून दूर राहण्याचा प्रयत्न करावा, अन्यथा वैवाहिक जीवनातील आव्हाने वाढतील. जोडीदाराशी उत्तम समन्वय साधण्याचा प्रयत्न करावा. आपणास जर आपल्या प्रेमिकेशी विवाहबद्ध व्हावयाचे असेल तर थोडी वाट बघा. हा आठवडा त्यासाठी प्रतिकूल आहे. नोकरीत चढ – उतार येतील. उत्तम कामगिरी करण्याचा प्रयत्न करावा, अन्यथा नोकरीत बदल होण्याची किंवा नोकरी जाण्याची सुद्धा संभावना आहे. व्यापारासाठी आठवडा खूपच अनुकूल आहे. आपणास एखाद्या मित्राचा पाठिंबा मिळेल कि ज्यामुळे आपणास व्यापारात यश प्राप्त होईल.
वृश्चिक : आपला अडकलेला पैसा सुद्धा ह्या आठवड्यात आपणास मिळू शकतो. आपण बँकेचे किंवा इतर कोणत्याही प्रकारचे कर्ज फेडण्यात यशस्वी होऊ शकाल. ह्या आठवड्यात आपणास नोकरीवर लक्ष केंद्रित करावे लागेल. लक्ष विचलित झाल्यामुळे नोकरीत समस्या येऊ शकतात. त्यामुळे कामात गोंधळ होण्याची संभावना वाढेल. व्यापारासाठी आठवडा अनुकूल आहे. आपल्या कामावर लक्ष केंद्रित करून ते चांगल्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न करावा, जेणे करून हा आठवडा आपल्यासाठी चांगला ठरू शकेल. ह्या आठवड्यात विद्यार्थ्यांची कामगिरी उत्तम होईल.
धनु : नोकरी करणाऱ्यांना आपल्या सहकाऱ्यांच्या त्रासाला सामोरे जावे लागू शकते. ते आपणास खाली मान घालावयास लावण्याचा प्रयत्न करू शकतील. तसेच आपल्या कामात गोंधळ निर्माण करण्याचा प्रयत्न सुद्धा करू शकतील. तेव्हा सावध राहावे. ह्या आठवड्यात विद्यार्थ्यांची कामगिरी उत्तम होईल. स्पर्धेत सुद्धा यशस्वी होण्याची संभावना आहे. आरोग्याच्या दृष्टीने हा आठवडा चढ – उतारांचा आहे. खांदेदुखी व सांधेदुखीचा त्रास संभवतो.
मकर : ह्या आठवड्यात आपण एखादे उपकरण खरेदी करू शकता. नोकरी करणाऱ्यांना कामाकडे लक्ष द्यावे लागेल. निष्काळजीमुळे आपणास ताकीद मिळू शकते, तेव्हा सावध राहावे. व्यापाऱ्यांसाठी आठवडा अनुकूल असला तरी शासना विरुद्ध काम करणे त्यांच्यासाठी नुकसानदायी ठरू शकते. विद्यार्थ्यांना अभ्यास करण्याची इच्छा होईल. ते अभ्यासावर आपले लक्ष केंद्रित करण्यात यशस्वी होऊ शकतील. ह्या आठवड्यात आपणास आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. आपण जर आरोग्याकडे दुर्लक्ष केले तर आपण आजारी पडण्याची संभावना आहे.
कुंभ : ह्या आठवड्यात आपणास नशिबाची साथ मिळेल, त्यामुळे कामे यशस्वी होतील. आपण आपली कामे लवकरात लवकर पूर्ण करण्याचा प्रयत्न कराल. एखादा दूरवरचा प्रवास सुद्धा करू शकाल. नोकरी करणाऱ्यांसाठी आठवडा अनुकूल आहे. असे असले तरी आपणास मेहनत करावीच लागेल. व्यापाऱ्यांना आपल्या मेहनतीचे चांगले फळ मिळेल. आपण खूपच मेहनत कराल, त्यामुळे आपली गणना चांगल्या लोकात होऊ लागेल. विद्यार्थ्यांना आपले संपूर्ण लक्ष अभ्यासावर केंद्रित करावे लागेल. काही लोकांची संगत आपल्या अभ्यासात अडथळा निर्माण करण्याची संभावना आहे
मीन : आठवड्याची सुरवात आपल्यासाठी काहीशी प्रतिकूल असू शकते. परंतु आठवड्याच्या सुरवाती नंतरचे दिवस आपल्यासाठी चांगले होऊ शकतील. नोकरी करणाऱ्या व्यक्ती आपल्या कामाने संतुष्ट होतील व त्यांना यश सुद्धा प्राप्त होईल. व्यापाराची वृद्धी करण्यासाठी आठवडा अनुकूल आहे. आपल्या प्रयत्नांना गती द्यावी, म्हणजे आपला व्यापार सुद्धा गतिमान होईल. विद्यार्थ्यांना अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्यात काही अडचणी येतील. त्यामुळे त्यांच्या अभ्यासात खंड पडू शकतो. आठवड्याच्या सुरवातीस आपणास मानसिक तणाव दूर करण्याचा प्रयत्न करावा लागेल, अन्यथा आपली प्रकृती बिघडण्याची संभावना आहे.