मेष : यंदाचा गणेशोत्सव आपणास निश्चितच आध्यात्मिक प्रचितीचा. ता. ३० व १ हे दिवस अश्विनी नक्षत्राच्या व्यक्तींच्या उत्कर्षाचे, तरुणांना विशिष्ट ध्येयपूर्तीचे. भरणी नक्षत्राच्या व्यक्तींसाठी एकूणच सप्ताह जटिल प्रश्न सोडवणारा. दिनांक ४ रोजीचा एकच दिवस सोडला तर बाकी सर्व दिवस चांगले असतील. आतापर्यंत ताणतणावातून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला तरी तसे होत नव्हते. सध्या मात्र ताणतणावाचे वातावरणच निर्माण होणार नाही असे ग्रहमान आहे. त्यामुळे चांगल्या कामाला सुरुवात करण्याचा मार्ग सापडेल. व्यवसायात खूप मोठय़ा प्रमाणात फायद्याची अपेक्षा ठेवून चालणार नाही. कमीतकमी तोटा होत नाही ही परिस्थिती समाधानकारक असेल. नोकरदार वर्गाला वरिष्ठांचे बोलणे ऐकून घ्यावे लागेल. आर्थिकदृष्टय़ा सकारात्मक बदल घडेल. राजकीय क्षेत्रात मन रमणार नाही. घरातील ज्येष्ठ सदस्यांसोबत ज्या गोष्टीवरून वाद होईल अशा गोष्टींवर चर्चाच करू नका.
वृषभ : सप्ताहात गुरुभ्रमण ग्रहांचा पट ताब्यात घेईल. ता. ३० ते १ हे दिवस संकल्प पूर्ण करणारे. नोकरीत भाग्योदय. मृग नक्षत्राच्या व्यक्तींना मोठे लाभ, वास्तुयोग. नोकरीत बढती. रोहिणी नक्षत्राच्या व्यक्तींना मुलाबाळांच्या भाग्योदयातून आनंद. दिनांक ५, ६ रोजीचे दोन दिवस अगदी शब्द ओठावर जरी आले तरी ते समोरच्याला बोलून दाखवू नका. कारण हे शब्द बाहेर पडताना समोरच्याचे मन दुखावले जाणार आहे. तेव्हा कोणताही किंतु परंतु मनात न ठेवता शांत राहा. हे दोन दिवस सोडले तर सर्व दिवस चांगले जातील. पौर्णिमा समाधानकारक असेल. व्यवसायात कोणत्याही जाहिरात माध्यमांचा वापर न करता ही व्यावसायिक वाढ झपाटय़ाने होईल. कलाक्षेत्रात प्रसिद्धी मिळेल. नोकरदार वर्गाला कामाच्या बाबतीत दिलासा मिळेल. आर्थिकदृष्टय़ा कामे मार्गी लागतील. राजकीय क्षेत्रात यश मिळेल.
मिथुन : बुध, गुरू यांचा योग आणि शुक्रभ्रमण आसमंतात पवित्र स्पंदनं निर्माण करतील. स्पंदनं खेचून घ्याच. सत्संगातच राहा. आर्द्रा नक्षत्राच्या व्यक्ती भावुक होतील. नोकरीत भाग्योदय. ता. १ ते ३ सप्टेंबर हे दिवस वैयक्तिक सुवार्तांचेच. पुनर्वसू नक्षत्राच्या व्यक्तींना धनलाभ. या सप्ताहात सर्वच दिवस सतर्कतेने पार पाडावे लागतील. प्रत्येक गोष्टीचे नियोजन आधी करावे लागेल. नियोजन न करता कोणतीही गोष्ट केल्यास विनाकारण चिडचिड वाढेल. एक घाव दोन तुकडे असे करून चालणार नाही. सामंजस्याने कृती करा. बोलताना कठोर वाणी टाळा. पौर्णिमेचा प्रहर सुखकर जाईल. व्यवसायात नवे काही करार करत बसू नका. इतरांवर जबाबदारी टाकू नका. नोकरदार वर्गाला कामाचे तास वाढवावे लागतील. आर्थिकदृष्टय़ा खर्च कमी करा.
