मेष : मनासारख्या गोष्टी घडू लागतील. धनस्थानातून होणारी पौर्णिमा निश्चितच लाभ मिळवून देणारी आहे. ज्या कामासाठी बरेच दिवस चालढकल होत होती ते आता होणार आहे. महत्त्वाचे निर्णय घ्याल. व्यवसायाला चालना मिळेल. व्यवहार रोखठोक होतील. व्यापारी वर्गाला दिलासा मिळेल. नोकरदार वर्गाला नवीन कामाची संधी मिळेल. आर्थिकदृष्टय़ा आवक वाढेल. राजकीय क्षेत्रातील दगदग कमी होईल. नातेवाईकांच्या भेटीगाठी होतील.
वृषभ : व्यावसायिकदृष्टय़ा पळापळ होईल, पण ती फायद्याची राहील. इतरांचे देणे वेळेत फेडू शकाल. नोकरदार वर्गाला कामाचा व्याप वाढलेला असेल. खर्च सांभाळून करा. परिवाराकडून चांगल्या कामासाठी साथ मिळेल. आठवड्याच्या सुरुवातीचे तीन दिवस विचारपूर्वक निर्णय घ्यावे लागतील. भावनिक गोष्टीत अडकून चालणार नाही. व्यवहारात्मक गोष्टींना महत्त्व द्या. इतरांचे मत ऐकून घ्या. पण या तीन दिवसांत प्रतिउत्तर करू नका. त्यानंतरचा कालावधी चांगला असेल.
मिथुन : हा आठवडा सामान्यतः आपल्यासाठी चांगला असला तरी आठवड्याच्या सुरवातीस काही कारणाने आपला गोंधळ उडेल. हा गोंधळ टाळण्यासाठी आपणास एखाद्या वडीलधाऱ्या व्यक्तीचा सल्ला घ्यावा लागेल. कोणत्याही महत्वाच्या कागदपत्रावर स्वाक्षरी करण्यापूर्वी त्याचे नीट वाचन करावे, अन्यथा अडचणीत सापडावे लागू शकते. नोकरी करणाऱ्यांना त्यांच्या मेहनतीचे यथोचित फळ मिळेल. जर ते कंत्राटी पद्धतीने काम करत असतील तर कार्यालय त्यांच्याशी पुन्हा संपर्क साधण्याची संभावना आहे. प्राप्तीत सुद्धा वाढ होईल. आठवड्याच्या मध्यास आपण प्रॉपर्टीचा सौदा करू शकाल.
कर्क : हा आठवडा आपल्यासाठी मध्यम फलदायी आहे. काही मानसिक चिंता राहिल्या तरी आठवड्याचे मधले दिवस खूपच चांगले आहेत. आपण एखादा चांगला सौदा करून व्यवसायात शीघ्र गतीने प्रगती कराल. आपली आर्थिक स्थिती उत्तम राहील. खर्च कमी होतील. प्रकृतीत सुद्धा सुधारणा होईल. कामाच्या बाबतीत आपणास चांगले परिणाम मिळू शकतील. आपल्या कुशाग्र बुद्धिमत्तेने आपण आपली कामे इतरांच्या मदतीने पूर्ण करण्यात यशस्वी व्हाल. हा आठवडा व्यापाऱ्यांसाठी सामान्य फलदायी आहे.
सिंह : भाग्यस्थानातून लाभस्थानाकडे चंद्र ग्रहाचे भ्रमण होत आहे. सप्ताहातील सर्व दिवसांचा कालावधी शुभदायक राहील. याच गोष्टीचा फायदा घेऊन आपल्याला जे साध्य करायचे आहे ते करू शकता. या कालावधीत आपले मत इतरांना पटणारे असेल, त्यामुळे समोरून मिळालेला प्रतिसाद उत्तम राहील. याचा फायदा आगामी काळासाठी होईल. तांत्रिक अडचणी कमी होतील. कामातील वेळ वाचेल. नोकरदार वर्गाच्या मागण्या वरिष्ठांना मान्य कराव्या लागतील. वारंवार निर्माण होणारे पैशाचे प्रश्न मार्गी लागतील.
कन्या : पैशांचे व्यवहार रोखठोक करा. राजकीय क्षेत्रात जबाबदारीचे काम पार पाडावे लागेल. कुटुंबातील सदस्यांचा आदर करा. हा आठवडा आपल्यासाठी खूपच चांगला आहे. आपल्या प्रकृतीत सुधारणा होईल. आर्थिक आव्हाने कमी होतील. प्राप्तीत वाढ होईल. आपण जीवनाकडे नवीन दृष्टिकोनातून पाहू शकाल. आव्हानांना सामोरे जाण्याची संवय लावून घेऊ शकाल. त्याने आपणास खूप फायदा होईल. नोकरी करणाऱ्यांना त्यांच्या सहकाऱ्यांशी चांगले वागावे लागेल. जर आपले त्यांच्याशी संबंध बिघडले तर आपणास नुकसान सहन करावे लागू शकते.
तूळ : हा आठवडा आपल्यासाठी सामान्य फलदायी आहे. आपल्या चिंता वाढतील. अनावश्यक चिंता आपणास व्यथित करू शकतील. तेव्हा त्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करावा, अन्यथा आपल्या प्रकृतीवर त्याचा प्रतिकूल परिणाम होऊ शकतो. आठवड्याचा शेवटचा दिवस प्रवासास अनुकूल आहे. विद्यार्थ्यांना अभ्यासात खूप मेहनत करण्याचा फायदा होईल. मागील काही दिवसांत व्यवसायासंदर्भात जो अनुभव आलेला आहे तो विसरून चालणार नाही. व्यावहारिक गोष्टींना प्राधान्य द्या. खरेदी विक्रीचा व्यवहार जपून करा. नोकरदार वर्गाने नियोजनानुसार कामाचा आलेख तयार करा.
