जळगाव (प्रतिनिधी) विहिरीतील पाण्याच्या मोटारीच्या दुरुस्तीचे ते काम करतांना कंबरेला बांधलेला दोर तुटल्यामुळे गोपीचंद पंढरीनाथ बाविस्कर (वय ५८, रा. कानळदा, ता. जळगाव) हे विहरीत कोसळले. त्यांचा पाण्यात बुडून दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना दि. २१ मे रोजी कानळदा शिवारातील शेतात घडली.
जळगाव तालुक्यातील कानळदा गावात गोपीचंद बाविस्कर हे वास्तव्यास होते. ते कानळदा परिसरातील विश्वास नाना पाटील यांच्या शेतातील मोटार नादुरुस्त झाल्याने गावातील विठ्ठल पाटील या तरुणाला सोबत घेवून विहरीतील मोटार दुरुस्तीचे काम करीत होते. काम करत असतांना त्यांनी कमरेला दोरी बांधून ते विहरीत उतरले होते तर विहरीतील पाटीवर विठ्ठल पाटील हा तरुण उभा होता. अचानक दोरी तुटल्याने गोपीचंद बाविस्कर हे सुमारे ४० फुट खोल असलेल्या विहरीत पंधरा ते वीस फुटांवरुन खाली कोसळले. यामध्ये त्यांच्या डोक्याला आणि पायाला गंभीर दुखापत होवून ते पाण्यात बुडाले. यावेळी त्यांचा पाण्यात बुडून दुर्देवी मृत्यू झाला. तर त्यांच्यासोबत असलेला विठ्ठल पाटील (वय २८) हा तरुण गंभीर जखमी झाला आहे.
ग्रामस्थांच्या मदतीने काढले विहरीतून बाहेर
दोरी तुटल्यामुळे गोपीचंद बाविस्कर हे विहरीत बुडाल्याचे माहिती मिळताच ग्रामस्थांनी शेताकडे धाव घेतली. त्यानंतर बाविस्कर व जखमी विठ्ठल पाटील या दोघांना विहरीतून बाहेर काढीत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मयत घोषित केले. यावेळी कुटुंबीयांनी प्रचंड आक्रोश केला.
तालुका पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद !
घटनेची माहती मिळताच तालुका पोलीस ठाण्याचे पोहेकॉ अनिल फेगडे, रामकृष्ण इंगळे यांनी रुग्णालयात धाव घेतली. त्यांनी गोपीचंद बाविस्कर यांच्या मृतदेहाचा पंचनामा करुन या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मयत गोपीचंद बाविस्कर यांच्या पश्चात मुलगा व सून असा परिवार आहे.