धरणगाव (जयेश माळी) राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे अमळनेर जात असतांना त्यांचे महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून धरणगावात जल्लोषात स्वागत करण्यात आले. दरम्यान, यावेळी गावातील पाणी टंचाईची माहिती दिल्यावर मला पत्र द्या, मी निश्चितच विधानसभेत प्रश्न उपस्थित करेल, असे आश्वासन जयंत पाटील यांनी दिले.
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज जळगावात कार्यकर्ता मेळावा घेतला. त्यानंतर ते धरणगावमार्गे अमळनेर जायला निघाले. धरणगावातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ त्यांचे स्वागत करण्यात आले. सर्वप्रथम महाराजांच्या पुतळ्याला माल्यार्पण करण्यात आले. त्यानंतर महाविकास आघीडीतील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांचे सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ,राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रवींद्रभैय्या पाटील, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, शरद तायडे, ज्ञानेश्वर महाजन, राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष दीपक वाघमारे, माजी नगराध्यक्ष निलेश चौधरी, माजी जि.प. उपाध्यक्ष जानकीराम पाटील, रवी पाटील, दीपक जाधव, अमोल हरपे, अमोल पाटील, अमित शिंदे,माजी नगरसेवक अहमद पठाण, भागवत चौधरी, राजेंद्र ठाकरे, संतोष सोनवणे यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
दरम्यान, स्वागत केल्यानंतर गावातील पाणी टंचाई बाबत जयंत पाटील यांना संपूर्ण माहिती देण्यात आली. त्यावर जयंत पाटील यांनी माजी नगराध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन यांना पत्र देण्यास सांगितले. तसेच याबाबत मी स्वत: पाठपुरावा करेल. तसेच वेळ पडल्यास विधासभेत देखील प्रश्न उपस्थित करेल असे आश्वासन जयंत पाटील यांनी धरणगावातील महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांना दिले.