वृश्चिक : व्यावसायिकदृष्टय़ा मोठे धाडस टाळा. नोकरदार वर्गाने कामाव्यतिरिक्त कोणत्याच गोष्टीत लक्ष घालू नका. आर्थिक बाबतीत खर्च जपून करा. नवीन कोणतेही कार्य करण्यापूर्वी घरातील सदस्यांना विश्वासात घ्या. हा आठवडा आपल्यासाठी सामान्य फलदायी आहे. ह्या आठवड्यात आपण कोणतेही मोठे काम हाती घेतल्यास आपले नुकसान होण्याची संभावना असल्याने ते घेण्याचे टाळावे. खर्चात मोठी वाढ होईल. एखादा अवांच्छित प्रवास करावा लागण्याची शक्यता सुद्धा आहे. या सर्वातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करावा. आपल्या पैश्यांचा सदुपयोग करावा. मानसिक चिंतेपासून दूर राहण्याचा प्रयत्न करावा.
धनू : रागाच्या भरात गेलेले शब्द पुन्हा माघारी येणार नाहीत. त्यासाठी परत मनस्ताप करत बसण्याची वेळ येईल. ही वेळ येणार नाही याची काळजी घ्या. भावनिक होऊन नको ते धाडसी निर्णय घेऊ नका. हा आठवडा आपल्यासाठी सामान्य फलदायी आहे. अनेक बाबतीत मनात विरोधाभासाची व गोंधळाची स्थिती राहील. त्यामुळे आपण कोणत्याही निष्कर्षाप्रत येऊ शकणार नाही. हा आठवडा प्रेमीजनांसाठी सामान्य आहे. आपण आपल्या मधुर वाणीने आपल्या प्रेमिकेचे हृदय जिंकू शकाल. आपल्यात रोमांस राहील.
मकर : शांततेने सर्व काही करा.पौर्णिमा पंचमस्थानातून होत आहे ही पौर्णिमा शुभदायक असेल. व्यवसायिकदृष्टय़ा चढ-उतार असला तरीसुद्धा फायद्याचे प्रमाण चांगले राहील. नोकरदार वर्गाला वरिष्ठांचे नियम पटणारे नसले तरीसुद्धा वरिष्ठांच्या नियमानेच काम करावे लागेल. हा आठवडा आपल्यासाठी मध्यम फलदायी आहे. कौटुंबिक जीवनात थोडा तणाव राहील, ज्यात आपल्याला हस्तक्षेप करावा लागेल. प्रेमीजनांसाठी लहान – सहान समस्या सोडल्यास हा आठवडा चांगला आहे. आपण आपल्या प्रेमिकेच्या भावना समजून घेऊ शकाल. आपल्या मनात तिच्यासाठी भावनेचे अंकुर फुटतील. विवाहितांचे वैवाहिक जीवन तणावमुक्त होईल.
कुंभ : सप्ताहात सर्व दिवस चांगले असतील. मनामध्ये कितीही उत्साह असला तरी कामे वेळेवर होत नव्हती, त्यामुळे हा उत्साह कमी व्हायचा. सध्या मार्गातील अडथळा कमी होणार आहे. प्रलंबित कामांना गती मिळेल. आगामी काळासाठी नियोजन करावयाचे असल्यास सध्या हालचाली वाढवाव्या लागतील. हा आठवडा आपल्यासाठी मध्यम फलदायी आहे. आठवड्याच्या सुरवातीस आपण प्रवास करू शकाल. परंतु, ह्या प्रवासामुळे मानसिक ताण वाढण्याची तसेच मित्रांशी मतभेद होण्याची संभावना असल्याने तो टाळण्याचा प्रयत्न करावा. कुटुंबात सलोख्याचा अभाव जाणवेल. कुटुंबातील एखाद्या व्यक्तीची प्रकृती आपणास व्यथित करण्याची शक्यता आहे.
मीन : व्यावसायिकदृष्टय़ा कला कौशल्याला वाव मिळेल. ग्राहकांच्या मागणीनुसार पुरवठा करणे शक्य होईल. व्यावसायिक वाढ झपाटय़ाने होईल. नोकरदार वर्गाला बढती मिळेल. आर्थिक बाबतीत खर्च कमी होतील. राजकीय क्षेत्रात रेंगाळलेली कामे मार्गी लागतील. भावंडांशी वाद होणाऱ्या गोष्टींवर चर्चा करू नका. शेजार धर्माविषयी आपुलकी वाटली तरी दोन हात लांब राहा. हा आठवडा आपल्यासाठी मध्यम फलदायी आहे. आठवड्याच्या सुरवातीस आपण मानसिक चिंतेने त्रस्त व्हाल. कोणताही निर्णय आपण सहजतेने घेऊ शकणार नाही. थोड्या अडचणी येतीलच. ह्या आठवड्यात एखादे मोठे काम हाती घेतल्यास त्यात यशस्वी होण्याची संभावना धूसर असल्याने ते घेणे टाळावे. नोकरी करणाऱ्यांचा कामातील आत्मविश्वास वाढेल.