नवी दिल्ली (वृत्तसंस्था) “जनता होरपळत असताना पंतप्रधान जबाबदारी सोडून निवडणुकीत मग्न होते. जनतेने या आधुनिक नीरोचे फिडल काढून घेतले”, असं ट्वीट करत काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे.
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकांमध्ये सलग तिसऱ्यांदा बंगालच्या जनतेनं ममता बॅनर्जी यांच्यावरच विश्वास दाखवल्याचं दिसत आहे. तृणमूल काँग्रेसचंच सरकार पुन्हा एकदा पश्चिम बंगालमध्ये स्थापन होणार असल्याचं स्पष्ट झालं असताना आता त्यावर प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. महाराष्ट्रातील काँग्रेसकडून या निकालांवरून थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. “सत्तापिपासू वृत्तीने पश्चिम बंगालमध्ये कोणत्याही परिस्थितीत विजय मिळवण्यासाठी संपूर्ण देशाला वेठीस धरणाऱ्या मोदीजींच्या अतिमहत्त्वाकांक्षेला बंगालच्या जनतेनं धूळ चारली आणि या आधुनिक नीरोचे फिडल काढून घेतले. जनता होरपळत असताना पंतप्रधान जबाबदारी सोडून निवडणुकीत मग्न होते”, असं ट्वीट सचिन सावंत यांनी केलं आहे.
















