TheClearNews.Com
Sunday, February 22, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

Weekly Horoscope : साप्ताहिक राशीभविष्य १ ते ७ ऑक्टोबर २०२३ !

जाणून घ्या...कसा असेल तुमचा आठवडा !

The Clear News Desk by The Clear News Desk
October 1, 2023
in Uncategorized
0
Share on FacebookShare on Twitter

मेष : आठवड्याच्या सुरुवातीला तुम्हाला आर्थिक समस्यांनाही सामोरे जावे लागू शकते. काही विशेष कामासाठी पैसे उधार घ्यावे लागतील. व्यापारी लोकांचे पैसे बाजारात अडकू शकतात. किरकोळ खर्च होतील. नोकरी करणाऱ्या व्यक्तींसाठी आठवडा अनुकूल आहे. व्यापारात किरकोळ चढ – उतार आले तरी सुद्धा व्यापार उत्तम झाल्याने व्यापाऱ्यांना हा आठवडा चांगला जाईल. सप्ताहात सर्व दिवसांचे वातावरण अनुकूल असेल. ज्या सप्ताहात वातावरण अनुकूल असते त्यावेळी कोणत्याही गोष्टीसाठी संघर्ष करावा लागत नाही.

वृषभ : आपल्या कामाव्यतिरिक्त इतर कोणाकडे लक्ष देऊ नका. त्यामुळे हा त्रास होणार नाही. बाकी दिवसांचा कालावधी चांगला असेल. व्यवसायात फायदा आहे. वायफळ खर्च टाळा. कुटुंबासाठी वेळ द्याल. जोडीदार आनंदी असेल. धार्मिक गोष्टीत मन रमेल. व्यवसायाशी संबंधित व्यवहार काळजीपूर्वक करा, अन्यथा तुम्हाला आर्थिक नुकसान सहन करावे लागू शकते. आठवड्याच्या उत्तरार्धात तुमच्यामध्ये खूप आळशीपणा राहील.प्रेमीजनांसाठी हा आठवडा काहीसा प्रतिकूल आहे. आपली प्रेमिका आपल्या पासून दुरावली जाऊ नये म्हणून त्यांना विचारपूर्वक पाऊल उचलावे लागेल.

READ ALSO

दहावी–बारावीच्या परीक्षांसाठी कॉपीमुक्त व भयमुक्त वातावरण राखण्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे विद्यार्थ्यांना आवाहन

अल्पवयीन मुकबधीर मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला २० वर्षांची शिक्षा

मिथुन : कौटुंबिक जीवनात तणाव वाढू शकतो. वाद संभवतात. वैवाहिक जोडीदाराशी संबंध ठीक राहतील. नोकरीच्या ठिकाणी काही अडचणी वाढतील. विरोधक डोके वर काढतील. व्यापारासाठी आठवडा अनुकूल आहे. व्यवसायाशी संबंधित लोकांना अपेक्षित लाभ मिळेल. जे लोक अनेक दिवसांपासून आपला व्यवसाय वाढवण्याचा विचार करत होते, त्यांची इच्छा या आठवड्यात पूर्ण होऊ शकते. विशेष म्हणजे यामध्ये त्यांना त्यांच्या नातेवाईकांचा पूर्ण पाठिंबा मिळेल. अनोळख्या व्यक्तीशी दोन हात लांब राहा. कोणतेही काम करताना नियोजनाला महत्त्व द्या. त्यामुळे कामातील अडचणी कमी होतील.

कर्क : बेकायदेशीर गोष्टींना थारा देऊ नका. नियमांचे पालन करा. बाकी दिवसांचा कालावधी चांगला असेल. व्यवसायिकदृष्टय़ा सक्षम कसे बनता येईल या दृष्टीने प्रयत्न वाढवा. नोकरदार वर्गाला कामाचा व्याप वाढता राहील. खर्च जपून करा. आपल्या सासुरवाडी कडील मंडळी सुद्धा आपले वैवाहिक जीवन सुखद करण्यात आपणास पूर्ण सहकार्य करतील. त्याच बरोबर आपल्या कुटुंबियांची मानसिकता सुद्धा सहकार्य करण्याचीच राहील. एखाद्या तीर्थक्षेत्राच्या यात्रेला जाण्याची शक्यता राहील. आठवड्याच्या उत्तरार्धात नोकरीच्या दिशेने केलेले प्रयत्न सकारात्मक परिणाम देतील.

