मेष : काहींचा मनोरंजनाकडे कल राहील. आरोग्य उत्तम राहील. स्वत:हून कोणाशी वैर निर्माण करू नका. ११, १२ हे संपूर्ण दिवस, १३ तारखेला दुपापर्यंत या अडीच दिवसांच्या कालावधीत संयम ठेवून वागा. प्ताहात अमावस्येच्या प्रभावक्षेत्रात दुखापतींचा काळ ठरू शकतो. गर्दीच्या ठिकाणी वाहने सांभाळा. मोठ्या प्रवासाची या आठवड्यात शक्यता असून हा प्रवास सुखकर आणि लाभदायक असेल.
वृषभ : मनोबल कमी राहील. खर्चाचे प्रमाण वाढेल. या आठवड्यात तुमची कामे वेगाने पूर्ण होतील पण त्याचबरोबर काही कामांमध्ये तुम्ही अडकून पडाल. आठवड्याच्या सुरुवातीला कामाच्या ठिकाणी काही समस्या तुम्हाला त्रास देऊ शकतात. वाहतुकीत सांभाळा. पोलिसांशी हुज्जती नको.व्यवसायातून मिळणारे उत्पन्न वाढेल. नोकरदार वर्गाला कामाचे व्याप वाढेल. आर्थिक नियोजन पक्के करा.
मिथुन : मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. नवीन परिचय होतील. अनोळख्या व्यक्तीपासून दोन हात लांब राहा. क्षणिक गोष्टींचा मोह टाळा. व्यवसायात सध्या नवीन कोणतेही बदल करू नका. अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेली तुमची कामं या आठवड्यात पूर्ण होऊ शकतात. कामाच्या ठिकाणी तुम्हाला काही त्रास होऊ शकतो. राजकीय, सामाजिक क्षेत्रात क्षुल्लक आरोपांना उत्तरे देऊ नका.
कर्क : सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल. दैनंदिन कामे मार्गी लागतील. नोकरीधंद्यात सावधपणे निर्णय घ्या. प्रवासात घाई नको. धंद्यात अरेरावी नुकसानकारक. राजकीय, सामाजिक क्षेत्रात वरीष्ठांच्या विरोधात जाऊ नका. गुरुवार आणि शुक्रवार तुमच्यासाठी थोडा चिंताजनक असू शकतो. या दोन दिवसांत तुम्हाला कुठून पैसे मिळत असतील तर मिळणारे पैसेही अडकू शकतात. नोकरदार वर्गाला कामाचा अनुभव नवीन असेल. अनावश्यक खर्च टाळा.
सिंह : जिद्द व चिकाटी वाढेल. उत्साह व उमेद वाढविणारी एखादी घटना घडेल. नोकरीच्या ठिकाणी बढतीची शक्यता. धंद्यात वसुलीचा प्रयत्न करा. या आठवड्यात तुम्ही तुमच्या कुटुंबाबद्दल चिंतेत असाल. घरात साप किंवा विंचू येऊ शकतात, त्यामुळे थोडं सावध राहा. व्यवसायातून मनासारखे उत्पन्न मिळेल. पण मिळालेल्या उत्पन्नाचा त्वरित गुंतवणुकीत रूपांतर करा. खर्च सांभाळण्याचा प्रयत्न करा. आठवड्याच्या सुरुवातीला तुम्हाला कामाशी संबंधित काही समस्यांना सामोरे जावे लागू शकते.
कन्या : वाहने जपून चालवावीत. तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील. कामाचा ताण अचानक वाढल्याने आणि सहकाऱ्यांची मदत न मिळाल्याने मानसिक ताण येईल. परदेशातून व्यवसाय करणाऱ्यांना मोठा ठेका मिळू शकतो. आठवड्याच्या उत्तरार्धात लक्झरी किंवा घराच्या सजावटीवर तुम्ही मोठ्या प्रमाणात पैसे खर्च करू शकता. राजकीय क्षेत्रात वर्चस्व वाढेल. मित्र-मैत्रिणींच्या शुभेच्छा मिळतील. या आठवड्यात घर, कुटुंब आणि कार्यालयात तुमचं वर्चस्व वाढेल.
