मेष : आठवड्याच्या मध्यात व्यवसायात कोणतीही जोखीम घेऊ नका, ज्यामुळे तुमचे आर्थिक नुकसान होऊ शकते. व्यवसायासाठी प्रवास करताना घ्या. आपल्या कार्यक्षमतेत वृद्धी झाल्याने आपणास फायदाच होईल.वरिष्ठांच्या नजरेत आपली कामगिरी उठून दिसेल. त्यामुळे ते आपल्या पाठीशी राहतील. व्यावसायिक वाढ चांगली होईल. नोकरदार वर्गाला कामाचे वेळापत्रक ठरवून काम करावे लागेल व ते यशस्वीही होईल.
वृषभ : व्यावसायिकदृष्टय़ा बदल होतील व हे बदल फायद्याच्या दृष्टिकोनातून चांगले असतील. नोकरदार वर्गाला वरिष्ठांकडून चांगल्या कामाची पोचपावती मिळेल. आर्थिक भरभराट होईल. मित्र-मैत्रिणींशी संवाद साधताना स्पष्टवक्तेपणा टाळा. या काळात व्यवसायात अपेक्षित लाभ होईल. व्यवसायाच्या संदर्भात केलेले प्रवास फायदेशीर ठरतील. विद्यार्थी आणि तरुणांना प्रगतीची दिशा मिळेल. नोकरी करणाऱ्या व्यक्तींसाठी नवीन उमेद घेऊन येणारा आठवडा आहे.
मिथुन : नोकरी करणाऱ्यांसाठी आठवडा अनुकूल आहे. कोणत्याही प्रलोभनास बळी पडू नका. एखादे नवीन काम मिळाल्यास ते उत्साहात पूर्ण करा. आठवड्याच्या मध्यात काही गोंधळ असला तरी व्यवसायात तुम्हाला अपेक्षित नफा मिळेल. जर तुम्ही बराच काळ तुमचा व्यवसाय वाढवण्याचा विचार करत असाल तर या आठवड्यात तुमची इच्छा पूर्ण होऊ शकते. कारण नसताना एखादी गोष्ट अंगलट येऊ शकते. त्यामुळे पुढची घडी बिघडू शकते हे लक्षात ठेवा.
कर्क : व्यवसायात कोणतीही उलाढाल वाढवू नका. नोकरदार वर्गाने कामाव्यतिरिक्त इतर गोष्टींत लक्ष घालू नये. आर्थिकदृष्टय़ा बचतीकडे लक्ष द्या. कुटुंबातील वातावरण बिघडणार नाही याची काळजी घ्या. व्यापाऱ्यांच्या हाती नवीन सौदे येऊ शकतील, जे आपल्या व्यापारासाठी आवश्यकच असतील. खर्चात वाढ होईल, ज्यामुळे आपली काळजी वाढेल. आठवड्याच्या उत्तरार्धात राजकारणाशी संबंधित लोकांना काही मोठे पद किंवा जबाबदाऱ्या मिळू शकतात, ज्यामुळे पक्षातच नव्हे तर समाजातही त्यांचा दर्जा वाढेल.
सिंह : या आठवड्यात तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळेल आणि तुम्ही विविध स्रोतांमधून नफा मिळवण्यात यशस्वी व्हाल. या काळात तुम्हाला जवळच्या मित्रांसोबत मजा करण्याची संधी मिळेल. आपल्या कामावर लक्ष द्यावे लागेल. व्यापाऱ्यांसाठी आठवडा अनुकूल आहे. आपण आपल्या कामात वाढ करून त्याची व्याप्ती वाढवाल. त्यामुळे आपणास फायदा होईल. व्यवसायात मोठय़ा प्रमाणावर गुंतवणूक करू नका. विनाकारण नुकसान होऊ शकते, तेव्हा सध्या विचाराने कृती करा.
कन्या : आठवड्याची सुरवात प्रवासास अनुकूल आहे. भागीदारी व्यवसायातील हिशोब जे बाकी होते ते करावयास हरकत नाही. व्यावसायिक परिस्थिती ठीक राहील. नोकरदार वर्गाचे कामकाज सुरळीत चालू राहील. वायफळ खर्च टाळा. परीक्षा आणि स्पर्धांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना काही चांगली बातमी ऐकायला मिळेल. कामाच्या ठिकाणी वरिष्ठ आणि कनिष्ठांनी एकत्र काम केल्यास नियोजित कामे वेळेवर पूर्ण होतील. खर्चात कपात होईल. नोकरीत यश प्राप्त होईल.
