मेष : या आठवड्यात तुम्हाला अनेक प्रलंबित कामे पूर्ण करावी लागतील. जास्त कामामुळे तणाव असू शकतो. आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील. हा वर्षाचा शेवटचा आठवडा आहे. आरोग्याची काळजी घ्या. व्यवसायात वाढ होईल. जमीन आणि घरामध्ये असणारा वाद मध्यस्थाच्या माध्यमातून सुटू शकतो. कुटुंबातील सदस्याची मोठी चिंता दूर होईल.
वृषभ : या आठवड्यात त्यांच्या बोलण्यावर आणि शब्दांवर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. दैनंदिन कामे मार्गी लागतील. कोणतेही काम उत्साहात करू नका. या आठवड्यात तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून भेटवस्तू मिळू शकते. मनोबल उत्तम राहील. बढती-बदलीची इच्छा पूर्ण होई. नोकरी करणारे लोकांना कामाच्या बाबतील लांबचा प्रवास करावा लागेल.
मिथुन : व्यवसाय करणाऱ्या लोकांना आज फायदा होऊ शकतो. काहींना कामाचा ताण व दगदग जाणवेल. रागावर नियंत्रण ठेवा. वादविवाद टाळावेत. या आठवड्यात तुमचे तुमच्या मित्रांशी भांडण होऊ शकते, प्रकरण जास्त पुढे नेऊ नका. तुमच्या रागावर नियंत्रण ठेवून कोणतेही पाऊल उचलण्यापासून दक्ष राहावे लागेल.
कर्क : या आठवड्यात खूप सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. शत्रूंपासून सुरक्षित अंतर ठेवा. नवीन परिचय होतील. शेअर बाजार किंवा सट्टेबाजीत पैसे गुंतवू नका. लोकांच्या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये अडकून पडण्यापेक्षा तुम्ही तुमच्या कामावर लक्ष देणे उत्तम आहे. तुमच्या उत्पन्नाच्या मार्गात वाढ होणार असून संपत्तीत देखील वाढ होणार आहे.
सिंह : या आठवड्यात तुम्हाला कुटुंबाकडून चांगली बातमी मिळेल. तुम्हाला काही मोठी जबाबदारी मिळेल. मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. पैसे गुंतवताना कोणाचा तरी सल्ला जरूर घ्या. राजकीय व सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल. जमीन, घराच्या संबंधित वादासाठी कोर्ट-कचेरीत जाण्याऐवजी चर्चेने, सहमतीने सोडवणे चांगले असेल. खोटी साक्ष देणे अथवा खोटी सही करणे यामुळे तुम्हाला दंड भरावा लागेल.
कन्या : या आठवड्यात तुम्हाला करिअर आणि व्यवसायात प्रगती दिसेल. एखादी भाग्यकारक घटना घडेल. या आठवड्यात जोखीम तुम्हाला लाभ देईल. मानसिक स्वास्थ्य व समाधान लाभेल. लोकांची मने जिंकण्यात यशस्वी व्हाल. आठवड्याच्या सुरुवातीलाच जुन्या समस्यांचे निराकरण झाल्यामुळे तुम्हाला समाधान मिळेल. तुम्हाला कोणाला प्रपोज करणार असाल तर या आठवड्यात त्यामध्ये तुम्ही सफल व्हाल.
तुळ : या आठवड्यात कुटुंबातील एखाद्या व्यक्तीचा सल्ला तुम्हाला अतिरिक्त पैसे मिळवण्यात मदत करेल. महत्त्वाचे आर्थिक आर्थिक निर्णय शक्यतो पुढे ढकलावेत. काहींना मानसिक अस्वस्थता जाणवेल. या आठवड्यात मानसिक शांती बिघडू शकते. नोकरी करणाऱ्यांसाठी उत्पन्नाचे अतिरिक्त मार्ग समोर येतील.कोणाकडून तुम्ही कर्ज घेतले असेल तर या आठवड्यात त्याची परतफेड कराल.
वृश्चिक : या आठवड्यात तुमच्या मनोकामना प्रार्थनेने पूर्ण होतील आणि नशीब तुमच्या वाट्याला येईल. वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल. या आठवड्यात तुम्ही तुमचे सर्व कर्ज फेडण्यात यशस्वी व्हाल. नवी दिशा व नवा मार्ग सापडेल. वृश्चिक राशीच्या लोकांनी या आठवड्यात तब्येतीकडे लक्ष देणे जरुरी आहे. आठवड्याच्या शेवटी हवामान बदलामुळे होणाऱ्या आजरांचा सामना करावा लागेल.
धनु : या आठवड्यात तुम्हाला तुमच्या वरिष्ठांचे आणि सहकाऱ्यांचे सहकार्य मिळणार नाही, ज्यामुळे तुम्ही प्रत्येक काम पूर्ण करू शकणार नाही. शासकीय कामे रखडण्याची शक्यता. वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता. यामुळे अचानक मानसिक तणाव वाढण्याची शक्यता आहे. नोकरी करणाऱ्यांसाठी नवीन नोकरीचे संधी येईल तर व्यापार करणाऱ्यांसाठी व्यवसाय वाढ होणार आहे. आठवड्याच्या उत्तरार्धामध्ये तुमचा वेळ समाजसेवा अथवा धार्मिक कार्यात जाईल.
मकर : या आठवड्यात तुम्हाला आर्थिक संकटामुळे मानसिक तणाव आणि चिंतेचाही सामना करावा लागू शकतो. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी व प्रसिद्धी लाभेल. शेअर बाजाराशी संबंधित कोणत्याही प्रकारची गुंतवणूक लाभाची ठरेल. आठवड्याच्या मध्यात करिअर आणि व्यवसायाच्या बाबतीत दूरचा अथवा जवळचा प्रवास करावा लागेल. हा प्रवास शुभ होईल.
कुंभ : या आठवड्यात तुमच्यासाठी व्यवसायात चांगला नफा मिळण्याची शक्यता आहे. कामानिमित्त प्रवास होतील. अतिरिक्त पैसे कोणत्याही रिअल इस्टेट प्रकल्पात किंवा जमीन-संपत्तीमध्ये गुंतवल्यास फायदा. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. आरोग्याची काळजी घ्या. प्रवास सुखद आणि मनोरंजक होईल. या दरम्यान तुम्हाला नातेसंबंध जपण्याबरोबर त्यांच्यासोबत आनंदाने वेळ घालवता येईल. समाजात तुमची लोकप्रियता आणि प्रतिष्ठा वाढेल.
मीन : या आठवड्यात तुमच्या आयुष्यात अचानक अनेक प्रकारचे खर्च येऊ शकतात, ज्यामुळे इच्छा नसतानाही तुमच्यावर अतिरिक्त आर्थिक बोजा वाढू शकतो. एखादी महत्त्वाची जबाबदारी येऊन पडेल. घाईगडबडीत कोणतीही मोठी गुंतवणूक करू नका, अन्यथा हा नफाही तोट्यात बदलू शकतो. व्यवसाय किंवा प्रकल्पात गुंतवणुकीसाठी हा कालावधी चांगला आहे. आठवड्याच्या उत्तरार्धात तुम्हाला व्यापारासाठी दूरचा प्रवास करावा लागेल.