बोदवड (प्रतिनिधी) बोदवड येथे तहसीलदार मिळावे म्हणून सरणावर झोपून उपोषण करणारे प्रमोद धामोडे यांच्याविरुद्ध अक्रम शेख याने मोबाईल चोरीचा संशय व्यक्त करत पोलीस ठाण्यात १९ रोजी लेखी अर्ज दिला होता. परंतू आता गैरसमजुतीतून तक्रार दिल्याचा पोलिसांसमोर जवाब देत तक्रारदार शेख यांनी घुमजाव केले आहे.
प्रमोद धामोडे यांचे उपोषण २१ रोजी दुपारचे सुमारास समाप्त झाले. त्यानंतर धामोळे यांच्याविरुद्ध तक्रार देणारे अक्रम शेख याने २१ रोजीच संध्याकाळी सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुश जाधव यांच्या समक्ष उपस्थित राहून जबाब दिला की, मी १९ तारखेस तक्रार दिली होती. मात्र नंतर शहानिशा करता माझ्या गैरसमजुतीतून ही तक्रार झाली, हे लक्षात आल्यावर मी समक्ष उपस्थित राहून धामोडे हे माझे चांगले मित्र असून गैरसमजामुळे हे घडले. तरी बाबत माझी माझी तक्रार राहिली नसल्याचे मी तक्रार अर्ज मागे घेत आहे. तरी त्यांच्याविरुद्ध कोणतीही कारवाई करू नये. एकूणच उपोषण करणाऱ्याविरुद्ध मोबाईल चोरीची तक्रार या लोकांमध्ये चर्चेत असलेल्या घटनेवर आता पडदा पडला आहे.