मेष : सप्ताहाच्या मध्यावर भावनिक ताणतणाव होईल. मनावर दडपण येईल. आपल्या हातून चांगले काम घडेल. मानसिक अस्वस्थता जाणवू देऊ नका. नोकरीत हुशारी दिसेल. धंद्यात सावध रहा. नोकरदार वर्गाला दिलासादायक परिस्थिति आहे. या आठवड्यात काही चांगल्या बातम्या मिळतील. कोर्टात विजय मिळेल. काही प्रसंगामूळे चिडचिड होऊ शकते. आठवड्याचा उत्तरार्ध चांगला जाईल. तुमच्या आर्थिक राशीनुसार, तुमच्या राशीच्या लोकांना या आठवड्यात कोणाकडूनही पैसे उधार देऊ नका किंवा पैसे घेऊ नका.
वृषभ : ज्येष्ठ मंडळींकडून धनलाभाची शक्यता. संगीताचा, कलेचा आनंद घेऊ शकता. जवळच्या व्यक्तीची चिंता वाटेल. तणाव व वाद होईल. सौम्य धोरण सर्वत्र ठेवा. नोकरीच्या कामात चूक होईल. कलाक्षेत्रातील लोकांना प्रसिद्धी मिळेल. आपल्या कामाची योग्य दखल घेतली जाईल. वातावरण आनंदी व उत्साही राहील. या आठवड्यात सर्व प्रकारच्या संशयास्पद आर्थिक व्यवहारांपासून दूर रहा. या आठवड्यात कुटुंबातील कोणाची तरी तब्येत बिघडू शकते ज्यामुळे मानसिक तणाव वाढेल. कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांशी तुमचे चांगले संबंध राहतील.
मिथुन : नोकरीत कामाची प्रशंसा होईल. नवी संधी मिळेल. घरात वेगवेगळी कामे निघतील. जोडीदाराची अनपेक्षितरित्या मदत होईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात वर्चस्व वाढेल. नोकरीत सुस्थता लाभेल. घरासाठी नवीन वस्तु खरेदी कराल. हास्य-विनोदात दिवस जाईल. यासाठी सुरुवातीपासूनच सावधगिरी बाळगा आणि थोड्या पैशाच्या लालसेपोटी कोणतेही अवैध काम करू नका.या आठवड्यात तुम्ही अशुभ परिस्थितींवर विजय मिळवाल. तुम्ही तुमच्या शत्रूंचा पराभव कराल.
कर्क : नोकरी टिकवा. वाहन जपून चालवा. धंद्यात कायदा पाळा. शोधत असलेले काम पूर्ण होईल. मुलांकडून शुभ वार्ता मिळतील. भेटवस्तू मिळण्याचे संकेत. राजकीय, सामाजिक क्षेत्रात तुमच्या विरोधात कारस्थान होईल. मित्रांमुळे निराशा समाप्त होईल. एखादे चांगले साहित्य वाचनात येईल. या आठवड्यात तुमचा आत्मविश्वास आणि ऊर्जा पातळी चांगली वाढण्याची शक्यता आहे. या आठवड्यात व्यवसायात यश मिळणार नाही. कुटुंबात आनंद राहील, आपल्या सवयी बदलणे आवश्यक आहे.
सिंह : महत्त्वाचे निर्णय घेता येईल. कठीण कामे मार्गी लावाल. बोलण्यात अत्यंत मधुरता ठेवाल. सर्वांची मने जिंकून घ्याल. मानसिक शांतता लाभेल. मनोबल वाढीस लागेल. थकबाकी मिळवा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात आत्मविश्वास वाढवणारे प्रसंग येतील. आहारावर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे. मानसिक शांतीसाठी, तणावाची कारणे सोडवा. कारण यातूनच तुम्ही स्वतःला निरोगी आणि उत्साही ठेवण्यात यशस्वी व्हाल. या आठवड्यात सरकारी क्षेत्रात मान-सन्मान आणि लाभ मिळेल. उच्चपदस्थ लोकांशी चांगले संबंध प्रस्थापित होतील.
कन्या : आत्मविश्वास वाढेल. कोणतेही वक्तव्य करताना अतिशयोक्ती नको. आपल्या कर्तुत्वाने कार्य सिद्धीस न्याल. मुद्दा मांडताना गाफिल राहू नका. नवे काम मिळवा. चर्चेत यश मिळेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात नवे अनुभव येतील. वरिष्ठ मान देतील. व्यापारी वर्गाला चांगला लाभ संभवतो. मिळकतीत वाढ संभवते. काही जुने मतभेद मिटू शकतील. नातेवाईकांना गरज पडल्यास कोणत्याही प्रकारची आर्थिक मदत करा. हा आठवडा संमिश्र आणि फलदायी असेल. पण तुम्हाला तुमच्या रागावर नियंत्रण ठेवावे लागेल.
