मेष : आरोग्य बिघडू शकते. नोकरदारांचे शत्रू आज त्रास देतील. तुमच्या मनाविरुद्ध घटनेला तुम्हाला सामोरे जावे लागेल. मानसिक चिंता राहील. वादविवादात सहभाग टाळावा. धंद्यात राग नको. राजकीय, सामाजिक क्षेत्रात दगदग, धावपळ, क्षुल्लक तणाव होईल. दैनंदिन कामात अडचणी येणार आहेत. आत्मविश्वासाचा अभाव राहील.
वृषभ : आजही तुम्ही आनंदी राहाल. व्यवसाय करणाऱ्या लोकांना आज लाभाच्या मार्गात अडथळे येतील. आत्मविश्वास वाढणार आहे. प्रवास सुखकर होतील. वैवाहिक जीवनामध्ये सुसंवाद राहील. अनेकांचे सहकार्य लाभेल. धंद्यात नवे धोरण, नवे भागीदार येतील. नोकरीत कौतुकास्पद काम कराल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात जिद्द, महत्त्वाकांक्षा, दूरदृष्टिकोन यांचे योग्य फळ मिळेल. भागीदारी व्यवहारात सुयश लाभणार आहे. प्रभाव वाढेल.
मिथुन : नवीन परिचय मनस्ताप देण्याची शक्यता. नोकरी टिकवा. धंद्यात नम्रता ठेवा. फसगत टाळा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात शब्द शस्त्र असतात हे विसरू नका. काहींचा मनोरंजनाकडे कल राहील तर काहींचा धार्मिक कार्यात सहभाग राहील. कायदेशीर प्रकरणात वाद असेल. कुटुंबातील सदस्यांसह शुभ कार्यात सहभागी होऊ शकतात. आर्थिक कामे आज नकोत. प्रवासात व वाहने चालवताना विशेष काळजी घ्यावी. दानधर्म कराल.
कर्क : जोडीदाराला बाहेर कुठेतरी घेऊन जाल. पार्टनरशीपमध्ये कोणताही व्यवसाय करत असाल तर नशिबावर सोडू नका. आर्थिक कामे मार्गी लागणार आहेत. जुने मित्रमैत्रिणी भेटतील. जुन्या आठवणींना उजाळा मिळेल. नोकरीत महत्त्वपूर्ण काम कराल. धंद्यात लाभ होईल. दगदग वाराजकीय, सामाजिक क्षेत्रात प्रतिष्ठा वातुमच्या कार्याचे कौतुक होईल. अनेकांशी सुसंवाद साधाल. सहर्कायांचे सहकार्य लाभेल. लाभ होतील.
सिंह: मनस्ताप, धोका होईल. काळजी घ्या. प्रकृतीकडे लक्ष द्या. नोकरीत तणाव राहील. धंद्यात नुकसान टाळा. तुमचा विचार सर्वांना पटेलच असे नाही. तुमचे मन अत्यंत आनंदी व आशावादी राहणार आहे. चिकाटीने कार्यरत रहाल. प्रवासाचे योग सफल होतील. कोणतीही नवीन गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल विचार करा. तुम्हाला मोठे नुकसान होईल. आनंददायी घटना घडेल. उत्साह व उमेद वाढणार आहे.
कन्या : कोणाकडून पैसे उधार घेण्याचा विचार करत असाल तर सहज मिळतील. परदेशात राहणाऱ्या नातेवाईकांकडून चांगली बातमी ऐकायला मिळेल. तुमच्या कार्यक्षेत्रात अपेक्षित सुसंधी लाभेल. प्रसिद्धीचे योग येतील. भावंडांबरोबर सुसंवाद राहील. राजकीय, सामाजिक क्षेत्रात तुमचे वर्चस्व राहील. मुद्दे महत्त्वाचे ठरतील. लोकप्रियता वाअनेक योजना राबविता येतील. अपेक्षित गाठीभेटी पडतील. काहींना अनपेक्षित प्रवास संभवतो.
