मेष : वैवाहिक जीवनातील समस्या सुद्धा कमी होतील, व त्यामुळे आपल्यात उत्तम समन्वय साधला जाईल, व आपल्या दांपत्य जीवनात सुधारणा होऊ लागेल. प्रेमीजनांना पुढाकार घेऊन आपले विचार आपल्या प्रेमिकेस सांगण्याची संधी मिळेल. हि संधी वाया दवडू नका. आपल्या प्राप्तीत वाढ झाल्याने आपण खुश व्हाल. आपले खर्च सुद्धा आपल्या नियंत्रणात राहतील. त्यामुळे आपणास मोठा दिलासा मिळॆल. व्यापाऱ्यांसाठी आठवडा चांगला आहे.
वृषभ : प्रेमीजनांना त्यांच्या प्रेमिकेचा पाठिंबा मिळून आपसातील जवळीक वाढेल. एकमेकांत सुंदर भेटवस्तूंची देवाण – घेवाण होईल. नोकरी करणाऱ्या व्यक्ती आपल्या कामात मग्न राहतील. आपली मेहनत यशस्वी होईल. असे असले तरी काही लोकांशी वाद संभवतात. तेव्हा सावध राहावे. व्यापाऱ्यांना एखाद्या नवीन योजनेचा लाभ होईल. एखाद्या स्त्रीच्या माध्यमातून आपणास आपल्या कामात मोठा फायदा होण्याची दाट शक्यता आहे.
मिथुन : कौटुंबिक जीवनात सुख – शांती नांदेल. प्रॉपर्टीच्या विक्रीतून लाभ होईल. प्रणयी जीवनासाठी आठवडा चढ – उतारांचा आहे. ह्या आठवड्यात आपण प्रेमिकेस विवाहाची मागणी घालू शकता. आपण आपल्या आनंदासाठी एखादा मोठा खर्च कराल. प्राप्ती सुद्धा खूप होईल. नोकरीच्या ठिकाणी परिस्थिती आपणास अनुकूल असेल. आपल्या पद – प्रतिष्ठेत वृद्धी होईल.
कर्क : विवाहित व्यक्ती आपले वैवाहिक जीवन अधिक सुदृढ करण्यासाठी शक्य तितके प्रयत्न करतील. नोकरी करणाऱ्या व्यक्ती आपल्या कामात खूप मेहनत करतील. सध्या आपण उर्जावान असाल. आपल्यातील ऊर्जेचा सदुपयोग करून आपण आपली कामगिरी उंचावू शकता. व्यापाऱ्यांसाठी हा आठवडा काहीसा प्रतिकूल असला तरी आठवड्याच्या मध्यास परिस्थितीत सुधारणा होत असल्याचे दिसू लागेल. व्यापारात गुंतवणूक करणे आपल्यासाठी फायदेशीर होऊ शकेल.
सिंह : महिला मित्रांशी आपला सलोखा राहील, ज्याचा आपणास लाभ सुद्धा होईल. नोकरी करणाऱ्यांना आपल्या कामा बरोबरच जोड व्यवसायावर सुद्धा लक्ष देण्याचे विचार येतील. हा आठवडा व्यापाऱ्यांना अनुकूल आहे. ह्या अनुकूलतेचा पूर्ण लाभ घेऊन आपल्या कामास पुढे न्यावे. गुंतवणूक केल्याने सुद्धा लाभ होईल. आपली आर्थिक स्थिती उत्तम राहील. आव्हाने व खर्च सुद्धा कमी होतील. आपणास नशिबाची साथ मिळेल. प्रलंबित कामे सुद्धा होऊ लागतील. गेलेला पैसा सुद्धा परत मिळेल.
कन्या : सासुरवाडी कडील संबंधांवर सुद्धा विपरीत परिणाम संभवतो. ह्या दरम्यान कोर्ट – कचेरीशी संबंधीत बाबी आपले लक्ष वेधून घेतील. प्रणयी जीवनासाठी आठवडा अनुकूल आहे. ह्या आठवड्यात आपणास आपल्या प्रकृतीची सुद्धा काळजी घ्यावी लागेल. त्याकडे दुर्लक्ष केल्यास परिस्थिती हाता बाहेर जाऊ शकते. नोकरी करणाऱ्या व्यक्ती आपल्या कामात मग्न असल्याचे दिसून येईल. व्यापारांच्या पदरी मात्र थोडी निराशा पडू शकते. सावध राहूनच वाटचाल करणे हितावह होईल.