सिंह : नोकरीत धावपळ होईल. त्याच बरोबर आपणास आपली वागणुक नियंत्रित ठेवावी लागेल. काही लोकांशी आपला वाद संभवतो. ह्या व्यक्ती आपल्या वरिष्ठांच्या जवळच्या असतील, तेव्हा सावध राहावे. हा आठवडा वैवाहिक जीवनासाठी अनुकूल आहे. आठवड्याचे सुरवातीचे दिवस प्रवासास अनुकूल आहेत. उधारीचे व्यवहार पूर्ण होतील. नोकरदार वर्गाला नवीन कामाची जबाबदारी मिळेल. आर्थिक परिस्थिती समाधानाची असेल. आठवड्याच्या उत्तरार्धाच्या काळात तुमचा कोणताही जुना आजार पुन्हा उद्भवू शकतो किंवा तुम्ही संसर्गजन्य आजाराला बळी पडू शकता.

कन्या : व्यापारात काही नवीन सौदे आपली वाट बघत असतील. आपणास फक्त डोके शांत ठेवून काम करावे लागेल. विवाहित व्यक्तीने वैवाहिक जीवनातील तणाव वाढू न देण्याची खबरदारी घ्यावी. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा सर्जनशीलतेची संधी निर्माण करणारा आहे. आठवड्याच्या उत्तरार्धात काही धार्मिक-सामाजिक कार्यात सहभागी होण्याची संधी मिळेल. मान-सन्मानात वाढ होईल. या काळात तुम्हाला तुमच्या मुलाशी संबंधित काही चांगली बातमी ऐकायला मिळेल. स्वत:च्या कामाची जबाबदारी इतरांवर टाकली तर ती कामे पूर्ण होणार नाहीत. त्यामुळे दुरावा निर्माण होऊ शकतो. त्यापेक्षा तुमचे काम तुम्ही स्वत: करा.

तूळ : व्यवसायात चाललेल्या घडामोडीत अचानक बदल करू नका. नोकरदार वर्गाला कामामध्ये जास्त लक्ष केंद्रित करावे लागेल. आर्थिकबाबतीत व्यवहार जपून करा. सार्वजनिक ठिकाणी हस्तक्षेप करणे टाळा. नातेवाईकांच्या सुखदु:खात सहभागी व्हाल. कोणतेही बेकायदा काम करू नये. अन्यथा आपणास त्रास होऊ शकतो. खर्चात वाढ होईल. आपली प्रकृती सुद्धा बिघडू शकते. नोकरी करणाऱ्या महिलांना घर आणि कामाच्या ठिकाणी संतुलन राखण्यात अडचणी येऊ शकतात. व्यवसायाशी संबंधित लोकांनी घाईघाईने कोणतेही मोठे पाऊल उचलणे टाळावे .

वृश्चिक : आठवड्याच्या उत्तरार्धात कुटुंबात काही शुभ घटना घडू शकतात, ज्यामध्ये दीर्घ काळानंतर तुम्हाला तुमच्या नातेवाईकांना भेटण्याची आणि त्यांच्यासोबत आनंदाने वेळ घालवण्याची संधी मिळेल. आठवड्याचा अखेरचा दिवस प्रवासास अनुकूल आहे. विद्यार्थ्यांना मेहनत वाढवावी लागेल. व्यापाऱ्यांसाठी आठवडा अनुकूल आहे. त्यांच्या योजना यशस्वी झाल्याचा त्यांना लाभ होईल. ह्या आठवड्यात विवाहितांचे वैवाहिक जीवन सुद्धा सुखद होईल. प्रत्येक गोष्टीत संयम ठेवावा लागेल. मागील काही गोष्टींवर चर्चा करून व्याप वाढवून घेऊ नका. गोष्टी अंगलट येऊ शकतात.

धनु : मित्रांसह मौज मजा करण्याची संधी मिळेल. एखादे धार्मिक पुस्तक किंवा एखादी मूर्ती खरेदी करून घरी आणू शकता. व्यापारासाठी सुद्धा आठवडा अनुकूल आहे. ह्या आठवड्याचा सदुपयोग करून विद्यार्थी आपल्या कामगिरीत सुधारणा करू शकतील. नोकरदार वर्गाला वेळेचे बंधन पाळावे लागेल. वायफळ खर्च टाळा. मुलांचे लाड जेवढय़ास तेवढे करा. कोणतेही काम करताना जोडीदाराला विश्वासात घ्या. आठवड्याच्या उत्तरार्धात तुमचे विरोधक सक्रिय होतील आणि तुम्हाला तुमच्या ध्येयापासून दूर करण्याचा प्रयत्न करू शकतात.

