मेष : बोलताना नकळत आपल्याकडून एखादी व्यक्ती दुखावली जाणार नाही याची काळजी घ्या. कोणतेही काम विचारपूर्वक करा. स्वत:चे काम स्वत:च्या जबाबदारीवर करा. बाकी दिवसांचा कालावधी चांगला असेल. नोकरदार वर्गाला कामाच्या बाबतीत आघाडी मिळवता येईल. व्यवसायात मागणी तसा पुरवठा करणे शक्य होईल. उत्पादनात वाढ होईल. आर्थिक वाटचाल सोपी होईल. समाजसेवा करताना स्वत:ला झेपतील अशाच गोष्टी करा. दिनांक ९, १० रोजीचे दोन दिवस व कोजागरी पौर्णिमा या कालावधीत तेवढे संयम ठेवून वागावे लागेल.
वृषभ : पौर्णिमा कालावधीमध्ये ठरवलेला हेतू निश्चितच साध्य होईल. नोकरदार वर्गाने एकाच गोष्टीवर आडून न राहता बाकी कामकाजाकडेही लक्ष द्यावे लागेल. व्यवसायात पळापळ झाली तरी ती फायद्याची असेल. व्यापारी वर्गाला मोठा दिलासा मिळेल. आर्थिकदृष्टय़ा खर्च कमी करा. समाजमाध्यमांचा वापर योग्य पद्धतीने करा. नवीन ओळखीचा फायदा होईल. दिनांक ११, १२ या दोन दिवसांत अस्वस्थता जाणवू लागेल. कोणत्याही गोष्टीत मन लागणार नाही. धीर धरून प्रत्येक गोष्ट करायला हवी. अति विचार करून काहीही साध्य होणार नाही. तेव्हा सावरण्याचा प्रयत्न करा व मार्ग कसा काढता येईल हे बघा.
मिथुन : नोकरदार वर्गाला महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडण्यात यश मिळेल. व्यवसायातून मिळणारे उत्पन्न चांगले राहील. नवीन योजना अमलात आणाल. आर्थिकदृष्टय़ा खर्चाच्या बाबी लक्षात घ्या. कुठेही अनावश्यक खर्च होणार नाही याची काळजी घ्या. जोडीदाराच्या मनोकामना पूर्ण कराल. दिनांक १३, १४ रोजी कोणत्या वेळी कोणता प्रसंग येईल हे सांगू शकत नाही. दरवेळीप्रमाणे भावनेच्या आहारी जाऊन निर्णय घेणे त्रासाचे ठरते. मात्र या दोन दिवसांत चर्चा चांगली असो वाईट या चर्चेत सहभाग टाळा. त्यामुळे कोणतीच गोष्ट अंगलट येणार नाही.
कर्क : दिनांक १५ रोजीचा एकच दिवस महत्त्वाचे काम करू नका. बाकी दिवस उत्तम राहतील. पौर्णिमा भाग्य स्थानातून होत आहे. ही पौर्णिमा निश्चितच शुभ संकेत देईल. नोकरदार वर्गाच्या कामात बदल होतील. व्यवसायातील डावपेच वेळीच लक्षात घेतल्यास नुकसान होणार नाही. व्यवसायात एकाच गोष्टीवर अवलंबून राहू नका. अनेक माध्यमांतून लाभ मिळतील. आर्थिक आवक वाढेल. समाजसेवा करण्याचा मोह निर्माण होईल. नातेवाईकांचे सहकार्य मिळेल.
सिंह : नोकरदार वर्गाने वरिष्ठांनी सांगितलेल्या गोष्टी वेळेत पूर्ण कराव्या लागतील. त्या वेळेत न झाल्यामुळे वरिष्ठांचे बोलणे खावे लागेल हे मात्र लक्षात ठेवा. व्यापारी वर्गाला कितीही अंदाज असला तरी मोठे धाडस करून चालणार नाही. आर्थिक व्यवहार जपून करा. सार्वजनिक ठिकाणी हस्तक्षेप करणे टाळा. नातेवाईकांच्या वैयक्तिक गोष्टीत पडू नका. दिनांक ९ आणि १० असे हे दोन दिवस उदास वाटू लागतील. कोणतेही काम केले तरी त्यात यश मिळत नाही असे वाटू लागेल. त्यासाठी हे दोन दिवस थांबा. या दोन दिवसांनंतर मात्र तुमची निर्णय क्षमता वाढेल.
कन्या : कोणाशीही बोलताना मात्र संवाद जपून करा. कोजागरी पौर्णिमा चांगल्या करमणुकीची राहील. नोकरदार वर्गाला वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. व्यावसायिक स्तरावर निर्माण झालेल्या अडचणीवर मात कराल. स्पर्धात्मक गोष्टींच्या मागे लागू नका. आर्थिकदृष्टय़ा भावनिक विचार टाळा. राजकीय क्षेत्रात वर्चस्व राहील. भाऊ- बहीण या नात्यात गैरसमजाचे वादळ दूर ठेवा. १० तारखेला दुपारनंतर ११ व १२ संपूर्ण दिवस असा हा कालावधी जेमतेम राहील. हे दिवस पुढे ढकलण्याचे प्रयत्न करा. जाणून बुजून याच दिवशी महत्त्वाची कामे काढू नका.