कर्क : शुक्रभ्रमण गुरुभ्रमणाची स्पंदनं खेचून देईल. गुरुवारचा दिवस अतिशय पवित्र राहील. आश्लेषा नक्षत्राच्या व्यक्तींना सिद्धी प्राप्त होतील. आवर्तन कराच. कलाकारांना सूर गवसेल. पुष्य नक्षत्राच्या व्यक्तींना मोठे धनलाभ शक्य. व्यावसायिक शुभारंभ. पुनर्वसू नक्षत्राच्या व्यक्तींना प्रसिद्धीचे योग. सध्या ग्रहमानकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. चंद्र ग्रहाची अनुकूलता कशी वाढेल याकडे लक्ष द्या. इतरांच्या सल्ल्याने बदल करणे टाळा. एखादी गोष्ट स्वत: डोळय़ाने बघितल्याशिवाय विश्वास ठेवू नका. त्यामुळे गैरसमज वाढू शकतात. सध्या सप्ताह सर्व गोष्टी शांततेने घ्या. धीर धरूनच काम करावे लागेल. व्यवसायात आजचे काम उद्यावर ढकलून चालणार नाही. उधारीचा व्यवहार टाळा. नोकरदार वर्गाला कामात व्यस्त राहावे लागेल. आर्थिकदृष्टय़ा तडजोड स्वीकारावी लागेल.
सिंह : सप्ताह चंद्राशी होणाऱ्या योगातून गाजणारा. मघा नक्षत्राच्या व्यक्तींना अद्वितीय लाभ होतील. विशिष्ट खरेदी-विक्रीतून लाभ. कायद्याच्या कटकटी संपतील. पूर्वा नक्षत्राच्या व्यक्तींना पुत्रोत्कर्ष धन्य करेल. ता. १ ते ३ हे दिवस मोठी भाग्यबीजं पेरणारे. उत्तरा नक्षत्राच्या व्यक्तींना गौरीपूजन प्रचिती देईल. दिनांक ७, ८ रोजी हे दोन दिवस काळजीपूर्वक गोष्टी हाताळा. कोणत्याही गोष्टीचा विचार न करता निर्णय घेणे त्रासाचे ठरेल. चांगल्या गोष्टींसाठी वेळेची वाट बघावी लागेल. तसेच हे दोन दिवस सोडले तर बाकी दिवस चांगले जातील. व्यवसायातील उत्पादन वाढवण्यासाठी जे धाडसी निर्णय घेणार आहात. ते सध्या तरी नको. कोणतीही गुंतवणूक करणे टाळा. नोकरदार वर्गाने आपल्या मागण्या वरिष्ठांपुढे ठेवताना बोलण्यामध्ये नम्रता ठेवा. आर्थिकदृष्टय़ा खर्चावर नियंत्रण ठेवा. राजकीय क्षेत्रात कोणत्याही कामाचा पुढाकार घेताना उत्साह वाटेल.
कन्या : सप्ताहातील शुभसंबंधित अशीच रास. उत्तरा नक्षत्राच्या व्यक्तींचं सदैव स्वागत होईल. ता. ३० चा सूर्योदय भाग्यलक्षणं घेऊन येईल. हस्त नक्षत्राच्या व्यक्तींना वास्तुयोग. ग्रासणारी पुत्रचिंता जाईल. नोकरीत वरिष्ठांचा अनुग्रह. चित्रा नक्षत्राच्या व्यक्तींचा श्रीमंतांच्या यादीत प्रवेश. दिनांक ९ आणि १० हे दोन दिवस कोणतेही महत्त्वाचे निर्णय घेऊ नका. घ्यावयाचे झाल्यास हे दोन दिवस सोडून कोणत्याही दिवशी घ्या. या दोन दिवसांत जे काही प्रस्ताव येतील, ते स्वीकारण्याचा मोह होईल. मात्र हा प्रस्ताव न स्वीकारलेला चांगला. व्यवसायात आत्तापर्यंत जे प्रश्न उभे राहत होते ते आता मार्गी लागतील. त्यामुळे उत्पादन वाढवणे सहजशक्य होईल. नोकरदार वर्गाचे कामातील नियोजन अचूक ठेवावे लागेल. आर्थिकदृष्टय़ा परिस्थितीत सुधारणा झाली तरी खर्च कमी करा. समाजमाध्यमांचा वापर योग्य पद्धतीने करा. घरगुती वातावरण ठीक राहील.