तूळ : मनातील द्वंद्वामुळे आपण योग्य निर्णय घेऊ शकणार नाही, परंतु आठवड्याच्या मध्यास स्थितीत बदल होऊन आपणास निर्णय घेतल्याचा लाभ होईल. आपण एखाद्या दूरवरच्या प्रवासास जाऊ शकता. आपण आपल्या खास लोकांसह प्रवासास जाण्याचा बेत आखाल. ह्या आठवड्यात आपल्या प्राप्तीत कपात तर खर्चात वाढ होऊ शकते. विचारपूर्वक खर्च करणे हितावह होईल. व्यापाऱ्यांना आपल्या सहकाऱ्यांवर सुद्धा लक्ष ठेवावे लागेल. विद्यार्थ्यांचे अभ्यासात मन रमेल.
वृश्चिक : व्यापाऱ्यांचे काम उत्तम रित्या वाटचाल करेल. त्यांना आपल्या बुद्धिमत्तेचा फायदा होईल. व्यापारात लाभ सुद्धा होईल. ते यशाचे शिखर गाठू शकतील. नोकरी करणाऱ्यांना सुद्धा त्यांच्या मेहनतीचे चांगले फळ मिळेल. त्यांना प्रगतीची संधी मिळेल. विद्यार्थ्यांना अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे लागेल. ह्या आठवड्यात व्यस्ततेमुळे त्यांना अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्यात त्रास झाल्याने त्यांचे नुकसान होऊ शकते. तेव्हा काळजी घ्यावी.
धनु : व्यापारासाठी आठवडा अनुकूल आहे. व्यापारात गुंतवणूक केल्याने व्यापार वृद्धी करण्यास मदत होऊन आपणास यश प्राप्ती होईल. मित्रांचे सुद्धा सहकार्य मिळेल. विद्यार्थी आपल्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करू शकतील. त्याचे त्यांना चांगले परिणाम सुद्धा मिळतील. ह्या आठवड्यात आपणास आपल्या प्रकृतीची थोडी काळजी घ्यावी लागेल. आपले विरोधक आपल्यावर मात करू शकतील. त्यामुळे कामाच्या ठिकाणी त्रास होऊ शकतो. तेव्हा सावध राहावे.
मकर : संतती सौख्य सुद्धा मिळेल. प्रेमीजनांना आपली सर्जनशीलता दाखविण्याची संधी मिळेल. त्याच्या जोडीने आपल्या भावनांसह रोमांस करून आपल्या प्रेमिकेशी जवळीक साधण्याची संधी मिळेल. अचानकपणे कोठून तरी धन प्राप्ती होईल. त्यामुळे आपणास आनंद होईल. मन हर्षित होईल. स्वतः तर खुश व्हालच, परंतु इतरांना सुद्धा खुश करण्याचा विचार कराल. नोकरी करणाऱ्या लोकांना काही त्रास होईल. नोकरी बदलण्याची संधी सुद्धा मिळेल. व्यापारासाठी आठवडा अनुकूल आहे.
कुंभ : नोकरी करणाऱ्यांसाठी आठवडा अनुकूल आहे. आपण आनंदाने आपल्या कामावर लक्ष केंद्रित करू शकाल व त्यामुळे आपली स्थिती मजबूत होईल. आपले सहकारी सुद्धा आपणास सहकार्य करतील. असे असले तरी कोणावर हि आंधळा विश्वास ठेवू नये. व्यापाऱ्यांसाठी हा आठवडा चांगला आहे. कामा निमित्त भरपूर प्रवास सुद्धा करावे लागतील. ह्या प्रवासांच्या माध्यमातून व्यापार वृद्धी होईल. व्यापाराच्या विस्तारासाठी सुद्धा आपण भरपूर प्रयत्न कराल. विद्यार्थ्यांना अभ्यासात खूप मेहनत करावी लागेल. ह्या मेहनतीचे त्यांना चांगले परिणाम मिळतील.
मीन : आपणास नशिबाची साथ मिळाल्याने आपल्या प्राप्तीत सुद्धा वाढ होईल. आपल्या अनेक योजना फलद्रुप होऊ लागतील. व्यापार वृद्धी होऊन त्यास गती येईल. नवीन काही सौदे आपल्या हाती लागतील. आपल्या मान – सन्मानात सुद्धा वाढ होईल. आपली प्रतिमा उजळेल. ह्या आठवड्यात आपल्या प्रकृतीत सुधारणा होईल. मात्र, अति बडबड केल्याने काही लोक आपल्यावर नाराज सुद्धा होऊ शकतील. विद्यार्थ्यांचे लक्ष अभ्यासा व्यतिरिक्त इतर विषयांकडे वळण्याची संभावना आहे.