तूळ : जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. संततिसौख्य लाभेल. या आठवड्यात तुमच्या उत्पन्नात लक्षणीय सुधारणा होईल. अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेली तुमची कामं या आठवड्यात पूर्ण होऊ शकतात. आतापर्यंत ज्यांच्याकडून आपल्याला सहकार्य मिळत नव्हते ते सहकार्य आता मिळणार आहे. तेव्हा चिंता करत बसू नका. आपले काम अगदी सहज मार्गी होणार आहे. विरोधक स्वत: तुमच्यासोबत तडजोड करण्यासाठी पुढाकार घेऊ शकतात. नोकरदार महिलांसाठी आठवड्याचा उत्तरार्ध थोडा आव्हानात्मक असू शकतो.
वृश्चिक : शासकीय कामे मार्गी लागतील. कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. तुमच्या क्षेत्रातील अंदाज बरोबर येतील. प्रेरणादायक वातावरण राहील. नोकरीतील तणाव कमी होईल. धंद्याला कलाटणी मिळेल. आळस बाजूला सारा व कामाचे नियोजन करा. व्यवसायात मोठी गुंतवणूक कराल. तुमचं उत्पन्न वाढेल आणि तुम्ही आनंदी व्हाल. तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळेल. शुक्रवार आणि शनिवारी तुम्हाला कुठूनतरी पैसे मिळतील आणि गुंतवलेल्या पैशात नफाही मिळेल.
धनु : महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील. सौख्य व समाधान लाभेल. व्यवसायात जुने व्यवहार काही बाकी असतील तर ते व्यवहार करताना काळजी घ्या. नोकरदार वर्गाचा कामाचा व्याप वाढता राहील.कोणत्याही मोठ्या व्यासपीठावर तुमचा सन्मान होवू शकतो. नोकरदार मंडळींसाठी आनंदाची बातमी आहे इच्छित ठिकाणी किंवा कोणत्याही मोठ्या पदावर तुमची बदली होवू शकते. तुम्हाला त्रासदायक बातम्या देखील मिळू शकतात, परंतु काळजी करू नका, कारण शेवट आनंदी असेल.
मकर : वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. मनोबल उत्तम राहील. या आठवड्यात तुमच्या आयुष्यात कोणत्याही प्रकारची समस्या येणार नाही. घराच्या आत आणि बाहेर सर्वत्र यश मिळेल. बुधवार आणि गुरुवारी उत्पन्नात वाढ होईल. व्यवसायात अपेक्षित व्यवहार होतील. नोकरदार वर्गाला काम पूर्ण झाल्याचा आनंद असेल.प्रत्येक गोष्टीत नियोजन महत्त्वाचे राहील. व्यवसायात अनपेक्षित लाभ झाल्याने मन प्रसन्न राहील. एखाद्या खास व्यक्तीच्या मदतीने लाभदायक योजनांमध्ये सामील होण्याची संधी मिळेल.
कुंभ : वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता. आपल्या मतांविषयी आग्रही रहाल. व्यावसायिकदृष्टय़ा आवकजावक उत्तम राहील. नोकरदार वर्गाला दिलासा मिळेल. आर्थिक व्यवहार करताना वरिष्ठांचे मार्गदर्शन घेतलेले चांगले. आठवड्याच्या उत्तरार्धात आपण अचानक मित्र किंवा कुटुंबियांसमवेत लांब पल्ल्याच्या पर्यटन सहलीवर जाऊ शकता. या आठवड्यात नवीन कामं मिळण्याची शक्यता आहे. बुधवार आणि गुरुवार हे दोन दिवस खूप चांगले राहतील. धंद्यात नुकसान टाळा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात अनेक कामे मार्गी लावता येतील.
मीन : वादविवाद टाळावेत. वाहने जपून चालवावीत. मैत्रीतील गैरसमज दूर होतील. नोकरीत वर्चस्व राहील. आर्थिक पाया मजबूत राहील आणि कामाच्या ठिकाणी वर्चस्व वाढेल आणि तुमची कामगिरी तुमच्या समवयस्कांपेक्षा चांगली असेल. व्यवसायात अपेक्षेपेक्षा जास्त फायदा होईल. नोकरदार वर्गाला संधी मिळेल. आर्थिकदृष्टय़ा स्वावलंबी बनाल. व्यवसायाशी संबंधित लोकांना आठवड्याच्या उत्तरार्धात पैशाच्या व्यवहारात विशेष काळजी घ्यावी लागेल.