तूळ : सप्ताहात शुभग्रहांची स्पंदनं राहतीलच; परंतु ती खेचून घ्यावी लागतील. गुरुवारची ऋषिपंचमी मोठी प्रचितीची. स्वाती नक्षत्राच्या व्यक्ती विशिष्ट भावस्पंदनात राहतील. नोकरीतील सावट जाईल. विशाखा नक्षत्राच्या व्यक्तींचे वास्तुविषयक प्रश्न सुटतील. चित्रा नक्षत्राच्या व्यक्तींकडून उंची खरेदी होईल. सप्ताहातील सर्वच दिवस चांगले असतील. कोणाच्या मदतीची अपेक्षा ठेवावी लागणार नाही. याच संधीचा फायदा घेऊन कामाला लागा. व्यवसायात वाढ होण्यासाठी ज्या हालचाली करत होता त्या हालचालीला यश मिळेल. असे म्हणणे वावगे ठरणार नाही. सध्याची व्यावसायिक परिस्थिती उत्तम असेल. नोकरदार वर्गाचे कामकाज सुरळीत ठेवण्यासाठी गती द्यावी लागेल. आळसपणा करून चालणार नाही. आर्थिक व्यवहार पूर्ण होतील. समाजसेवेची आवड राहील.
वृश्चिक : मोठ्या भावस्पंदनांचा सप्ताह. अनुराधा नक्षत्राच्या व्यक्तींना सिद्धी प्राप्त होतील. दैवी संकेत मिळतील. नोकरीतील वर्चस्व वाढेल. ज्येष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींना बुध आणि शुक्र यांच्या विशिष्ट ग्रहयोगातून पतप्रतिष्ठेचा लाभ. ज्येष्ठराजांचं सतत स्मरण ठेवा. श्रीगणेशोत्सव भाग्योदयाचाच. शनिवार धक्कादायक असू शकतो. आठवडय़ाचे सर्व दिवस समाधानाचे असतील. मागील अडचणी सोडवताना जो त्रास होत होता तो सध्या होणारा नाही. सध्याचे वातावरण अनुकूल असेल. वेळेत इतरांची मदत मिळाल्याने डोक्यावरचे ओझे कमी होईल. व्यावसायिकांना सध्याचे दिवस लाभदायक ठरतील. वकील, ज्योतिषी, पत्रकार, दलाली व्यवसाय इत्यादींना प्रसिद्धीचा कालावधी राहील. नोकरदार वर्गाचे कायमस्वरूपी असलेले वरिष्ठांचे दुखणे कमी होईल. आर्थिक बदल विशेष फायद्याचे ठरतील. राजकीय क्षेत्रात मानाचे स्थान मिळेल. घरगुती वातावरण आनंदी राहील.
धनू : बुध-गुरू प्रतियुतीचं पर्व पूर्ण अंमल करेल. तरुणांनो ध्येयावरच लक्ष ठेवा, यश मिळणारच आहे. सप्ताह पूर्णपणे ग्रीन सिग्नल देणारा. नोकरीत भाग्योदय. मूळ नक्षत्राच्या व्यक्तींचा सन्मान होईल. पूर्वाषाढा नक्षत्राच्या व्यक्तींना देवमाणसं भेटतील. उत्तराषाढा नक्षत्राच्या व्यक्तींना व्यवसायातील वसुली. दिनांक ४ रोजीचा एकच दिवस सोडला तर बाकी दिवस उत्तम असतील. पण या एकाच दिवसात मात्र तोंडावरती ताबा ठेवावा लागेल हे मात्र विसरू नका. बऱ्याच दिवसांपासून जी कामे बाकी राहिलेली आहेत ती पूर्ण करण्याच्या मागे लागा. स्वत:हून प्रयत्न केल्याशिवाय कोणती गोष्ट होणार नाही. इतरांच्या भरवशावर राहणे त्रासाचे राहील. व्यवसायात सर्व काही सुरळीत चालू असताना विनाकारण गुंतवणूक करून व्याप वाढवू नका. नोकरदार वर्गाचे कामकाज व्यस्त राहील. आर्थिकदृष्टय़ा खर्च आटोक्यात ठेवा.
