मेष : समाजमाध्यमांपासून लांब राहा. जोडीदाराचे सहकार्य मिळेल. कुटुंबाची काळजी घ्या. धंद्यात नवे काम मिळेल. चर्चेत सावध रहा. अनावश्यक खर्च वाढणार आहेत. मनोबल कमी राहील. काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवणार आहेत. राजकीय, सामाजिक क्षेत्रांतील पिछेहाट दूर करून नव्याने तयारी करा. प्रवासात व वाहने चालवताना विशेष काळजी व दक्षता घ्यावी लागणार आहे.
वृषभ : व्यवसायातून अपेक्षेपेक्षा जास्त प्रमाणात उत्पन्न मिळेल. नोकरदार वर्गाला वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. जनसंपर्क चांगला ठेवा. महत्त्वाचे निर्णय घेऊ शकाल. प्रियजनांचा सहवास लाभणार आहे. नोकरीत धावपळ होईल. धंद्यात वाढ होईल. नम्रता ठेवा. मनोबल वाढविणारी एखादी घटना घडेल. नवीन स्नेहसंबंध जुळतील. राजकीय, सामाजिक क्षेत्रांत तुमची लोकप्रियता वाढेल. आर्थिक कामास अनुकूलता लाभणार आहे.
मिथुन : आर्थिकदृष्ट्या बचत करा. संततीसौख्य लाभेल. मैत्रीचे नाते दृढ होईल. कोणताही निर्णय सावधपणे घ्या. कायद्याच्या कक्षा लक्षात ठेवा. चिकाटीने कार्यरत राहून अनेक कामे पूर्ण करणार आहात. तुमचे मन अत्यंत आनंदी व आशावादी राहणार आहे. मात चूक टाळा. धंद्यात फसगत होण्याची शक्यता. नोकरी, व्यवसायात उत्तम स्थिती राहील. पण एखाद व्यवहारात नुकसान होईल. प्रवास होतील.
कर्क : राजकीय क्षेत्रात यशस्वी वाटचाल राहील. मित्रांसोबत सहलीचे बेत आखाल. संततीचे लाड पुरवाल. राजकीय, सामाजिक क्षेत्रांतील वाद, समस्या मिटवा. मनोबल व आत्मविश्वास वाढणार आहे. चिकाटीने कार्यरत राहणार आहात. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. नवी योजना राबवा. कौटुंबिक वाटाघाटीत यश मिळेल. तुम्ही आपली मते इतरांना पटवून देऊ शकाल.
सिंह : व्यवसायात सुलभता येईल. भागीदारी व्यवसायाला पूरक वातावरण राहील. नोकरदार वर्गाला नवीन नोकरीसाठी प्रस्ताव येतील. धंद्यात वाढ होईल. वाद टाळा. प्रवासात काळजी घ्या. व्यवसायातील आर्थिक व्यवहार मार्गी लावू शकणार आहात. काहींना अचानक धनलाभ संभवतो. राजकीय, सामाजिक क्षेत्रात अनेकांचा सहवास मार्गदर्शक ठरेल. एखादी गुप्त वार्ता समजेल. अपेक्षित गाठीभेटी पडतील. स्वास्थ्य व समाधान लाभेल.
कन्या : व्यवसायात भरभराट होईल. नोकरदार वर्गाला नवीन कामाची सुरुवात करावी लागेल .आर्थिक लाभ होईल.बोलताना सावध रहा. प्रत्येक दिवस प्रगतीचा उच्चांक गाठणारा ठरेल. त्यामुळे तुमचा उत्साह वाढणार आहे. कामे मार्गी लावू शकणार आहात. दैनंदिन कामात सुयश लाभेल. नोकरीत उत्तम बदल होईल. धंद्यात नवे काम मिळेल. अनेक बाबतीमध्ये अनुकूलता लाभणार आहे. चिकाटी वाढणार आहे.
