TheClearNews.Com
Tuesday, September 22, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जळगावात ९ ठिकाणांवर धाडी ; सट्टा आणि जुगार खेळणाऱ्या १५ जणांना अटक

The Clear News Desk by The Clear News Desk
January 5, 2022
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) शहरातील विविध ९ ठिकाणांवर पोलिसांनी सलग धाडी टाकून जुगार आणि सट्टा चालवणारे आणि खेळणारे जवळपास १५ आरोपी पकडले आहेत. जळगाव शहरातील सिंधी कॉलनी, शनीपेठ परिसर, रिधूर वाडा आणि शिरसोली जकात नाक्याजवळील शेतात पोलीस अधिक्षक डॉ. प्रविण मुंडे यांनी सट्टा व जुगार अड्ड्यांवर धडक कारवाई करत १५ जणांना ताब्यात घेतले आहे.

जळगाव शहरातील जिल्हा पेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चेतनदास मेहता हॉस्पीटलच्या बाजूला एका दुकानावर, शनीपेठ परिसरात दोन ठिकाणी आणि एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शिरसोली रोडवील जकात नाक्याजवळील शेतात सट्टा व जुगार सुरू असल्याची गोपनिय माहिती जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. प्रविण मुंढे यांना मिळाली होती. पोलीस अधिक्षक डॉ. प्रविण मुंढे स्वत: कारवाईसाठी मैदानात उतरले होते. सोबत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांच्यासह पथकातील पोलीस कर्मचारी यांनी सलग ८ ठिकाणी धडक कारवाई करत १५ जणांना ताब्यात घेतले आहे. संशयित आरोपींकडून रोकड, सट्टा व जुगार खेळण्याचे साहित्य आणि मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत

READ ALSO

सोशल मीडियावरील ओळख पडली महागात

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 22 सप्टेंबर 2026 !

स्थानिक गुन्हे शाखेचे पोना नितीन बाविस्कर यांच्या फिर्यादीवरून सिंधी कॉलनी, भाजी मार्केट येथे छापा टाकून पकडलेल्या आरोपींच्या विरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नरेश गणपत भाट (वय ५०) व राज सुरेश भाट (वय २४, दोघे रा. सिंगापुर कंजरवाडा) अशी या आरोपींची नावे आहेत. धाडीत सट्टा जुगाराच्या साहित्यासह ३३१० रुपये रोख नरेश भाट आणि २९२० रुपये रोख राज भाट याच्या ताब्यातून जप्त करण्यात आले. पळुन गेलेले गजानन वसंतराव लकडे (रा. चंदनवाडी शनीपेठ) आणि राजेश’तनवाणी (रा. सिंधी कॉलनी) अशी अन्य आरोपींची नावेही त्यांनी सांगितली.

जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात स्थानिक गुन्हे शाखेचे पो ना विजय पाटील यांनी दाखल केलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, पो नि किरणकुमार बकाले यांच्या सूचनेवरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आंबेडकर मार्केटच्या पाठीमागे, अशोक गॅरेजच्या बाजूला सुरु असलेल्या सट्ट्याच्या अड्ड्यावर धाड टाकली. या कारवाईत आकडे लिहून घेणारे शेख महेबूब शेख अय्याज (रा. नशिराबाद) आणि समाधान राठोड (रा. सुप्रीम कॉलनी) या आरोपींना अटक करण्यात आली. सट्ट्याच्या साहित्यासह त्यांच्या ताब्यातून रोख ४१ हजार ७०० रुपये जप्त करण्यात आले. त्यांनी त्यांच्या अड्ड्याच्या मालकाचे नाव विजय मधुकर चौधरी (रा. जळगाव) असल्याचे सांगितले. या तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एमआयडी पोलीस ठाण्यात पो कॉ सतीश गर्जे यांनी दाखल केलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, पो नि प्रताप शिकारे यांच्या सूचनेवरून त्यांच्यासह पो उ नि रवींद्र गिरासे, हे कॉ सचिन मुंडे, मिलिंद सोनवणे यांनी आर एल चौफुलीजवळच्या नेकसा शो रूमच्या मागच्या भागात चालू असलेल्या सट्ट्याच्या अड्ड्यावर धाड टाकली. या कारवाईत आकडे लिहून घेणारा आरोपी भगवान मुरलीधर चौधरी (रा. रामेश्वर कॉलनी) याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्या झडतीत त्याच्या ताब्यातून सट्ट्याच्या साहित्यासह रोख २३१० रुपये जप्त करण्यात आले. आपण हा अड्डा अमोल सुपडू सपकाळे (रा. रामेश्वर कॉलनी) याच्या सांगण्यावरून चालवत असल्याचे त्याने सांगितले. या दोघांच्या विरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

सोशल मीडियावरील ओळख पडली महागात

September 22, 2026
गुन्हे

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 22 सप्टेंबर 2026 !

September 22, 2026
जळगाव

रौप्य महोत्सवी वर्षात ‘पिंप्राळ्याचा राजा’ची पर्यावरणपूरक मूर्ती; २५ वर्षांची समाजसेवेची परंपरा कायम

September 21, 2026
गुन्हे

गणपती दर्शनासाठी चोपड्याकडे जाणाऱ्या दाम्पत्यास मारहाण

September 21, 2026
गुन्हे

गावी गेलेल्या कुटुंबियांच्या घराचा कडीकोयंडा तोडून ऐवज लंपास

September 21, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 21 सप्टेंबर 2026 !

September 21, 2026
Next Post

अनाथांची माय सिंधुताई सपकाळ यांच्यावर आज होणार अंत्यसंस्कार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

लसीकरणाचा तिसरा टप्पा, ज्येष्ठ नागरिकांसह आजारी रुग्णांना देणार डोस

March 1, 2021

धक्कादायक : अल्पवयीन भावाकडूनच अल्पवयीन बहिणीवर अत्याचार ; पिडीता गर्भवती !

September 7, 2023

मोठी बातमी : अवैध कत्तलीसाठी जाणाऱ्या १२ गोवंशाचे मुक्ताईनगर पोलिसांनी वाचविले प्राण !

June 17, 2022

बीएचआर घोटाळा : आर्थिक गुन्हे शाखेचे पथक पुन्हा जळगावात !

June 10, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group