मकर : सप्ताहातील कृपांकित रास. श्रीगणेश आपल्यावर अतिशय प्रसन्न राहतील. मौनात राहून आनंद घ्या. धनिष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींवरचा नोकरीतील ताण जाईल. सप्ताहाची सुरुवात मोठ्या धनलाभातून. श्रवण नक्षत्राच्या व्यक्तींना श्रीगणेश सरस्वतीचा अनुग्रह देतील. अर्थातच सिद्धी प्राप्त होतील. कलाकारांचा दिनांक ५, ६ हे दोन दिवस डोक्यावर बर्फ तोंडात खडीसाखर असे वातावरण ठेवावे लागेल. पर्यायी मार्ग स्वीकारण्यापेक्षा आहे त्या परिस्थितीत राहणे सर्वात उत्तम. त्यामुळे पुढील नुकसान टळेल. पौर्णिमा प्रहरात बोलण्यातून गैरसमज वाढणार नाही त्याची काळजी घ्या. बाकी दिवसांचा कालावधी चांगला असेल. व्यवसायात इतरांचे सहकार्य मिळेल. गुंतवणूक फायद्याची ठरेल. नोकरदार वर्गाला आगामी काळासाठी व्यवस्थापन करावे लागेल. आर्थिकदृष्टय़ा बचतीकडे कल राहू द्या. राजकीय क्षेत्रात मन लागणार नाही. मुलांच्या प्रकृतीची काळजी घ्या. घरगुती वातावरण ठीक राहील.
कुंभ : सध्या आपणास सेन्सॉर लागू आहे. अर्थातच वक्री शनीचं भ्रमण आपणावर नजर ठेवून आहे. असो. परंतु, आपल्या राशीस शुभग्रहांची रसद पुरवली जातच आहे. शततारका नक्षत्राच्या व्यक्तींना ती सप्ताहात मिळेलच. आर्थिक चिंता जाईल. पुत्रचिंता जाईल. धनिष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींना वास्तुयोग. पूर्वा भाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींना न्यायालयीन कामकाजात यश मिळेल. दिनांक ७, ८ रोजी कोणाच्याही वैयक्तिक गोष्टीत हस्तक्षेप करू नका. स्वत:ची जबाबदारी स्वत: पार पाडा. इतरांवर अवलंबून राहू नका. त्यामुळे आजचे काम उद्यावर ढकलले जाईल हे लक्षात घ्या. बाकी दिवसांचा कालावधी चांगला जाईल. व्यवसायात परिश्रम वाढवावे लागले तरी चालेल. पण प्रयत्न सोडू नका. त्याचे फळ हे चांगले मिळेल. निश्चितच नवे ध्येय गाठाल. नोकरदार वर्गाला कामात स्वास्थ्य मिळेल. आर्थिक उलाढाली वाढतील. सामाजिक क्षेत्रात अनेकांशी सुसंवाद साधाल. मित्रांचे सहकार्य मिळेल. मुलांची आवड-निवड जपाल. कौटुंबिक जीवन सुखाचे राहील.
मीन : सप्ताह नक्षत्रलोकांतून अनुग्रह करणारा. राशीचा गुरू ग्रहयोगातून सर्वंकष बोलेल. तरुणांचा आत्मविश्वास प्रचंड वाढेल. उत्तम पॅकेजची नोकरी मिळेल. उत्तरा भाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींना छान विवाहस्थळं येतील. चिकित्सा करू नका. रेवती नक्षत्राच्या व्यक्तींना एक वेगळाच भावोन्मेष राहील. सतत प्रसन्न राहाल और क्या! दिनांक ९, १० रोजीचे दोन दिवस कोणाशीही संवाद करताना जपून करा. द्विधा अवस्थेत निर्णय घेऊ नका. टोकाची भूमिका टाळा. व्यावसायिकदृष्टय़ा आवक-जावक उत्तम राहील. अनेक क्षेत्रांत कार्यरत राहाल. कामे सफल होतील. नोकरदार वर्गाच्या कामातील तांत्रिक अडचणी दूर होतील. आर्थिकदृष्टय़ा स्वावलंबी बनाल. राजकीय क्षेत्रात कामाचा मोबदला चांगला मिळेल. नातेवाईकांशी हितसंबंध बिघडणार नाही याची काळजी घ्या. शेजाऱ्यांशी जेवढय़ास तेवढे राहा.