तूळ : क्षुल्लक वाद वाढवू नका. मैत्रीत गैरसमज होतील. नोकरीत कर्तृत्व दिसेल. बरेच दिवस राहून गेलेला प्रवास कराल. एखादे कार्य मनाविरुद्ध करावे लागू शकते. कामाची दगदग राहील. धंद्यात मोहाला बळी पडू नका. राजकीय, सामाजिक क्षेत्रात कार्याचा गवगवा होईल. थोडावेळ स्वत:साठी देखील काढावा. अचानक खर्चात वाढ होऊ शकते. या आठवड्यात आर्थिक स्थिती अनेक चढ-उतारांनंतर शेवटी सामान्य होईल. या आठवड्यात राजकारणात यश मिळविण्याच्या संधी मिळू शकतात आणि सरकारी सेवेतील उच्च पदावरील लोकांशी तुमची मैत्री होईल.
वृश्चिक : धंद्यात क्षुल्लक गैरसमज होतील. भावनेच्या आहारी जाऊ नका. गोष्टी मनाप्रमाणे घडतील. जुनी उधारी वसूल होईल. पालकांचे सान्निध्य व आशीर्वाद लाभेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात वरिष्ठांना मदत करावी लागेल. जुनी कामे पूर्णत्वास जातील. तज्ज्ञ व्यक्तींचे सहकार्य मिळेल. या आठवड्यात तुम्हाला पैसे मिळतील, परंतु मनोरंजनावर तुम्ही आवश्यकतेपेक्षा जास्त पैसे खर्च करताना दिसतील. धार्मिक कार्यासाठी हा आठवडा चांगला आहे. प्रवासाचीही संधी मिळेल. कुटुंबात मांगलिक कार्य घडेल.
धनू : नोकरीत नाराजी राहील. उतावळेपणा, अहंकार ठेवल्यास कामात अडचणी येतील. दूरच्या नातेवाईकांशी गप्पा माराल. व्यवसायात मोठी हालचाल दिसून येईल. कामातील काही अडचणी दूर कराव्या लागतील. बोलताना तारतम्य बाळगा. धंद्यात, खरेदी-विक्रीत सावध रहा.कुटुंबातील सदस्यांशी वैचारिक मतभेद संभवतात. या आठवड्यात तुम्हाला अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. त्यामुळे यावेळी डोळे आणि कान उघडे ठेवा. या आठवड्यात चांगली बातमी मिळेल. ओळखीच्या लोकांसोबत चांगला वेळ घालवाल. धार्मिक कार्यात आणि धर्मादाय कार्यात भाग घ्याल.
मकर : खरेदी-विक्रीत लाभ. चांगला बदल शक्य. आपल्या कामाची योग्य दखल घेतली जाईल. घरात अनावश्यक खर्च निघेल. प्रवासात काळजी घ्यावी. राजकीय, सामाजिक क्षेत्रात तुमचे अंदाज अचूक ठरतील. नवे डावपेच ठरवता येतील. विरोधक नामोहरम होतील. दानधर्म कराल. कोणत्याही प्रकारच्या छोट्या स्थावर मालमत्ता आणि आर्थिक व्यवहारांसाठी हा आठवडा अतिशय शुभ आहे. आत्ताच कोणत्याही प्रकारची मोठी गुंतवणूक करणे टाळा. हा आठवडा पैसा धर्माशी निगडीत चांगल्या कामांवर खर्च होईल. तुम्हाला तुमचे मित्र आणि सहकाऱ्यांकडून शक्य ते सर्व सहकार्य मिळेल.
कुंभ : प्रसंगानुरूप निर्णय घ्या. माणसे ओळखणे तुम्हाला चांगले जमते. आलेल्या संधीचा लाभ उठवा. मित्रांमध्ये चांगल्या चर्चेत राहाल. धार्मिक कार्यात रुची वाढेल. रागावर नियंत्रण ठेवावे. जीवनाला प्रोत्साहित करणारा प्रसंग घडेल. आध्यात्मिक आवड वाढीस लागेल. इतरांचे म्हणणे ऐकून कोणतीही गुंतवणूक केल्यास आर्थिक नुकसान जवळपास निश्चित आहे. त्यामुळे इतरांच्या सल्ल्याने तुमचे पैसे कोठेही गुंतवण्याचे टाळा. कामाशी संबंधित नवीन योजना बनवण्यात यशस्वी व्हाल. मोठे व्यापारी किंवा अधिकारी यांच्याशी चांगले संबंध प्रस्थापित कराल.
मीन : राजकीय, सामाजिक क्षेत्रात पद, सन्मान मिळेल. नोकरीमध्ये मोठ्या लोकांकडून स्तुती केली जाईल. जोडीदाराची उत्तम साथ मिळेल. धर्म-कार्यात आस्था वाढेल. डागडुजीवर खर्च होऊ शकतो. जवळच्या मित्रांशी भेट शक्य.डावपेचात गुप्तता बाळगा. या आठवड्यात लोक तुमचे समर्पण आणि मेहनत लक्षात घेतील आणि यामुळे तुम्हाला काही आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. या आठवड्यात तुमच्या कुटुंबातील काही सदस्यांशी भांडण होऊ शकते. या आठवड्यात व्यवसायात वृद्धी मिळेल. नोकरी शोधणार्यांचे उच्च पदांवर असलेल्या लोकांशी चांगले संबंध असतील आणि त्यांच्यासोबत चांगला वेळ जाईल.