मुंबई (वृत्तसंस्था) मलिक त्यांच्या जावयाला वाचविण्यासाठी दररोज पत्रकार परिषदा घेतात. अशी टीका अमृता यांनी मंत्री नवाब मलिक यांच्यावर केला होती. त्यावर आज मलिकांनी उत्तर दिले आहे. वेळ आली तर तुमचीही काळी संपत्ती आज ना उद्या बाहेर काढणार, असा उघड इशाराच मलिक यांनी अमृता फडणवीस यांना दिला आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी देखील मंगळवारी पत्रकार परिषद घेत, मलिकांवर गंभीर आरोप केला होता. मलिकांचे संबंध अंडरवर्ल्डशी असल्याचा आरोप फडणवीसांनी केला होता. त्यानंतर त्यांची पत्नी अमृता फडणवीस यांनी देखील ट्विट करत मंत्री नवाब मलिक यांच्यावर निशाणा साधला होता.
वरळीत दोनदोनशे कोटी रुपयांचे फ्लॅट कुणाच्या नावावर आहेत? ती काळी संपत्ती बाहेर काढायची वेळ आली तर ते आज ना उद्या काढू. पुढे मलिक म्हणाले की, ‘मी महिलांच्या टीकेला उत्तर देऊ इच्छित नाही. उलट चोर मचाये शोर.’ असे म्हणत मलिकांना अमृता फडणवीसांना थेट इशारा दिला.