अडावद (प्रतिनिधी) येथून जवळच असलेल्या धानोरा गावी तुझं काय म्हणन आहे रे…म्हणत गुप्ती काढून तरुणाला धमकी दिल्याप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासंदर्भात कल्पेश गजानन सपकाळे (वय.२३ धंदा शिक्षण रा. धानोरा ता. चोपडा) या तरुणाने फिर्याद दिली आहे.
कल्पेश सपकाळे या तरुणाने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, मी बाहेती कॉलेज जळगाव येथे MBA चे शिक्षण करत आहे. धानोरा ते जळगाव ये जा, करत असतो. आमच्या गावातील योगेश एकनाथ कोळी व त्यांचे परीवारातील लोक व आमचेत यापूर्वी बरेच वाद झाले असून आम्ही त्यांच्याविरुध्द अडावद पोलिसात तक्रार दिलेली आहे. त्यावरुन ते नेहमी मला शिवीगाळ दमदाटी करत असतात. कल्पेश सपकाळे हा आज दि. ८ जुलै रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास गावातील बसस्थानकाचे मेन चौकात असलेले रमण महाजन यांच्या दुकानात नाष्टा घेण्यासाठी गेला होता.
यावेळी नाष्टा घेत असतांना अचानक योगेश एकनाथ कोळी हा एक अनोळखी मुलासोबत आला व त्याने जुन्या भांडणाच्या कारणावरुन अचानक त्याच्या कमरेजवळ लावलेली गुप्ती काढली आणि काल्पेशला म्हणाला की, तुझं काय म्हणन आहे रे?, असे बोलून शिवीगाळ, दमदाटी करु लागला. यावेळी योगेश सोबत असलेला अनोळखी मुलगा व योगेश कल्पेशच्या अंगावर धावून गेले. तेव्हा कल्पेश तेथून घाबरुन पळून गेला. सदरची भांडण तेथे हजर असणारे ईश्वर शालीक कोळी, योगेश धुडकु कोळी यांनी पाहीली. कल्पेश घाबरुन घरी गेल्यावर आई-वडील यांनी सांगीतले की, दि. ७ जुलै रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास योगेश हा आपल्या घराजवळ येवून बोलला की, माझ्या नादी कोणी लागले, तर मी गुप्ती मारेल. सदर चौकातील CCTV चेक केले असता त्यात योगेश हा गुप्ती काढताना दिसत आहे. याबाबत आर्म अॅक्टसह विविध कलमान्वये दोघांविरुद्ध अडावद पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोहेका सुनील तायडे हे करत असून दोघं संशयित आरोपी फरार असल्याचे कळते.
















