मेष : कामाचा ताण राहील. सप्ताहाची सुरुवात थोडी कटकटीची असेल. नोकरीत वरिष्ठांची बोलणी खावी लागतील. वाद होण्याची शक्यता आहे. कामाचा ताण वाढेल. कामात चुका होणार नाहीत याची काळजी घ्या. धनलाभाच्या दृष्टीने चांगला काळ आहे. व्यवसायात विक्री चांगली राहील. मात्र धाडसी निर्णय घेऊ नका. टीप- मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार चांगले दिवस.
वृषभ : एखाद्या कामाचे पैसे बऱ्याच दिवसांनंतर आता मिळण्याची शक्यता आहे. प्रवासाचा योग निर्माण होईल. कामात प्रगती होईल. तब्येतीची काळजी घ्या. शुभ रंग – पांढरा. टीप- मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार चांगले दिवस.
मिथुन : या आठवड्यात तुमच्या प्रेम जीवनात काही आंबट-गोड अनुभव येतील आणि तुम्ही एखाद्या गोष्टीबद्दल निराश देखील होऊ शकता. हे देखील शक्य आहे. जीवनसाथी आपल्याला चांगली साथ देईल. तरुण वर्गाला प्रेमात यश मिळेल. जमिनीच्या व्यवहारात फायदा होईल. मनासारखे व्यवहार जुळून येतील. टीप- बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार चांगले दिवस.
कर्क : संयमाने वागणे आवश्यक. आर्थिक आवक चांगली राहील. नोकरीत तणाव वाढणार नाही याची काळजी घ्या. सामोपचाराने तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करा. महत्त्वाच्या कामात अडचणी येतील. तडकाफडकी निर्णय घेणे टाळा. व्यवसायात कटकटी निर्माण होतील. जीवनासाथी आपल्याला सांभाळून घेईल. रागावर नियंत्रण ठेवा. कुणाला दुखावू नका. टीप- मंगळवार, बुधवार, गुरुवार चांगले दिवस.
सिंह : प्रगती होईल. धनलाभाचा योग आहे. अडचणी दूर होतील. हुशारीने वागाल तर प्रगतीची घोडदौड सुरू होईल. या आठवड्यात तुम्हाला तुमच्या प्रेम संबंधात अचानक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. असे होऊ शकते की एखाद्या विशिष्ट ठिकाणामुळे किंवा परस्पर अंतरामुळे परस्पर तणाव वाढतो. दूरच्या प्रवासाचे योग येतील. प्रवास लाभदायक ठरतील. टीप- मंगळवार, बुधवार, गुरुवार चांगले दिवस.
कन्या : नवीन जबाबदारी मिळेल. सप्ताहाच्या प्रारंभी थोडी दगदग होईल. तणाव राहील. थोडा संयम ठेवलेला बरा. नवीन जबाबदारी अंगावर पडेल. नवीन नोकरीच्या शोधात असाल तर काम होईल. आर्थिक आवक चांगली राहील. घरातील सदस्यांच्या आरोग्याची काळजी घ्या. सप्ताहाच्या मध्यात परस्पर प्रेमही दृढ होईल. सप्ताहाच्या शेवटी काही बातम्या मिळाल्याने मन उदास होऊ शकते. टीप- मंगळवार, बुधवार, शुक्रवार, शनिवार चांगले दिवस.
तूळ : या आठवड्यात तुम्ही तुमच्या प्रेमसंबंधात आनंदी असाल आणि महिलांच्या पाठिंब्यामुळे जीवनात अनुकूलता येईल, ज्यामुळे मन प्रसन्न राहील. आठवड्याच्या मध्यात तुम्ही तुमच्या प्रिय जोडीदारासोबत एखाद्या कार्यक्रमात सहभागी होऊ शकता. प्रसिद्धी, मानसन्मान मिळेल. तुमचे महत्त्व वाढेल. दगदग होईल अशी कामे करू नका. टीप- गुरुवार, शुक्रवार, शनिवार चांगले दिवस.
वृश्चिक : प्रयत्नांती परमेश्वर लाभेल. छोट्या अपयशाने खचू नका. नियोजनात चूक होणार नाही याची काळजी घ्या. नियोजन हिताचे. तब्येतीची काळजी घ्या. घरच्यांना वेय़ळ द्या. वेळेचे नियोजन हिताचे. तुमच्या प्रेम जीवनासाठी हा आठवडा शुभ आहे आणि परस्पर प्रेम वाढेल. आठवड्याच्या सुरुवातीला तुम्हाला तुमच्या प्रेम प्रकरणाबाबत काही चांगली बातमी मिळू शकते आणि वेळही आनंददायी जाईल. टीप- मंगळवार, बुधवार, शनिवार चांगले दिवस.
धनू : प्रगती होईल. नातेवाईकांच्या भेटीगाठी होतील. त्यांच्यासाठी वेळ द्यावा लागेल. घरातील कामे आणि नोकरी व्यवसाय यांचा ताळमेळ साधताना धावपळ होईल. एखादी चांगली जबाबदारी मिळेल. व्यवसायात बरकत राहील. मोठे सौदे फायद्याचे ठरतील. घरात तुमच्या मर्जीनुसार निर्णय घेतले जातील. तुम्ही हुशारीने निर्णय घ्यावा, तरच तुमच्या प्रेमसंबंधात सकारात्मक बदल दिसून येतील. आरोग्याची काळजी घ्या. वाहने जपून चालवा. टीप- गुरुवार, शुक्रवार, शनिवार चांगले दिवस.
मकर : या आठवड्याच्या सुरुवातीला वडिलांसारख्या व्यक्तीमुळे परस्पर प्रेम बिघडू शकते आणि काळजी राहील. नोकरीत अनुकूल परिस्थिती राहील. नोकरी, व्यवसायात प्रगती होईल. तुमच्या अपेक्षेप्रमाणे घटना घडतील. घरात किरकोळ कारणावरून वाद वाढून तणावाचे वातावरण निर्माण होईल. त्यामुळे सबुरीने वागण्याची गरज आहे. टीप- मंगळवार, बुधवार, शनिवार चांगले दिवस.
कुंभ : घरच्यांची काळजी घ्या. पैसे जपून वापरणे हिताचे. गोड बोलाल तर प्रगती कराल. तज्ज्ञांचा सल्ला फायद्याचा ठरेल. हा आठवडा तुमच्यासाठी रोमँटिक आठवडा ठरण्याची अपेक्षा आहे आणि जीवनात सुख-समृद्धीचे शुभ संयोग घडतील. परस्पर प्रेम मजबूत होतील. टीप- मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार चांगले दिवस.
मीन : कायदेविषयक कामे होतील. जमिनीच्या व्यवहारात यश मिळेल. आर्थिक अंदाज चुकू शकतात. मोठी गुंतवणूक करणे टाळा. कुणाला उसने पैसे देताना विचार करून द्या. अन्यथा पैसे अडकून पडतील. नोकरीत बदल होईल. मुलांना यश मिळेल. नातेवाईकांच्या भेटीगाठी होतील. आठवड्याच्या मध्यात तुम्हाला तुमच्या प्रिय जोडीदाराला भेटण्यासाठी खास प्रिय व्यक्ती मिळू शकते. टीप- बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार चांगले दिवस.
















