नवी दिल्ली (वृत्तसंस्था) गुजरातमध्ये झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल काल जाहीर करण्यात आला आहे. यावेळी सरपंच पदासाठी लढणाऱ्या एका उमेदवाराची जोरदार चर्चा रंगलीये. संतोषभाई हलपती असं या उमेदवाराचं नाव असून त्याला फक्त एकच मत पडलं. विशेष म्हणजे त्याच्या घरातील १२ जणांनी मतदान केलं पण एकच मत पडले. यामुळे संतोष अत्यंत भावूक झाले आणि ते ढसाढसा रडायलाचं लागले.
घरातील मंडळींनी साथ न दिल्याचं त्यांच्या खूपच मनाला लागलं. त्यामुळे सध्या संतोष यांना निवडणुकीत पडलेलं मत हा एकच गावात चर्चेचा विषय आहे. रिपोर्टनुसार, गुजरातच्या वापी जिल्ह्यातील छरवाडा ग्रामपंचायतीच्या वॉर्ड नंबर ५ मध्ये सरपंच पदासाठी संतोष उभे राहिले होते. त्यांना किमान आपल्या घरातीस सदस्य तरी मतदान करतील अशी आशा होती. मात्र १२ सदस्य असले फक्त एकच मत मिळालं. हे ऐकून संतोष इतके भावूक झाले की काऊंटिंग सेंटरवरच मोठमोठ्याने रडू लागले. माझ्या कुटुंबातील सदस्यांनीही मला मत दिलं नाही असं म्हणत त्यांनी आपलं दुःख व्यक्त केलं आहे. गुजरातमध्ये सरपंच पदासाठी तब्बल २७ हजार उमेदवार मैदानात आहेत.
















