TheClearNews.Com
Saturday, March 14, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

Weekly-Horoscope : साप्ताहिक राशीभविष्य २ ते ८ एप्रिल २०२३ !

जाणून घ्या...एप्रिलचा पहिला आठवडा तुमच्यासाठी कसा राहील !

The Clear News Desk by The Clear News Desk
April 2, 2023
in Uncategorized
0
Share on FacebookShare on Twitter

मेष : तरुणांच्या नोकरीविषयक मुलाखतींचा काळ. कोर्ट प्रकरणातून मुक्तता. ता. ४ चा मंगळवार विजयोत्सव साजरा करेल. व्यवसायात मोठय़ा उलाढाली होतील. नोकरदार वर्गाला कामात स्पष्टवक्तेपणा ठेवून चालणार नाही. थोडं सांभाळून बोला. खर्चाची बाजू सांभाळा. ४ तारखेला दुपारनंतर व दिनांक ५, ६ हे संपूर्ण दोन दिवस असे हे अडीच दिवसांचा कालावधी जेमतेम राहील. या कालावधीत जे काही करायचे ठरवणार आहात त्याच्या उलट होणार आहे. त्यापेक्षा हा अडीच दिवसांचा कालावधी चांगला जाण्यासाठी कोणाच्या आहारी न जाता सरळ मार्गी वाटचाल ठेवा.

वृषभ : व्यवसायात मनासारखे बदल करू शकता. त्याचा फायदा होईल. नोकरदार वर्गाला कामाचे तास वाढवावे लागतील. खर्च आटोक्यात ठेवा. दिनांक ७, ८ रोजीचे दिवस जास्तीत जास्त शांत राहणे उत्तम राहील. कितीही प्रामाणिकपणा तुमच्याकडे असला तरी तो या दोन दिवसांत नडणारा आहे. चांगल्या गोष्टी होण्यासाठी चांगली वेळ यावी लागते असेच म्हणावे लागेल. कलाकारांना मोठं यश. कृत्तिका नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहात त्वचारोगापासून त्रास देणारा कालखंड. रोहिणी नक्षत्राच्या व्यक्तींना उद्याचा सोमवार घरात मंगलकार्याचा. शनिवारी प्रवासाचा योग आहे.

READ ALSO

शाळेत सोडण्याच्या बहाण्याने नेत विद्यार्थीनीवर अत्याचार

भुसावळ अमृत पाणीपुरवठा योजनेच्या रखडलेल्या कामावरून एकनाथराव खडसे आक्रमक; विधान परिषदेत सरकारला धारेवर धरले

मिथुन : जर तुम्ही दीर्घकाळ नोकरीसाठी प्रयत्न करत असाल तर या आठवड्यात तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये पुढे जाण्यासाठी चांगल्या संधी मिळतील. उच्च अधिकार्‍यांशी संबंध चांगले राहतील. व्यवसायातून अपेक्षेपेक्षा जास्त उत्पन्न मिळेल. या मिळालेल्या उत्पन्नाची आगामी काळासाठी तरतूद करणे गरजेचे राहील. नोकरदार वर्गाच्या कामातील त्रुटी दूर होतील. स्वार्थी व धूर्त मैत्रीपासून लांब राहा. शेजारधर्माशी जेवढय़ास तेवढे राहा. सप्ताहातील सर्व दिवसांचा कालावधी चांगला जरी असला तरी वेळ वाया घालवू नका. नियोजन करून कामाचे स्वरूप ठरवल्यास कामे लवकर होणार आहेत. त्यासाठी इतरांची मदतही मिळेल.

कर्क : जर तुम्ही कर्ज घेतले असेल तर ते फेडण्याची शक्यता असते. करिअर आणि व्यवसायात पुढे जाण्याची संधी मिळेल.व्यावसायिकदृष्टय़ा खरेदी-विक्री व्यवहारात पारदर्शकता दिसून येईल. नफ्याचे प्रमाण चांगले राहील. नोकरदार वर्गाला मात्र वरिष्ठांच्या आदेशानुसार वेगवेगळय़ा ठिकाणी कामकाज करावे लागेल. आर्थिक बाबतीत काळजी मिटेल. सध्या सप्ताहात चंद्रग्रहाची अनुकूलता उत्तम राहणार आहे. संघर्षदायक वातावरण कमी होईल. ज्या कामाविषयी नेहमीच विलंब होत होता, त्या कामाला आता विलंब होणार नाही.

