मेष – कतृत्वावर भर द्या. सावध राहा. मनाला पटल्याशिवाय कृतीची घाई नको. प्रवासात सावध रहा. दुखापत होईल. नोकरीत कठीण काळ असेल. धंद्यात व्यवहारात सावध रहा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात तुमचे मुद्दे इतर व्यक्ती घेतील.घरच्यांना वेळ द्या. जबाबदाऱ्या पार पाडाल. वाद टाळणे हिताचे. कायदे पाळणे लाभाचे. शुभ रंग – पिवळा
शुभ दि. 17, 18
वृषभ – तब्येत जपा. व्यवहार विचारपूर्वक करा. ज्येष्ठांना मान द्या. जोडीदाराला वेळ द्या. भागीदाराशी चर्चा करताना भान ठेवा. कठोर शब्द नको. राजकीय, सामाजिक क्षेत्रात अधिकारात वाढ होईल. जनहिताच्या कार्यात चालढकलपणा नको. शुभ रंग – आकाशी
शुभ दि. 19, 20
मिथुन – कौटुंबिक जबाबदाऱ्या व्यवस्थित पार पाडाल. मित्रांची साथ लाभेल. कामावर लक्ष केंद्रीत करा. नोकरीच्या कामात अरेरावी नको. आळसाने धंद्यात समस्या होतील. वसुली करा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात भावनेपेक्षा प्रत्यक्ष कृतीला, विचारांना महत्त्व असते. प्रश्न सुटायला वेळ लागेल पण तो नक्की सुटेल. नम्रपणे वागणे लाभदायी ठरेल. तब्येत जपा. शुभ रंग – किरमिजी
शुभ दि. 20, 21
कर्क – शब्द जपून वापरा. संवादातून प्रश्न सोडवा. स्वभावाला परिस्थितीनुसार मुरड घाला. नोकरीत प्रगती, कठीण काम करून दाखवाल. धंद्यात वाढ होईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात जवळच्या व्यक्ती अडचणी आणतील. प्रतिष्ठा सांभाळता येईल. हुशारीने प्रगती कराल. समतोल राहणे हिताचे. अतिरेक टाळा. प्रत्येक महत्त्वाची कृती विचारपूर्वक करा. शुभ रंग – किरमिजी
शुभ दि. 21, 22
सिंह – कामाचे नियोजन हिताचे. क्षमतेचा विचार करुन आश्वासन द्या. कायदा पाळणे हिताचे. कौतुक होईल. नोकरीत शब्द जपून वापरा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात दबाव राहील. शब्द बदलल्याचा आरोप होईल. नम्रता, चातुर्य ठेवा. प्रतिष्ठेचा प्रश्न निर्माण होईल. अहंकाराने बुद्धिचा नाश होतो, हे लक्षात ठेवा. प्रतिष्ठा वाढेल. लहरी स्वभावाला थोडी मुरड घालणे आवश्यक. शुभ रंग – पोपटी
शुभ दि. 17, 18
कन्या – वाद टाळा. चर्चेतून मार्ग काढू शकाल. प्रयत्नाने यश मिळवाल. जीवन जगण्याचे व्यवस्थापन करणे हिताचे. धंद्यात स्पर्धा करणारे वाढतील. नवीन ओळखी होतील. राजकीय, सामाजिक क्षेत्रात प्रतिष्ठा, पद मिळेल. वरिष्ठ तुमचे मुद्दे विचारात घेतील. अतिरेक टाळा. शुभ रंग – सोनेरी
शुभ दि. 20, 21
तूळ – तब्येत जपा. आर्थिक लाभ होईल. कर्ज देणे टाळा. गुंतवणुकीचे नियोजन करा. घरच्यांना आणि जोडीदाराला पुरेसा वेळ द्या. समस्या कमी होतील. राजकीय, सामाजिक क्षेत्रातील गैरसमज दूर करून घ्या. योजनांना पुढे न्याल. वरिष्ठांशी चर्चेची शक्यता. क्षमता ओळखून कृती करा. शुभ रंग – जांभळा
शुभ दि. 19, 20
वृश्चिक – हुशारीने प्रश्न सोडवाल. महत्त्वाच्या व्यवहारांमध्ये लाभ होईल. मतप्रदर्शनाची घाई नको. प्रयत्नाने यश मिळेल. परदेशी जाण्याची संधी. धंद्यात मोठी उलाढाल होईल. जम बसेल. कर्जाचे काम होईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात नवे डावपेच टाका. नम्रतेने वागा. कृती करण्याआधी त्यामागील कारण समजून घ्या. वाद टाळा. शुभ रंग – पोपटी
शुभ दि. 17, 21
धनु – परिस्थितीचा अंदाज घेऊन कृती करणे हिताचे. आत्मविश्वास वाढेल आणि प्रगती होईल. प्रसंगी स्वतःला बदलणे फायद्याचे. सावधपणे काम करा. कुणालाही गृहित धरू नका. नोकरी टिकवा. सर्वत्र कायदा पाळा. धंद्यात चूक नको. राजकीय, सामाजिक क्षेत्रात विरोधक जोरदार हल्लाबोल करतील. तटस्थ धोरण ठेवा. वाद टाळा आणि सलोखा राहखण्यावर भर द्या. हिशोबी वृत्ती जपा. संयमाने वागा. शुभ रंग – गुलाबी
शुभ दि. 18, 19
मकर – तब्येत जपा. डोळ्यांची काळजी घ्या. ज्येष्ठांची काळजी घ्या आणि त्यांचा मान राखा. हुशारीने प्रश्न सोडवाल. धंद्यात गुंतवणुकीची घाई नको. व्यसन त्रासदायक ठरेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात जवळच्या व्यक्तींपासून कटू अनुभव येतील. गैरसमज, तणाव दूर होईल. प्रतिष्ठा राखाल. खर्च वाढेल. चर्चेतून मार्ग काढाल. प्रयत्नाने प्रगती होईल. क्षमता ओळखून कृती करणे लाभाचे. शुभ रंग – निळा
शुभ दि. 17, 21
कुंभ – माणसं जपा, माणसं जोडा. घर आणि काम यात समतोल राखणे आवश्यक. हाती आलेली जबाबदारी चोख पार पाडाल. जिद्दीने यश खेचावे लागेल. नोकरीत व्याप असला तरी प्रशंसा होईल. कठीण काम करून दाखवाल. धंद्यात धावपळ होईल. नवे काम मिळेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात महत्त्वाचा निर्णय घेण्याची वेळ येईल. प्रगती होईल. अतिरेक टाळा आणि संयम राखा. शुभ रंग – निळा
शुभ दि. 18, 19
मीन – शब्दांनी इतरांवर प्रभाव पाडाल. हुशारीने प्रगती कराल आणि अनेक प्रश्न सोडवाल. रागावर नियंत्रण मिळवणे आणि वाद टाळणे फायद्याचे ठरेल. आत्मविश्वास व उत्साह वाढेल. नोकरीत प्रगती होईल. धंद्यात वाढ होईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात अधिकार लाभतील. लोकप्रियता मिळेल. अनेकांचे सहकार्य मिळेल. कला, क्रीडा, साहित्यात पुढे जाल. नव्या जबाबदाऱ्या स्वीकारुन पार पाडाल. कामावर लक्ष केंद्रीत करू शकाल. शुभ रंग – आकाशी
शुभ दि. 17, 21