
मेष राशी
आठवड्याच्या सुरुवातीला कामात थोडा विलंब होऊ शकतो, मात्र मध्यापासून परिस्थिती अनुकूल होईल. व्यवसायात प्रगती होऊन नवीन संधी मिळतील. नोकरीत मेहनतीचे कौतुक होऊन मान-सन्मान वाढेल. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील आणि वैवाहिक जीवन सुखकर राहील.
वृषभ राशी
या आठवड्यात संमिश्र परिणाम मिळतील. आठवड्याच्या सुरुवातीला अनपेक्षित लाभ आणि मुलांकडून आनंदाची बातमी मिळू शकते. व्यवसायानिमित्त प्रवासाचे योग आहेत. मात्र, नोकरीत विरोधकांपासून सावध राहा आणि आर्थिक गुंतवणूक विचारपूर्वक करा. कौटुंबिक व प्रेमसंबंधांत संयम ठेवा.
मिथुन राशी
हा आठवडा तुमच्यासाठी शुभ आणि लाभदायक ठरण्याची शक्यता आहे. कुटुंबासोबत आनंदाचे क्षण घालवता येतील. नोकरीत वरिष्ठांचे सहकार्य मिळून व्यवसायात प्रगती होईल. विद्यार्थ्यांना चांगली बातमी मिळू शकते. प्रेमसंबंध अधिक दृढ होतील आणि आर्थिक परिस्थिती सुधारेल.
कर्क राशी
हा आठवडा अत्यंत शुभ आणि लाभदायक ठरू शकतो. नोकरीत महत्त्वाची जबाबदारी मिळून सरकारी कामांमध्ये यश मिळण्याची शक्यता आहे. व्यवसायात आठवड्याच्या उत्तरार्धात चांगला फायदा होईल. विद्यार्थ्यांना अपेक्षित यश मिळेल आणि कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील.
सिंह राशी
या आठवड्यात तुमचा आत्मविश्वास आणि ऊर्जा वाढेल. करिअरमध्ये प्रगतीच्या संधी मिळतील आणि नवीन लोकांशी संपर्क वाढेल. व्यवसायात नवीन योजना यशस्वी होण्याची शक्यता आहे. मात्र, कौटुंबिक वाद टाळा आणि रागावर नियंत्रण ठेवा.
कन्या राशी
या आठवड्यात आर्थिक नियोजनावर विशेष लक्ष द्यावे लागेल. पैशांची बचत करण्यासाठी योग्य संधी मिळतील. कुटुंबातील जबाबदाऱ्या वाढू शकतात, त्यामुळे शांतपणे निर्णय घ्या. प्रेमसंबंधांत गैरसमज टाळण्यासाठी संवादात गोडवा ठेवा.
तूळ राशी
आठवड्याची सुरुवात उत्साहाने होईल आणि नवीन कामांच्या संधी मिळतील. आर्थिक व्यवहार करताना खर्चावर नियंत्रण ठेवा. मित्रमंडळींच्या सहकार्याने महत्त्वाची कामे मार्गी लागतील. रखडलेले व्यवहार आणि गैरसमज दूर होण्याची शक्यता आहे.
वृश्चिक राशी
या आठवड्यात भावनिक चढ-उतार जाणवू शकतात. कोणताही मोठा निर्णय रागाच्या भरात घेऊ नका. कामाच्या ठिकाणी जबाबदाऱ्या वाढतील, मात्र मेहनतीने यश मिळेल. आर्थिक बचतीकडे लक्ष द्या आणि रखडलेली कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न करा.
धनु राशी
या आठवड्यात नवीन संपर्क आणि ओळखींचा फायदा होऊ शकतो. करिअर आणि व्यवसायात प्रगतीच्या संधी मिळतील. १२ नोव्हेंबरनंतर आत्मविश्वास वाढून नवीन कामे सुरू करण्याची प्रेरणा मिळेल. आर्थिक नियोजन आणि बचतीला प्राधान्य द्या.
मकर राशी
या आठवड्यात कामाचा व्याप वाढण्याची शक्यता आहे. वरिष्ठांशी चांगले संबंध ठेवणे फायदेशीर ठरेल. रखडलेल्या कामांमध्ये प्रगती होऊन करिअरमधील अडचणी दूर होऊ शकतात. आर्थिक व्यवहार आणि इतरांना दिलेल्या आश्वासनांबाबत सावधगिरी बाळगा.
कुंभ राशी
या आठवड्यात करिअरमध्ये प्रगती आणि नवीन गोष्टी शिकण्याच्या संधी मिळतील. कामाच्या ठिकाणी जबाबदाऱ्या वाढू शकतात. मित्रांचे सहकार्य लाभेल, मात्र जोडीदारासोबत बोलताना संयम ठेवा. गैरसमज दूर होऊन आठवड्याच्या शेवटी मानसिक शांतता मिळेल.
मीन राशी
या आठवड्यात काम आणि कुटुंब यांच्यात समतोल राखण्याची गरज आहे. आर्थिक व्यवहारात सावधगिरी बाळगा. नोकरीत जबाबदाऱ्या वाढतील, मात्र मेहनतीचे चांगले फळ मिळू शकते. आरोग्याकडे लक्ष द्या आणि महत्त्वाचे निर्णय घेताना घाई करू नका.