सिंह : भागीदारीत व्यवसाय करत असाल तर जोडीदाराचे उत्तम सहकार्य मिळाल्याने मन प्रसन्न होईल. कार्यक्षेत्रात वरिष्ठ आणि कनिष्ठ दोघांचे सहकार्य मिळेल.व्यावसायिक स्तरावर निर्माण झालेल्या प्रश्नावर त्वरित मार्ग मिळेल. दलाली व्यावसायिकांना सध्याचे दिवस चांगले असतील. नोकरदार वर्गाला काम करताना फारसे कष्ट घ्यावे लागणार नाहीत. आर्थिकदृष्टय़ा बचत होईल. चढउतारांचा सामना दरवेळी करावाच लागतो. सध्या मात्र हा करावा लागणार नाही. वातावरण चांगले असल्यामुळे ठामपणे निर्णय घेऊन कामाच्या अंमलबजावणीची सुरुवात कराल.

कन्या : आठवड्याचा दुसरा भाग व्यावसायिकांसाठी चांगला आहे. कोणत्याही योजनेसाठी किंवा व्यवसायाला पुढे जाण्यासाठी हा काळ शुभ आहे. मात्र, हे करत असताना आपल्या हितचिंतकांचे मत घ्यायला विसरू नका.व्यवसायात हिशेबाची नोंद ठेवा. उधारीचा व्यवहार टाळा. नोकरदार वर्गाने कामाव्यतिरिक्त इतर गोष्टींत लक्ष घालू नका. आर्थिकदृष्टय़ा बचत करा. दिनांक २, ३ हे संपूर्ण दिवस व ४ तारखेला दुपापर्यंत अशा या कालावधीत संयम ठेवून वागावे लागेल. जिथे वाद-विवादाचा प्रसंग येईल तिथे शांत राहा. एखाद्या गोष्टीशी तुमचा काहीही संबंध नसताना गैरसमज वाढू शकतात. तेव्हा भडक प्रतिक्रिया व्यक्त करणे त्रासाचे ठरेल. या कालावधीत कमी बोललेलेच चांगले राहील.

तूळ : विद्यार्थ्यांना यशासाठी कठोर परिश्रम करावे लागतील. प्रेमप्रकरणात सांभाळून पाऊल उचला. जोडीदाराच्या भावनांकडे दुर्लक्ष करणे टाळा.व्यवसायात कमी वेळेत जास्त फायदा मिळावा ही अपेक्षा ठेवू नका. प्रयत्न वाढवावे लागतील. नोकरदार वर्गाला कामाचे वेळापत्रक ठरवावे लागेल. अनावश्यक खर्च टाळा. ४ तारखेला दुपारनंतर ५ व ६ तारखेला संपूर्ण दिवस चांगले नसले तरी वाईटही नाहीत. बऱ्याच दिवसांपासून तोंडावर जो ताबा ठेवलेला आहे तो या दिवसांत सुटणार आहे. आपल्या बोलण्याचा दुसऱ्यांना त्रास होणार आहे तसाच तो तुम्हालाही होणार आहे. त्यामुळे या रागावर नियंत्रण ठेवायला शिका.

वृश्चिक : एखादे काम करताना जर तुम्हाला गोंधळ वाटत असेल तर तुमच्या हितचिंतकांचा सल्ला घेण्यास अजिबात संकोच करू नका. व्यवसायातील घडी सुरळीत चालू राहील. आवक वाढेल. नोकरदार वर्गाला वरिष्ठांनी केलेल्या सूचनांची अंमलबजावणी करावीच लागेल. आर्थिकदृष्टय़ा बचतीत वाढ कशी करता येईल ते पाहा. दिनांक ७, ८ रोजी ज्या गोष्टींचा तुम्हाला तिटकारा आहे त्याच गोष्टी तुमच्या समोर येतील. त्यामुळे तुमचा रागाचा पारा चढेल; पण हा रागाचा पारा चढू देऊ नका. एखादी गोष्ट नाही पटली म्हणून त्यासाठी चिडचिड करून चालणार नाही. शांतपणाने तोडगा काढणे हे सगळय़ात उत्तम राहील. बाकी दिवसांचा कालावधी चांगला असेल.

धनू : व्यवसायात शुभ परिणाम मिळतील. उत्पन्नाचे अतिरिक्त स्रोत निर्माण होतील. आठवड्याच्या मध्यात एखाद्या प्रिय व्यक्तीला भेटू शकता. व्यवसायात पूर्वीसारखा संघर्ष जाणवणार नाही. व्यवसायवाढीचे प्रयत्न यशस्वी ठरतील. नोकरदार वर्गाची जबाबदारी वाढेल. आर्थिकदृष्टय़ा परिस्थितीत चांगले बदल घडतील. दर वेळी प्रत्येक आठवडय़ात एखादा तरी दिवस चिंतेचा जातो. या आठवडय़ात मात्र कोणतीही चिंता जाणवणार नाही. त्यामुळे कामात लक्ष लागेल. चांगल्या गोष्टींसाठी पाठपुरावा करावा लागणार नाही. त्या सहज मार्गी होणार आहेत. मनोबल वाढेल. सध्या सर्व गोष्टी मनासारख्या होणार आहेत.