तूळ : ह्या आठवड्यात आपण केलेले प्रयत्न यशस्वी होतील. धन प्राप्ती होईल. आठवड्यात नवीन जवाबदारी अंगावर पडण्याची चर्चा देखील होऊ शकते. व्यापारात सुद्धा परिस्थिती आपणास अनुकूल राहील. गुंतवणुकीचा फायदा होईल. आठवड्याच्या मध्यात जवळच्या मित्रांशी संवाद वाढेल. तरुण आणि महिलांसाठी हा काळ अतिशय अनुकूल असणार आहे. नवीन व्यवसायाची उभारणी करण्याकरिता ही वेळ नाही, थोडा धीर धरा.
वृश्चिक : आजपर्यंत ज्या कामाविषयी दडपण वाटत होते ते दडपण दूर होईल. व्यवसायात पर्यायी मार्गाचा अवलंब करा. नोकरदार वर्गाच्या कामकाजात बदल होईल. आर्थिकदृष्टय़ा परिस्थिती समाधानाची असेल. आर्थिक दृष्ट्या आठवडा अनुकूल आहे. आर्थिक उन्नती होईल. प्राप्तीत वाढ होईल. व्यापारासाठी आठवडा अनुकूल आहे. व्यापारा निमित्त एखाद्या प्रतिष्ठित व्यक्तीची भेट संभवते. अविवाहित लोकांकडून विवाहाचे प्रस्ताव येऊ शकतात. जर तुम्ही एखाद्यासोबत प्रेमसंबंधात असाल, तर तुमचे कुटुंबीय त्याला मान्यता देऊ शकतात.
धनु : जमीन-बांधणीशी संबंधित वादात नातेवाईकांशी वाद टाळा आणि वाटाघाटीद्वारे असे प्रकरण सोडवण्याचा प्रयत्न करा. आठवड्याच्या मध्यात कामात किरकोळ अडथळे येतील पण प्रभावशाली व्यक्तीच्या मदतीने ते लवकरच दूर होतील. खर्च कमी होतील. प्राप्तीत वाढ होईल. प्रकृतीत चढ – उतार होताना दिसून येईल. विद्यार्थ्यांसाठी आठवडा अनुकूल आहे. आर्थिक व्यवहार मार्गी लागतील. समाजसेवा करताना भान ठेवा. नातेवाईकांशी जेवढय़ास तेवढे राहा. वैवाहिक जीवन सुखाचे राहील. मानसिक समाधान लाभेल. आपण आपल्या प्रेमिकेशी जवळीक साधाल. आपण आपले विचार प्रेमिकेस सांगू शकाल.
मकर : व्यावसायिकदृष्टय़ा खरेदी-विक्री व्यवहार मोठय़ा प्रमाणात होतील. मात्र अनोळखी व्यक्तीशी कोणतेही तोंडी व्यवहार टाळा. नातेवाईकांच्या वैयक्तिक गोष्टींत हस्तक्षेप करू नका. शेजाऱ्यांशी अलिप्त राहा. पोटास उष्णता व पित्ताचा त्रास संभवतो. आठवड्याचे मधले व अखेरचे दोन दिवस प्रवासास अनुकूल आहेत. सप्ताहाच्या मध्यात काही धार्मिक-सामाजिक कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळेल. खूप दिवसांनी प्रिय व्यक्ती भेटली तर जुन्या आठवणी ताज्या होतील. प्रवास फायदेशीर पण खूप थकवणारा असेल. ज्याचा तुमच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो.
कुंभ : व्यवसायातील बारीकसारीक गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका. ग्राहकांच्या मागणीनुसार पुरवठा करावा लागेल. नोकरदार वर्गाची कामाच्या बाबतीत पळापळ होईल. खर्च जपून करा. व्यापाऱ्यांना चांगले यश प्राप्त होऊ शकते. ह्या आठवड्यात कोणत्याही प्रकारची गुंतवणूक विचारपूर्वकच करावी. आठवड्याच्या मध्यात तुम्हाला घराच्या दुरुस्ती किंवा सजावटीवर तुमच्या खिशातून अधिक खर्च करावा लागू शकतो, ज्यामुळे तुमचे बजेट थोडे बिघडू शकते. विवाहितांचे वैवाहिक जीवन सुखद होईल मात्र, सासुरवाडी कडील लोकांशी तणाव वाढू शकतो.
मीन : आठवड्याच्या मध्यात विद्यार्थ्यांची अभ्यासातील आवड कमी होऊ शकते. या काळात, आपल्या बोलण्यावर आणि भावनांवर नियंत्रण ठेवा आणि कोणालाही काहीही सांगण्यापूर्वी दहा वेळा विचार करा. एकदा तोंडातून गेलेला शब्द माघारी घेता येत नाही. नंतर पश्चाताप करण्यापेक्षा शांत राहून काम करा. आर्थिकदृष्टय़ा बचतीकडे लक्ष द्या. व्यवसायात नफा मिळविण्यासाठी चुकीच्या गोष्टींचा अवलंब करणे टाळा.