तुळ : व्यवसायातून उत्पन्न चांगले मिळेल. नोकरदार वर्गाच्या कामकाजात बदल होतील. अहंकाराच्या आहारी न जाता नम्रपणे वागा. प्रकृतीची काळजी घ्या. कामे रखडणार आहेत. निरुत्साह जाणवेल. दैनंदिन कामे विलंबाने होतील. अनावश्यक खर्च संभवतात. धंद्यात फसगत टाळा. वारसा हक्कातील हिस्सा मिळेल. आरोग्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. राजकीय, सामाजिक क्षेत्रांत गुप्त कारवायांना ओळखून वागा. प्रवासात काळजी घ्या. अस्वस्थता राहील.
वृश्चिक : वादविवाद या गोष्टींपासून लांब राहा. जुन्या गोष्टी उगाळून काहीही साध्य होणार नाही. नोकरीत प्रभाव वाढेल. कला, क्रीडा, साहित्यात प्रगती, यश मिळेल. विविध लाभ होणार आहेत. आर्थिक कामात सुयश लाभेल. चिकाटी वाढणार आहे. धंद्यात कलाटणी मिळेल. करार करताना सल्ला घ्या. अनेकांचे सहकार्य लाभेल. अनपेक्षित धनलाभ संभवतो. तुमचा प्रभाव वाढणार आहे.
धनु : उधारीचे व्यवहार टाळा. राजकीय क्षेत्रात हस्तक्षेप करू नका. मित्र-मैत्रिणींची साथ मिळेल. फाजील आत्मविश्वास घातक ठरेल. प्रवासात सावध रहा. तुम्ही आपली मते इतरांना पटवून देऊ शकणार आहात. सार्वजनिक क्षेत्रात तुमचा प्रभाव राहील. चिकाटी वाढेल. नोकरी, धंदा टिकवून ठेवा. वस्तू जपा. मनोबल वाढविणारी एखादी घटना घडेल. प्रवास सुखकर होतील.
मकर : नोकरदार वर्गाला नोकरीत स्वास्थ्य लाभेल. आर्थिक बाबतीत लाभ होईल. राजकीय क्षेत्रात शुभेच्छा मिळतील. लोकप्रियता, अधिकार वाढेल. योजनांची पूर्ती करा. जिद्द वाढणार आहे. नव्या उत्साहाने व उमेदीने कार्यरत राहाल. अस्वस्थता कमी होईल. रखडलेली कामे मार्गी लावू शकाल. घरात सुखद घटना घडेल. तुम्ही आपली मते इतरांना पटवून देऊ शकाल.
कुंभ : नोळख्या व्यक्तीपासून लांब राहा. बाकी दिवसांचा कालावधी चांगला राहील. व्यावसायिक अडथळे दूर होतील. अहंकाराने वागणे प्रतिष्ठेवर घाला घालणारे ठरू शकते. मानसिक अस्वस्थता राहणार आहे. मनोबल कमी राहील. प्रवास शक्यतो टाळावेत. वाहने चालवताना दक्षता हवी. नोकरीत वरिष्ठांची मर्जी पाहून बोला. धंद्यात अनाठायी खर्च टाळा. दैनंदिन कामात अडचणी जाणवणार आहेत.
मीन : आर्थिक बाबतीत फसवणूक होणार नाही याची काळजी घ्या. नातेवाईकांशी संवाद साधताना सुवर्णमध्य साधा. नोकरीत जम बसेल. धंद्यात मोठे कंत्राट वसुली करा. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. तुमचा उत्साह वाढेल. खर्चाचे प्रमाण कमी राहील. दैनंदिन कामास अनुकूलता लाभेल.रागावर ताबा ठेवा. राजकीय, सामाजिक क्षेत्रांत वर्चस्व वाढवणारे काम कराल. वैवाहिक जीवनामध्ये सौख्य व समाधान लाभणार आहे.