मुंबई (वृत्तसंस्था) मध्यरात्रीची वेळ साधत राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो मुंबईचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांचा एक जुना फोटो ट्विट करत सवालही केला आहे.
या फोटोमध्ये समीर वानखेडे हे मुस्लीम वेशात दिसून येत आहेत. यह क्या किया तुने समीर दाऊद वानखेडे?’; मलिक असे म्हणत दुबईतून मध्यरात्री ‘फोटोबॉम्ब’ टाकला आहे. हा फोटो पोस्ट करतानाच मलिक यांनी ‘यह क्या किया तुने समीर दाऊद वानखेडे?’ कबूल है, कबूल है, कबूल है… असे कॅप्शन देखील दिले आहे. समीर वानखेडे हे हिंदू नसून मुस्लिमच असल्याचा आरोप मलिक यांनी केला आहे. त्यांनी याबाबत अनेकदा पत्रकार परिषद घेऊन काही पुरावे देखील सादर केले आहेत. आज पुन्हा एकदा मलिक यांनी समीर वानखेडे यांच्यावर ‘फोटोबॉम्ब’ फोडला आहे. त्यांनी वानखेडे यांचा ट्वटरवर एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोमध्ये समीर वानखेडे निकाह करारनाम्यावर सही करताना दिसत आहेत. या फोटोमुळे वानखेडे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.