TheClearNews.Com
Tuesday, September 8, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

शिक्षणाचा नवा आदर्श

९५% मुस्लिम विद्यार्थी असलेल्या मराठी शाळेत मनसेचा 'राजभाषा गौरव' जागर..

vijay waghmare by vijay waghmare
February 28, 2026
in जळगाव, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव प्रतिनिधी : “मराठी राजभाषा गौरव दिना”चे औचित्य साधून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने जळगाव महानगरपालिका संचालित मराठी मुलांची शाळा क्रमांक ३२ मध्ये एक स्तुत्य उपक्रम राबवण्यात आला. मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या आदेशानुसार, मराठी भाषेचा अभिमान आणि प्रसार करण्याच्या उद्देशाने येथील शिक्षक आणि विद्यार्थ्यांचे पारंपरिक पद्धतीने स्वागत करण्यात आले.

कार्यक्रमाची सुरुवात अत्यंत उत्साहात ‘महाराष्ट्र गीताने’ झाली. यावेळी शाळेतील शिक्षकांना आणि विद्यार्थ्यांना मनसे कार्यकर्त्यांच्या हस्ते फेटे बांधून सन्मानित करण्यात आले. मराठी संस्कृतीची ओळख असलेल्या फेट्यांमुळे शालेय परिसरात एक वेगळेच मांगल्याचे वातावरण निर्माण झाले होते. याप्रसंगी चिमुकल्यांना चॉकलेटचे वाटप करून त्यांचा आनंद द्विगुणित करण्यात आला.

READ ALSO

टास्कच्या माध्यमातून मोठा परतावा घेणे तरुणाला पडले महागात

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 08 सप्टेंबर 2026 !

या उपक्रमाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे शाळा क्रमांक ३२ मधील ९५ टक्के विद्यार्थी हे मुस्लिम समाजातील आहेत. हिंदी भाषिक पार्श्वभूमी असूनही हे विद्यार्थी अत्यंत आवडीने आणि अभिमानाने मराठी भाषेचे शिक्षण घेत आहेत. “मराठी ही केवळ राजभाषा नसून ती संवादाची आणि संस्कृतीची भाषा आहे,” हे या विद्यार्थ्यांनी आपल्या उपस्थितीतून सिद्ध केले. मुस्लिम समाजातील मुलांचा मराठी भाषेप्रती असलेला हा ओढा आणि त्यांचे मराठीवरील प्रेम उपस्थित सर्वांसाठी कौतुकाचा आणि चर्चेचा विषय ठरला.

मराठी शाळांमधील विद्यार्थ्यांचे मनोबल वाढवणे आणि त्यांना मुख्य प्रवाहात आणणे हे आमचे उद्दिष्ट आहे. विशेषतः जिथे अमराठी भाषिक विद्यार्थी मराठी शिकत आहेत, तिथे त्यांचे कौतुक होणे गरजेचे आहे.”असे प्रतिपादन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष ॲड. जमील देशपांडे यांनी या प्रसंगी केले.

या वेळी मनसेच्या वतीने एक महत्त्वपूर्ण निर्धार व्यक्त करण्यात आला. आगामी काळात जळगाव महानगरपालिकेच्या अंतर्गत येणाऱ्या सर्व मराठी शाळांच्या गुणवत्ता वाढीसाठी आणि तेथील समस्या सोडवण्यासाठी मनसेतर्फे विशेष ‘मनुष्यबळ आणि लक्ष’ केंद्रित करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. मराठी शाळा टिकल्या पाहिजेत आणि तिथल्या विद्यार्थ्यांना दर्जेदार सुविधा मिळाल्या पाहिजेत, ही भूमिका यावेळी स्पष्ट करण्यात आली.

या उपक्रमामुळे शाळा क्रमांक ३२ मधील विद्यार्थी आणि शिक्षकांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून आले. मराठी राजभाषा दिनानिमित्त राबवण्यात आलेल्या या सर्वसमावेशक उपक्रमाचे शहरभरात स्वागत होत आहे.

शाळेचे मुख्याध्यापक संदीप बांगर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. श्रीकृष्ण बाविस्कर, शिक्षिका श्रीमती मीनाक्षी बदर,तुषार चौधरी, संदीप रोकडे हे शिक्षक वर्ग उपस्थित होते.

या प्रसंगी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष ॲड जमील देशपांडे, महानगराध्यक्ष किरण तळले, उपमहा नगर अध्यक्ष श्रीकृष्ण मेंगडे,ललित शर्मा,राजेंद्र निकम,विभाग अध्यक्ष आशुतोष जाधव खुशाल ठाकूर दीपक राठोड,विकास पाथरे,ऋषिकेश मेंगडे. उपस्थित होते.

श्रीकृष्ण मेंगडे यांनी आभार प्रदर्शन केले.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

टास्कच्या माध्यमातून मोठा परतावा घेणे तरुणाला पडले महागात

September 8, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 08 सप्टेंबर 2026 !

September 8, 2026
अमळनेर

खा. शि. मंडळ पतपेढीतर्फे सभासदांना भेटवस्तूचे वाटप

September 7, 2026
गुन्हे

बांधकाम परवानगीच्या बनावट कागदपत्रांद्वारे ब्रोकरची ३ कोटी ७२ लाखात फसवणूक

September 7, 2026
जळगाव

संत कबीरांचा सांगीतिक शोध घेणारा परिवर्तन निर्मित ‘हंस अकेला’ ११ सप्टेंबरला मुंबईत

September 7, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 07 सप्टेंबर 2026 !

September 7, 2026
Next Post

नवीन बायपासवर तीन वाहनांचा विचित्र अपघात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

माणसं म्हणजे देश त्या माणसांची कविता महापुरुषांकडे नेणारे असावे : माजी कायदा मंत्री रमाकांत खलप

April 13, 2021

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या ४ सप्टेंबर रोजी होणाऱ्या परिक्षा केंद्र परिसरात कलम १४४ लागू

August 26, 2021

वीज कनेक्शन तोडणार नाही ; उपमुख्यमंत्री अजित पवारांची घोषणा

March 2, 2021

मी पुन्हा एकदा सांगतोय हमीभावाची व्यवस्था सुरूच राहील : मोदी

September 20, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group