मकर : आपले मत इतरांवर लादण्याचा प्रयत्न करू नका. त्यामुळे नात्यात दुरावा निर्माण होऊ शकतो. आळस झटकून कामाला लागा. नोकरदार वर्गाला वरिष्ठांच्या काही गोष्टी नाही पटल्या तरी त्या पटवून घ्याव्याच लागतील. वडिलोपार्जित मालमत्तेबाबत काही वाद सुरू असतील तर ते वरिष्ठ किंवा प्रभावशाली व्यक्तीच्या मदतीने सोडवले जातील. संतती सौख्य लाभेल. कौटुंबिक वादविवाद करू नका. व्यापारी वृत्तीमुळे आपण उत्तम धनार्जन करू शकाल. वैवाहिक जीवनात गोड बोलण्याने व प्रेमाने आपण आपल्या जोडीदाराच्या हृदयात आपले स्थान अधिक दृढ करू शकाल.

कुंभ : सरकारी क्षेत्राकडून असलेला तणाव वाढू शकतो तेव्हा सावध राहावे. विद्यार्थ्यांना त्यांनी आजवर दुर्लक्षिलेल्या विषयांवर लक्ष केंद्रित करावे लागेल. व्यवसायाशी संबंधित लोकांनी या काळात आर्थिक व्यवहारात खूप सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे, अन्यथा आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. कोणत्याही धोकादायक योजनेत गुंतवणूक करणे टाळा. आठवड्याच्या सुरवाती पासून ते मध्या पर्यंतचे दिवस प्रवासास अनुकूल आहेत. कितीही प्रयत्न करून ज्या कामांमध्ये विलंब लागायचा त्या कामाला आता विलंब लागणार नाही.

मीन : जाणून घ्या…कसा असेल तुमचा आठवडा !स्वत:च्या कामात मग्न राहाल. उद्योगधंद्यातील तांत्रिक अडचणी कमी होऊ लागतील. व्यवसायात यशस्वी वाटचाल राहील. गुंतवणूक मोठय़ा प्रमाणात कराल. व्यापारी लोकांसाठी आठवड्याचा मध्य भाग अतिशय शुभ राहील. या काळात भागीदारीत व्यवसाय करणाऱ्यांना विशेष लाभ मिळेल. नोकरदार वर्गाला नवीन कामाची जबाबदारी मिळेल. आर्थिक प्रश्न मार्गी लागतील. विवाहितांच्या वैवाहिक जीवनात काहीसा तणाव असल्याचे दिसून येईल. अशा स्थितीत जोडीदाराची मनःस्थिती बघून संवाद साधणे उचित ठरेल.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

Uncategorized

दहावी–बारावीच्या परीक्षांसाठी कॉपीमुक्त व भयमुक्त वातावरण राखण्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे विद्यार्थ्यांना आवाहन

February 9, 2026
Uncategorized

अल्पवयीन मुकबधीर मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला २० वर्षांची शिक्षा

January 18, 2026
Uncategorized

ग्रामीण भागाचा चेहरामोहरा बदलणारा विकास हाच केंद्रबिंदू – पालकमंत्री गुलाबराव पाटील

January 17, 2026
Uncategorized

शेतकऱ्यांना दिलासा : कापसावर आयात शुल्क लागू होताच दर वाढले

January 4, 2026
Uncategorized

जगातील प्रभावशाली नेतृत्त्व म्हणजे गांधी विचार – डॉ. के. बी. पाटील

November 9, 2025
Uncategorized

मोबाईल नंबर अपडेट करा, वीजसेवेचे ‘एसएमएस’ मिळवा!

July 16, 2025
Next Post

जळगाव महानगरपालिकेच्या नाविन्यपूर्ण प्रोजेक्टचे सोमवारी लोकार्पण !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

फ्रान्स येथे आयोजित जागतिक कौशल्य स्पर्धेत सहभाग नोंदविण्याचे आवाहन !

December 8, 2023

बिहार निवडणुकीत ना. गुलाबराव पाटील यांची तोफ धडाडणार !

October 8, 2020

नेहरू युवा केंद्रातर्फे आशा फाउंडेशन संस्थेकडून एचआयव्ही एड्स या विषयावर चित्रकला स्पर्धा उत्साहात !

February 4, 2021

हृदयविकाराच्या झटक्यानंतर कपिल देव यांची पहिली प्रतिकिया

October 24, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group