तुळ : कुठेही अहंकार नको. यश खेचता येईल. नोकरीधंद्यातील तणाव, चिंता कमी होईल. थकबाकी वसूल करा. दैनंदिन आर्थिक कामे यशस्वी होणार आहेत. व्यवसायातील उधारी, उसनवारी वसूल होईल. कामाचा ताण कमी असणार आहे. आर्थिक स्थिती मजबूत राहिल. हरवलेली वस्तू सापडल्याने आनंदी असाल. कौटुंबिक स्वास्थ्य लाभेल. अनेक बाबतीत समाधान लाभेल.
वृश्चिक : नवीन प्रकल्पावर काम सुरु कराल. ज्यामुळे आनंदी आणि व्यस्त असाल. व्यस्त वेळापत्रकातून स्वत:साठी वेळ मिळणार नाही. वैवाहिक जीवनात सुसंवाद राहील. महत्त्वाची कामे होतील. अनेक बाबतीत अनुकूलता लाभेल. वसुली करा. कर्जाचे काम करा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात चौफेर प्रगतीचा, कार्याचा चौघडा वाजेल. आजचा दिवस आपणाला अनेक दृष्टीने अनुकूल आहे. प्रवासाचे योग येणार आहेत.
धनु : हिशेबात चूक नको. राजकीय, सामाजिक क्षेत्रात पाणउतारा होईल. संयमाने मुद्दे मांडा. वरिष्ठांच्या मर्जीनुसार निर्णय घ्यावा. ताण व दगदग राहील. कामामध्ये लक्ष लागणार नाही. मानसिक संभ्रमावस्थता राहण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांना अभ्यासात रस राहिल. मुलांना सामाजिक कार्यात अधिक रस असेल. काही पैसे खर्च होतील. महत्त्वाचे निर्णय आज नकोत. वादविवादात सहभाग टाळावा. चिकाटी वाढेल.
मकर : कुटुंबात चिंतेचे वातावरण राहिल. ज्यामुळे तुम्ही गोंधळलेले असाल. कुटुंबातील सदस्यांच्या प्रकृतीमुळे काळजीत सापडाल. आर्थिक लाभ होणार आहेत. चिकाटी वाढेल. तुम्ही आपली मते इतरांवर लादण्याचा प्रयत्न कराल. कोर्टकचेरीचा प्रश्न लवकर सोडवता येईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात नवे परिचय उत्साहवर्धक ठरतील. अपेक्षित गाठीभेटी पडतील. अनेकांचे सहकार्य लाभणार आहे.
कुंभ : मैत्रीचे नाटक करून तुमच्याबद्दल गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न होईल. सावध रहा. नोकरीत प्रभाव पडेल. नोकरी, व्यवसायात उत्तम स्थिती राहील. आरोग्य उत्तम राहणार आहे. आज तुम्ही आपले तेच खरे कराल. अधिकार लाभेल. विद्यार्थ्यांना अभ्यासात कठोर परिश्रम करावे लागतील. शिक्षणात यश मिळविण्यात अडथळे येतील. प्रवासास दिवस अनुकूल आहे. तुमचे मन आनंदी व आशावादी राहणार आहे.
मीन : तुमची गुंतवणूक दुप्पट होईल. मित्रांसोबत बाहेर फिरायला जाऊ शकता. सरकारी नोकरीत सहकाऱ्यांची मदत होईल. चिकाटी वाढेल. मनोबलाच्या जोरावर कार्यरत राहणार आहात. नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. धंद्यात वाहोईल. उत्साह व आत्मविश्वास वाराजकीय, सामाजिक क्षेत्रात अनेकांना सहकार्य करून मोठे व्हाल. दैनंदिन कामात सुयश लाभणार आहे. कामाचा ताण कमी होईल.