जळगाव (प्रतिनिधी) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जुन्या व प्रामाणिक पक्षाला अडचणीच्या काळात साथ देणारे, अंगावर केसेस घेणारे कार्यकर्त्यांना न्याय कधी ? , असा सवाल अँड. सचिन डी. पाटील यांनी एका पत्राद्वारे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांना केला आहे. तसेच पक्ष निष्ठावान कार्यकर्त्यांना न्याय मिळावा, अशी मागणी ही त्यांनी केली आहे.
अँड. सचिन डी. पाटील यांनी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना दिलेल्या पत्रात म्हंटले आहे की, जिल्ह्यातील पक्षाचे कठीण काळातील दिवसात वारा आल्यावर जशी झाडाची पाने गळतात. त्याच पद्धतीने नेते सोडून जात होते. त्यावेळी आम्ही फक्त साहेबांवर त्यांच्या ध्येयावर विश्वास ठेऊन काम करत होतो. पक्षाला संपविण्यासाठी ज्यांनी दिवसरात्र एक केली. त्या लोकांना नंतर पूर्ण उभ्या महाराष्ट्रात साहेबांशी जुळवून घ्यावे लागले. तसा साहेब कोणीही आला तर मदतच करतात, त्यात शंका असण्याचे कारणच नाही. साहेबांनी नेहमीच युवकांना नवीन लोकांना संधी देऊन त्यांचे निर्णय नेहमीच योग्य करून दाखवले आहेत.
तसाच निर्णय साहेब जळगाव जिल्ह्यासाठी नेहमीच घेतात. कारण साहेबांच तस प्रेम जळगाव जिल्ह्यात आहे. परंतु सध्या जळगाव जिल्ह्यात नवीन नवीन प्रवेश झाले. आनंद आहेच पण आमच्या सारख्या कार्यकर्त्यांचे देखील अंगावर केसेस घेतल्या, आंदोलन केले, वेळ प्रसंगी जेल भरो आंदोलन देखील केले. पक्षाने कोणाला पद द्यावे, हे नेत्यांनी ठरवावे. परंतु, जे कार्यकर्ते प्रामाणिक राहून पक्षाची सेवा करत आले, त्याच विचार कधी होईल ? कारण जळगाव मनपा मध्ये नुकतेच सत्तांतर कशामुळे झाले, हे सर्वांनी पहिले आहे. तसेच काहीसे अन्याय झाला की होत असते.
जळगाव जिल्हाध्यक्ष अभिषेक पाटील यांची नियुक्ती करताना आम्ही देखील मुलाखत दिल्या होत्या, त्यावेळेस पक्षाने जो निर्णय तो आम्ही आमचे नेते अरुणभाई, गुलाबराव देवकर, सतीश अण्णा, रवींद्र भैय्या यांच्यासह मान्य केला. आम्ही तेव्हा देखील दावे दारी केली होती. परंतु, तेव्हा देखील आम्हाला शांत बसावे लागेल.
आज एका बातमीत अशोकभाऊ लाडवंजारी यांना पद मिळणार असं वाचायला मिळाले, परंतु अशोक भाऊ यांनी जळगाव अध्यक्षपद भाजपाचे विरोधी पक्ष नेतेपद तसेच विविध समितींवर कामकेले आहे. त्यांनी आता त्यांच्यापेक्षा वयाने लहान असलेल्या व्यक्तीचे पद घेणे हे देखील योग्य होणार नाही. त्यामुळे लाडवंजारी यांनीच मोठ्या मनाने त्यांचे लहान बंधू समजून आमचे नाव पुढे करून न्याय द्यावा. आर. आर. आबांनी अनेकांना संधी देऊन मोठे केले होते. त्याचपद्धतीने आम्हाला देखील संधी द्यावी, ही विनंती या निमित्ताने करत आहे. त्याच प्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे धोरणच स्वतः साहेबांनी वेळोवेळी भाषणातून सागितले आहे की, पडतीच्या काळात पक्षासोबत राहिलेल्या कार्यकर्त्याना पहिले प्राधान्य राहून न्याय दिला जाईल. आदरणी वळसे पाटील साहेब जळगाव जिल्हाचे प्रभारी होते. त्यामुळे त्यांना जिल्ह्याची संपूर्ण माहिती आहे. स्वतः वळसे पाटील साहेब यांनी माझ्या सारख्या साधारण घरातील कार्यकर्त्याला न्याय देण्याचा प्रयत्न केला होता. पणं काही तांत्रिक अडचणीमुळे मला थाबवे लागले होते. तरी देखील पक्ष निष्ठावान कार्यकर्त्या म्हणून न्याय मिळावा, असे पत्रात म्हंटले आहे.