तूळ : एक ना धड भाराभर चिंध्या असे न करता एकाच गोष्टींवर ठाम राहा. वादविवाद या गोष्टींपासून लांब राहा. जग हे व्यवहारावर चालते. भावनिक होऊन व्यवहार करू नका. व्यवहाराचा भाग इतरांच्या हाती सोपवू नका. पौर्णिमा ही षष्ठस्थानातून होत आहे. या कालावधीत समतोल राखा. नोकरदार वर्गाची काम करतानाची भूमिका नम्र असायला हवी. रागाच्या भरात कोणतेही निर्णय घेऊ नका. व्यवसायात जबाबदारीने निर्णय घ्यावे लागतील. उधारीचा व्यवहार टाळा. आर्थिकदृष्टय़ा स्वावलंबी बना.
वृश्चिक : इतरांच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका. आपल्याला जे योग्य वाटते तेच करायचे हे लक्षात घ्या. पौर्णिमेचा दिवस तेवढा चांगला जाईल. बाकी दिवसात काळजी घ्या. नोकरदार वर्गाला आपलेच म्हणणे खरे करून चालणार नाही. व्यवसायात जे उत्पन्न मिळणार आहे. त्यातच समाधान माना. जास्तीची उलाढाल करू नका. मित्र-मैत्रिणीचे सहकार्य लाभेल. जोडीदाराच्या भावना दुखावू नका. चिडचिड करणे टाळा. सप्ताहातील सर्व दिवस सारखे नसतील. प्रत्येक दिवस हा चढउतारांचा राहील. या कालावधीत सहनशीलता ठेवा. एखाद्या गोष्टीविषयी वाटणारी चिंता कमी कशी करता येईल हे बघा.
धनू : स्वत:च काही गोष्टी नियंत्रणात ठेवल्या तर त्याचा त्रास होणार नाही. कोजागरी पौर्णिमा सर्वासोबत मोठय़ा उत्साहाने साजरी कराल. बाकी दिवस चांगले जातील. नोकरदार वर्गाचे कामकाज सुरळीत चालू राहील. व्यावसायिकदृष्टय़ा प्रगती होईल. आगामी काळासाठी केलेली तरतूद फायद्याची ठरेल. फायद्याचे प्रमाण वाढते राहील. आर्थिक बाबतीत खर्च मात्र कमी करण्याचा प्रयत्न करा. राजकीय क्षेत्रात तुमची काम करण्याची पद्धत योग्य असेल. कामापुरते जवळ करणाऱ्या मैत्रीशी दोन हात लांब राहा. मुलांच्या तब्येतीची काळजी घ्या.
मकर : प्रत्येक गोष्टीमध्ये हुरूप वाटेल. हाती घेतलेले काम पूर्ण करण्याचा प्रयत्न कराल. नोकरदार वर्गाचे कामकाजातील नियोजन यशस्वी ठरेल. व्यवसायात समयसूचकतेने काम कराल. प्रत्येक दिवसाची दिनचर्या ही व्यस्त राहील. व्यावसायिकदृष्टय़ा मेहनतीचे फळ मिळेल. आर्थिकदृष्टय़ा सक्षम बनाल. कौटुंबिक जीवन सुखाचे राहील. सप्ताहातील सर्वच दिवस चांगले असतील. कोजागरी पौर्णिमा पराक्रम स्थानातून होत आहे. ही पौर्णिमा मनाला सुखद आनंद देणारी असेल.
कुंभ : या सप्ताहातील सर्व दिवस चांगले जातील. कामे होत नाहीत म्हणून प्रत्येक गोष्टीच्या तळाशी जाण्याची गरज नाही. कितीही प्रयत्न केला तरी काही गोष्टी पुढे सरकत नव्हत्या अशा गोष्टींना गती येईल. बऱ्याच वेळा अडचणींना सामोरे जावे लागले. आता ही परिस्थिती राहणार नाही. संधी आली आहे, तिचा उपयोग करून घ्या. कोजागरी पौर्णिमेनिमित्त सहकुटुंब- सहपरिवार या पौर्णिमेचा एकत्रित आनंद घ्याल. नोकरदार वर्गाला कामामध्ये आपल्यापेक्षा ज्येष्ठ असलेल्या व्यक्तींचा सल्ला घेणे योग्य राहील. व्यावसायिकदृष्टय़ा धरसोड वृत्ती ठेवता स्थिर राहा. आर्थिकदृष्टय़ा पैशाचे पाठबळ वाढेल.
मीन : स्वत:च्या कर्तृत्वावर बरेच काही साध्य करू शकाल. हातून शुभ कार्य घडेल. कोजागरी पौर्णिमा तुमच्या राशीतूनच होत आहे. या पौर्णिमा कालावधीत व्यक्तिमत्त्व खुलेल. नोकरदार वर्गाचे वरिष्ठांविषयी असलेले गैरसमज दूर होतील. व्यावसायिक वाढ झपाटय़ाने होईल. भागीदारी व्यवसायातून अपेक्षित नफा मिळेल. आर्थिक बाबतीत सफलता मिळेल. समाजसेवेसाठी वेळ द्याल. शेजाऱ्यांशी मात्र जेवढय़ास तेवढे राहा. नातेवाईकांशी संवाद जपून करा. दर सप्ताहात चढ-उतारांचे दिवस जरी असले तरी सध्या या सप्ताहातील दिवस उत्तम असतील. प्रत्येक गोष्टीत ठाम नेतृत्व राहील.