मेष : एकाच गोष्टीवर अडून बसू नका. पर्यायी मार्ग शोधा. मनोबल व आत्मविश्वास कमी राहील. आर्थिक बचत करणे योग्य राहील. आपले मनोरंजन व करमणुकीकडे विशेष लक्ष असणार आहे. व्यवसायात खरेदी विक्रीचे व्यवहार करताना भावनिक गोष्टी टाळा. काहींचे दिवस आरामात जातील. प्रवासात व वाहने चालविताना काळजी घ्यावी. राजकीय, सामाजिक क्षेत्रात जुन्या अनुभवांचा उपयोग नव्या पद्धतीने करावा लागेल.
वृषभ : कोणतेही व्यवहार करताना भावनिक गोष्टी टाळा. आपल्या कुटुंबासाठी व आपल्या प्रिय व्यक्तीसाठी वेळ देणार आहात. अनेकांशी सुसंवाद साधाल. प्रत्येक गोष्टीत संयम ठेवा. मनोबल व आत्मविश्वास उत्तम राहील. काहींना अचानक धनलाभ संभवतो. विचारपूर्वक वागा. आरोग्याची काळजी घ्या. विविध लाभ होतील. नोकरीत व्याप वाढला तरी वर्चस्व राहील. धंद्यात दगदग, धावपळ वाढेल. वसुली करा.
मिथुन : आपले काम भले नि आपण भले हे सूत्र लक्षात ठेवा. आपल्याला विशेष अनुकूलता लाभणार आहे. आपली सर्व कामे विनासायास पूर्ण होणार आहेत. व्यवहार करताना घाई करू नका. व्यवसायात प्रगती होईल. सौख्य व समाधान लाभेल. प्रवासाचे योग येणार आहेत. समाजसेवेची आवड राहील. तुमचा प्रभाव राहील. राजकीय, सामाजिक क्षेत्रात वरिष्ठांना मदत करावी लागेल.
कर्क : व्यावसायिकदृष्ट्या गुंतवणूक फायद्याची ठरेल. जिद्दीने व चिकाटीने कार्यरत राहाणार आहात. नातेवाइकांच्या गाठीभेटी पडतील. आर्थिक चणचण भासणार नाही. आरोग्य उत्तम राहील. मनोबल व आत्मविश्वास वाढविणारी एखादी घटना घडेल. नोकरदार वर्गाला वरिष्ठांची शाब्बासकी मिळेल. प्रवास सुखकर होणार आहेत. नोकरीच्या ठिकाणी कामात चूक होण्याची शक्यता.
सिंह : व्यवसायात आलेले प्रस्ताव चांगले असतील. कुटुंबातील सदस्यांमध्ये सुसंवाद राहील. आपले आरोग्य उत्तम राहील. आर्थिक बचत कराल. नातेवाईकांच्या कार्यक्रमानिमित्त भेटीगाठी होतील. काहींना एखादी गुप्तवार्ता समजेल. मानसिक स्वास्थ्य उत्तम राहील. शेजाऱ्यांना मदत कराल. तुम्हाला मानसिक प्रसन्नता देणारी एखादी घटना घडेल.राजकीय, सामाजिक क्षेत्रात नवे डावपेच रचता येतील.
कन्या : व्यवसायात चाललेल्या घडामोडींत जबाबदारीने पाऊल टाकाल. तुमचा इतरांवर प्रभाव असणार आहे. आपण इतरांना मदत करण्यासाठी तत्पर असणार आहात. आर्थिक नियोजन मार्गी लागेल. मनोबल उत्तम असणार आहे. आपली मते इतरांना पटवून द्याल. राजकीय क्षेत्रात मानाचे स्थान मिळेल. मानसिक प्रसन्नता लाभेल. लाभ होईल. धंद्यात निर्धार करून जम बसेल. कर्जाचे काम करता येईल.
तूळ : कोणत्याही गोष्टीसाठी संघर्ष करावा लागणार नाही. महत्त्वाची कामे पूर्ण होतील. अनावश्यक कामात आपला वेळ जाणार आहे. मनोबल कमी असणार आहे. आर्थिक बाबतीत समाधानाची बाब राहील. काहींची एखाद्या बाबतीत चिडचिड होणार आहे. आर्थिक बाबतीत काळजी घ्यावी. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. काहींचा धार्मिक कार्यात सहभाग वाढेल. राजकीय, सामाजिक भावनेद्वारे तुमचे गुपित काढून घेण्याचा प्रयत्न होईल.
वृश्चिक : तुम्ही शांत राहिलात तर कोणतेही नुकसान होणार नाही. व्यवसायात आवक-जावक उत्तम राहील. प्रियजन भेटणार आहेत. तुमचे मन आनंदी राहील. प्रवास सुखकर होणार आहेत. व्यवसायात आर्थिक लाभ होतील. आर्थिक व्यवहार जपून करा. समाजमाध्यमांचा वापर जेवढ्यास तेवढा करा. तुमचे आर्थिक अंदाज अचूक ठरणार आहेत. मनोबल उत्तम राहील. धंद्यात अतिरेक, राग याने नुकसान होण्याची शक्यता.
धनु : व्यवसायात नवीन काही करण्याचे नियोजन यशस्वी करण्यासाठी धावपळ होईल. प्रवास सुखकर होणार आहेत. तुमच्या आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. सार्वजनिक व सामाजिक कार्यात तुमचा विशेष सहभाग राहील. नोकरदार वर्गाला कामात व्यस्त राहावे लागेल. खर्च जपून करा. वैवाहिक जीवनात सुसंवाद राहील. अनेक बाबतीत अनुकूलता लाभेल. दडपण, दबाव, गैरसमज जाणवेल. नोकरीत वरिष्ठांची मर्जी राखाल.
मकर : व्यवसायातून अपेक्षेपेक्षा जास्त प्रमाणात उत्पन्न मिळेल. जिद्दीने कार्यरत राहाल. नवीन वाढीव कामे करणार आहात. नातेवाइकांचे सहकार्य लाभेल. नोकरदार वर्गाचे काम वेळेत पूर्ण होईल. आर्थिक अडचण जाणवणार नाही. तुम्ही आपले मनोबल सिद्ध करणार आहात. आरोग्याच्या तक्रारी कमी होणार आहेत. प्रवास सुखकर होतील. तात्पुरती अडचणी आहेत वाट पहा. नोकरी टिकवा. रागावर ताबा ठेवा.
कुंभ : व्यवसायात लाभाचे प्रमाण चांगले राहील. मानसिक स्वास्थ्य लाभणार नाही. अनावश्यक चिडचिड टाळावी. मनोबल कमी असणार आहे. राजकीय क्षेत्रात महत्त्वाच्या गोष्टीवर चर्चा होईल. काहींवर अनावश्यक मानसिक ताण तणाव राहणार आहेत. घरगुती वातावरण अनुकूल राहील. प्रवास काळजीपूर्वक करावेत. योजना पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. आर्थिक साहाय्य मिळवा.
मीन : व्यवसायातून मनासारखे उत्पन्न मिळेल. आरोग्य उत्तम राहील. तुमच्यावर असणारा ताण कमी होणार आहे. कुटुंबात असणारे मतभेद दूर होण्यासाठी प्रयत्न वाढवा. आनंदी राहाल. चिंता कमी होतील. वैवाहिक जीवनात सुसंवाद राहील. मनोबल वाढणार आहे. नातेवाईकांच्या सुखदु:खात सहभागी व्हाल. अनेकांशी सुसंवाद साधणार आहात. नोकरीत क्षुल्लक गैरसमज होतील. धंद्यात पैसा जपा.