मेष : या आठवड्याच्या सुरुवातीला त्यांच्या वैयक्तिक जीवनात आणि व्यवसायात काही महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागू शकतात. जुन्या आठवणींमध्ये रमणार आहात. तुम्हाला तुमच्या सहकाऱ्यांचे अपेक्षित सहकार्य लाभेल. आठवड्याच्या अखेरीस व्यापराची गाडी रुळावर येईल. बौद्धिक क्षेत्रातील व्यक्तींना अपेक्षित सुयश लाभणार आहे. व्यवसायात अपेक्षित धनलाभ होईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात दगदग, धावपळ होईल.
वृषभ : उद्योग व्यवसायात अपेक्षित प्रगती साध्य करू शकणार आहात. या आठवड्याच्या सुरुवातीला तुम्ही पैशाचे नियोजन करण्यात यशस्वी झाला तर अपेक्षित यश मिळू शकेल. आपल्याला दैनंदिन कामात सुयश लाभेल.वाहन चालवताना सावध राहावे, अपघाताची शक्यता आहे. मानसिक प्रसन्नता लाभणार आहे. राजकीय, सामाजिक कार्याला नेटाने पुढे नेता येईल. वरिष्ठ कामाचे कौतुक करतील. लोकसंग्रह वाढेल.
मिथुन : करिअर आणि व्यवसायात प्रगती करण्याच्या अनेक संधी तुम्हाला मिळू शकतात. लांबचा किंवा जवळचा प्रवास होऊ शकतो. तुमच्या कार्यक्षेत्रात तुम्हाला अपेक्षित संधी लाभणार आहे. प्रसिद्धी लाभेल. मनोबल व आत्मविश्वास उत्तम राहील. नोकरदार व्यक्तींना कामाच्या ठिकाणी एखादी मोठी जबाबदारी मिळू शकते. चिकाटीने कार्यरत राहणार आहात. मनोबल उत्तम राहील. नातेवाइक भेटतील. थकबाकी मिळवा. नवे परिचय फायदेशीर ठरतील. राजकीय, सामाजिक कार्याला मेहनतीने पूर्ण करा.
कर्क : प्रॉपर्टी खरेदी अथवा विक्रीचे स्वप्न पूर्ण होईल. या व्यवहारात तुम्हाला फार चांगला नफा होईल. दैनंदिन कामे रखडणार आहेत. आज तुम्हाला एखादी चिंता सतावणार आहे. आज तुमचे मन नाराज राहणार आहे. व्यापाराशी संबंधित एखादा मोठा व्यवहार पूर्ण होईल. कामाचा ताण व दगदग जाणवणार आहे. महत्त्वाची कामे आज नकोत. धंद्यात फसगत टाळा. नवीन ओळख फसवी ठरेल. राजकीय, सामाजिक कार्यात तुमचे मुद्दे प्रभावी ठरतील.
सिंह : आज तुम्हाला करिअर आणि व्यापारासंबंधित एखादी मोठी संधी मिळू शकते. तुमचा उत्साह व उमेद वाढणार आहे. सत्ता आणि सरकारशी संबंधित लोकांसाठी ही वेळ फार शुभ आहे. आनंददायी वातावरणात काम करायला मिळेल. तुमचा इतरांवर प्रभाव असणार आहे. आरोग्य उत्तम राहणार आहे. मानसिक प्रसन्नता लाभणार आहे. राजकीय, सामाजिक कार्यात अडचणी, अडथळे येतील. कुणालाही कमी लेखू नका.
कन्या : या आठवड्याच्या सुरुवातीला तुम्हाला वेळ आणि तुमची ऊर्जा याचे नीट नियोजन करता आले तर तुम्हाला अपेक्षित यश मिळेल. तुमचे मन नाराज असणार आहे. आठवड्याच्या मध्याला दिलासा मिळेल. कामामध्ये लक्ष लागणार नाही. आज आपण विनाकारण एखादी चिंता करणार आहात. मनोबल कमी राहील. वाहने सावकाश चालवावीत. काहींना अचानक धनलाभ होईल. राजकीय. सामाजिक क्षेत्रात जवळच्या व्यक्तीला दुखवू नका. अहंकाराची भाषा नुकसानकारक.