मकर : व्यवसायात पैसे गुंतवताना हितचिंतकांचा सल्ला अवश्य घ्या. या आठवड्यात कोणाशीही मस्करी करताना सावधगिरी बाळगा, अन्यथा तुमचे विरोधक तुमच्या शब्दांचा अर्थाचा अनर्थ करतील.व्यवसायात पर्यायी मार्ग स्वीकारा. व्यवहाराच्या बाबतीत कोणाशी मध्यस्थी करायला जाऊ नका. नोकरदार वर्गाला वरिष्ठांकडून प्रेरणा मिळेल. आर्थिक बाबतीत गुंतवणूक योग्य ठिकाणी करा. दिनांक २, ३ व ४ हे तीन दिवस कोणत्याही गोष्टीचा अंदाज घेतल्याशिवाय महत्त्वाचे काम करू नका. त्यामुळे नुकसान होऊ शकते. प्रत्येक दिवशी नाही, पण या तीन दिवसांत तरी तडजोड स्वीकारलेली चांगली राहील. कोणत्याही गोष्टीचा आळस न करता कामे वेळेत पूर्ण करा. बाकी दिवसांचा कालावधी चांगला असेल.

कुंभ : परीक्षा स्पर्धांच्या तयारीत गुंतलेल्या विद्यार्थ्यांना यशासाठी अधिक मेहनत घ्यावी लागेल. आठवड्याच्या उत्तरार्धात जमीन-इमारती किंवा वडिलोपार्जित मालमत्ता इत्यादींशी संबंधित काही प्रकरणे अचानक समोर येऊ शकतात. व्यावसायिक स्तरावर सतत निर्माण होणाऱ्या समस्या कमी होतील. नोकरदार वर्गाला जास्त कामाचे नियोजन करावे लागेल. आर्थिकदृष्टय़ा रोखठोक व्यवहाराला महत्त्व द्या. ४ तारखेला दुपारनंतर दिनांक ५ व ६ या कालावधीत ज्या गोष्टींविषयी खात्री नाही अशा गोष्टींवर चर्चा करणे टाळा. या दिवसांत महत्त्वाचे निर्णय घेणे टाळा. क्रोधावर नियंत्रण ठेवा. कितीही राग आला तरी तो आवरण्याचा प्रयत्न करा.

मीन : या आठवड्यात तरुण वर्ग मौजमजेमध्ये अधिक वेळ घालवेल. सप्ताहाच्या मध्यात घरात प्रिय व्यक्तीच्या आगमनामुळे आनंदाचे वातावरण राहील.व्यवसायात मोठी गुंतवणूक करू नका. नोकरदार वर्गाने कामाव्यतिरिक्त इतर गोष्टींचा विचार करू नका. अनावश्यक खर्च टाळा. सध्या समाजसेवा दूर ठेवा. या आठवड्यात शांततेच्या मार्गाने गोष्टी हाताळाव्या लागतील. तडकाफडकी निर्णय घेतल्याने नुकसान होऊ शकते. कोणत्याही परिस्थितीत वादविवाद टाळा. सध्या डोके शांत ठेवा.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

Uncategorized

शाळेत सोडण्याच्या बहाण्याने नेत विद्यार्थीनीवर अत्याचार

March 6, 2026
Uncategorized

भुसावळ अमृत पाणीपुरवठा योजनेच्या रखडलेल्या कामावरून एकनाथराव खडसे आक्रमक; विधान परिषदेत सरकारला धारेवर धरले

March 1, 2026
Uncategorized

वासुदेव जेष्ठ नागरिकासंघाचे सवलतीत तीर्थाटन

March 1, 2026
Uncategorized

दहावी–बारावीच्या परीक्षांसाठी कॉपीमुक्त व भयमुक्त वातावरण राखण्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे विद्यार्थ्यांना आवाहन

February 9, 2026
Uncategorized

अल्पवयीन मुकबधीर मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला २० वर्षांची शिक्षा

January 18, 2026
Uncategorized

ग्रामीण भागाचा चेहरामोहरा बदलणारा विकास हाच केंद्रबिंदू – पालकमंत्री गुलाबराव पाटील

January 17, 2026
Next Post

समृद्धी महामार्गावर ट्रकला कारची मागून धडक ; दोन डॉक्टर मैत्रिणीसह एकाचा जागीच मृत्यू !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

सुभाषवाडी येथे ग्रामपंचायत कार्यालयाचे लोकार्पण व विकास कामांचा शुभारंभ !

December 26, 2023

जळगाव एमआयडीसीतील गोदामावर छापा ; २१ लाखांचा प्रतिबंधित गुटखा जप्त

June 27, 2024

नागपूर : RSS शस्त्रपूजन वादात ; न्यायालयाने बजावली ‘नोटीस’ !

August 21, 2022

धक्कादायक : भिल्ल समाज बांधवांची इनामी जामीन केली परस्पर पाटील कुटुंबियांच्या नावावर !

November 9, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group