तूळ : व्यापारी दृष्टिकोनातून वेळ तुमच्यासाठी अनुकूल राहील. तुमच्या उत्पन्नात सातत्याने वाढ होत जाईल. संततीसौख्य लाभणार आहे. मनोबल वाढणार आहे. आपल्या प्रियजनांशी सुसंवाद साधणार आहात. करिअर आणि व्यवसायात येत असलेल्या अडचणी शुभचिंतकांच्या मदतीने दूर होतील. काहींना जुने मित्र-मैत्रिणी भेटल्याने विशेष आनंद होणार आहे. आरोग्य उत्तम राहील. राजकीय, सामाजिक कार्यात मत प्रदर्शित करण्याची घाई नको. उत्साह, आत्मविश्वास वाढेल. स्वतवर नियंत्रण ठेवा.
वृश्चिक : आठवड्याच्या मध्याला काही मोठे खर्च येऊ शकतात, त्यामुळे तुमचे बजेट कोलमडू शकते. मानसिक प्रसन्नता लाभेल. हंगामी आजाराच्या दृष्टीने विशेष सतर्क राहा. तुमच्या आशा-आकांक्षा पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील राहाल. दैनंदिन कामात सुयश लाभणार आहे. आरोग्य उत्तम राहील. तुमचा इतरांवर विशेष प्रभाव राहील. नव्या कामात प्रगती होईल. प्रतिष्ठा वाढेल. आर्थिक व्यवहारात सावध रहा.
धनु : सत्ता आणि सरकारशी संबंधित लोकांशी तुम्हाला मदत आणि आर्थिक लाभ मिळेल. तुमच्यातील चिकाटी वाढणार आहे. तुमच्या कार्यक्षेत्रात तुम्ही तुमच्या कामाची छाप पाडू शकणार आहात.या आठवड्यात काही प्रिय लोक घरी येतील, त्यामुळे आनंदाचे वातावरण राहील. मानसिक प्रसन्नता लाभणार आहे. नातेवाइकांचे अपेक्षित सहकार्य लाभणार आहे. लाभ होईल. राजकीय, सामाजिक कार्यात धावपळ होईल. तडजोड करावी लागेल. प्रतिष्ठेचा मोह ठेवू नका. लोकप्रियता मिळेल.
मकर : आर्थिक विषयांत नियोजनबद्धरीत्या काम केल्याने लाभ होण्याची शक्यता आहे. कुटुंबातील व्यक्तींसोबत आजचा दिवस आपण आनंदाने व्यतीत करणार आहात. तुमच्या पाठीमागे तुमचे नुकसान करू इच्छित असलेल्या लोकांपासून तुम्हाला अंतर ठेवावे लागणार आहे. प्रवास सुखकर होतील. व्यवसायातील जुनी येणी व उधारी अनपेक्षितपणे वसूल होणार आहे. मनोबल उत्तम असणार आहे. धंद्यात नवे काम मिळेल. कर्जाची व्यवस्था करता येईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात कार्याला नवी दिशा मिळेल.
कुंभ : उत्पन्नाच्या तुलनेत खर्च जास्त राहील, त्यामुळे बजेट बिघडून जाईल. हा आठवडा आपणाला अनेक बाबतीत अनुकूल आहे. तुम्ही आशावादी राहणार आहात. आठवड्याच्या मध्यास संपत्तीशी संबंधित एखाद्या विषय चिंतेचे कारण ठरेल. आरोग्य उत्तम राहील. सकारात्मकतेने काम करत राहणार आहात. प्रवासातून आनंद मिळणार आहे. राजकीय, सामाजिक कार्याला योग्य वळण देता येईल. तुमचे मुद्दे प्रभावी ठरतील. लोकप्रियता वाढेल.
मीन : व्यावसायिक उद्देशाने तुम्हाला जवळचा किंवा एखादा दूरचा प्रवास करावा लागू शकतो. आज तुम्ही आराम करणार आहात. काहींचा धार्मिक कार्यात सहभाग राहील. खाद्या प्रभावशाली व्यक्तीच्या मदतीने एखादी मोठी समस्या मार्गी लागल्याने दिलासा मिळेल. मनोरंजन व करमणुकीसाठी खर्च करणार आहात. प्रवासात व वाहने चालविताना विशेष काळजी घ्यावी. अनाठायी खर्च टाळा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात सर्वांच्या मतानुसार निर्णय घ्या.