TheClearNews.Com
Monday, June 9, 2025
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

मतदान करताना तरुणांनी बेरोजगारी,महिलांनी महागाई,शेतकऱ्यांनी पडलेले शेतमालाचे भाव लक्षात ठेवुन मतदान करा : रोहिणी खडसे !

vijay waghmare by vijay waghmare
April 23, 2024
in राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

वर्धा (प्रतिनिधी) मतदान करायला फक्त पाच मिनिटे वेळ लागतो परंतु हे पाच मिनिटे तुमचे पुढील पाच वर्षांचे भविष्य ठरवतात म्हणुन मतदान करताना तरुणांनी गेल्या पाच वर्षातील बेरोजगारी महिलांनी महागाई, त्यांच्यावर झालेले अत्याचार, त्यांचा विषयी काढलेले अनुदगार त्यातून महिलांचा झालेला अपमान, शेतकरी बांधवानी पडलेले शेतमालाचे भाव ,वाढलेल्या खतांच्या किमती आठवुन योग्य निर्णय घेवून महाविकास आघाडीच्या उमेदवारांना मतदान करा असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांनी केले.

रोहिणी खडसे या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष म्हणुन कार्य करत आहेत त्या अनुषंगाने त्या राज्यभर महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ दौरे करत आहेत वर्धा लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार अमर काळे यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष खा. शरद पवार, शिवसेना उबाठा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची हिंगणघाट येथे प्रचार सभा पार पडली.

READ ALSO

शिवसेना म्हणजे चळवळ, धनुष्यबाण म्हणजे जनतेचा आत्मविश्वास – पालकमंत्री गुलाबराव पाटील

मंत्री गिरीश महाजनांचे महिला आयएएस अधिकाऱ्यास रात्री फोन ; खडसेंचा आरोप

या सभेत उपस्थित पदाधिकारी, मतदारांना मार्गदर्शन करताना रोहिणी खडसे म्हणाल्या आपल्या सर्वांचा जो उत्साह दिसतोय त्या उत्साहात येत्या 26 तारखेला तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हावर मतदान करून अमर काळे यांना मतदान रुपी आशिर्वाद द्यावे हि विनंती करायला आम्ही सर्व जण आले आहोत. तुमचा सर्वांचा उत्साह बघुन मला खात्री आहे तुमचे आशिर्वाद अमर काळे यांच्या पाठीशी आहेत आणि अमर काळे नक्की निवडून येतील हा तुमच्या प्रतिसादावरून मला विश्वास आहे.

महाराष्ट्रा मध्ये महाविकास आघाडी साठी पुरक असे वातावरण आहे. एक उस्फुर्त असा प्रतिसाद महाविकास आघाडीला तरुण, महिला, शेतकरी देत आहेत. पण फक्त उत्साह दाखवून सभेला हजेरी लावून होणार नाही आपल्याला बदल घडवायचा आहे आणि त्यासाठी माझी सर्व पदाधिकारी ,कार्यकर्त्यांना विनंती आहे येत्या २६ तारखेला गाव, वाडा, वस्ती, बुथची जबाबदारी घ्या. मतदान केंद्रापर्यंत मतदान कसे पोहचेल यासाठी प्रयत्न करा. माझ्या महिला पदाधिकाऱ्यांना माझी विनंती आहे आपण घरातील चुलीपर्यंत जाऊ शकतो आपण जास्तीत मतदान काढण्यावर भर द्यायला हवा. आपण माता भगिनी घराबाहेर पडून मतदानासाठी गेलो तर आपण आपली परिस्थिती बदलवू शकतो गेल्या दहा वर्षांच्या कार्यकाळात जर कुणाला सर्वात जास्त झळ बसली असेल तर ती आपल्या माता भगिनींना आहे. मतदान करायला फक्त पाच मिनिटे वेळ लागणार आहे पण या पाच मिनिटाच्या काळामध्ये तुमच्या पुढील पाच वर्षाचे भवितव्य ठरणार आहे .

पाच मिनिटाच्या मतदानाच्या काळामध्ये तुमच्या मतदानातून येत्या पाच वर्षांमध्ये उमेदवाराकडून, खासदाराकडून तुम्हाला काय हवंय काय अपेक्षित आहे आणि ते तुम्हाला कोणता उमेदवार देऊ शकतो हे पाच मिनिटाच्या मतदानावर अवलंबून राहणार आहे. म्हणून पाच मिनिटांचे मतदान करताना तरुणांनी तुमची बेरोजगारी लक्षात ठेवा. महिलांनी तुमच्यावर झालेले अत्याचार ,तुमच्या विषयी भाजप नेत्यांनी काढलेले अनुदगार त्यातून तुमचा झालेला अपमान आणि वाढलेली महागाई मुळे घर संसार चालवायला करावी लागणारी कसरत लक्षात ठेवा. शेतकरी बांधवांनी गेल्या पाच वर्षात शेतमालाला भाव मिळाला नाही,खतांच्या बेसुमार किंमती वाढल्या हे सर्व लक्षात ठेवून महाविकास आघाडीच्या उमेदवाराला मतदान करा. तुम्ही सर्व सुज्ञ आहात आणि तुम्ही सूज्ञतेने मतदान कराल हा मला विश्वास आहे. परत एकदा अमर काळे यांच्या तुतारी वाजवणारा माणुस या निशाणी समोरील बटण दाबून अमर दादा काळे यांना विजयी करा असे सर्वांना आवाहन करते आणि तुम्ही सर्व मतदार नक्कीच अमर काळे यांना विजयी करतील असा विश्वास आणि आशा रोहिणी खडसे यांनी व्यक्त केली.

याप्रसंगी माजी गृहमंत्री अनिल देशमुख, आपचे दिल्ली येथिल खासदार संजय सिंह, उमेदवार अमर काळे, आमदार रणजित कांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी महाविकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते ,मतदार मोठ्या उपस्थित होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: rashtrvadi congressRohini khadse

Related Posts

जळगाव

शिवसेना म्हणजे चळवळ, धनुष्यबाण म्हणजे जनतेचा आत्मविश्वास – पालकमंत्री गुलाबराव पाटील

May 17, 2025
जळगाव

मंत्री गिरीश महाजनांचे महिला आयएएस अधिकाऱ्यास रात्री फोन ; खडसेंचा आरोप

April 7, 2025
जळगाव

काँग्रेसच्या जिल्हा बैठकीत जोरदार गोंधळ !

March 26, 2025
एरंडोल

एरंडोल तालुक्यात शिवसेना ठाकरे गटाला खिंडार ; असंख्य कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश !

March 19, 2025
अमळनेर

तासखेडा ग्रा.प. उपसरपंचपदी वर्षा पाटील बिनविरोध

March 17, 2025
बोदवड

बोदवड शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला धक्का; तिन नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश, तर तीन नगरसेवक भाजपमध्ये!

March 14, 2025
Next Post

जैन भूमिपुत्र ‘रामलल्ला’ विशेषांकाचे हनुमान जयंती दिनी प्रकाशन !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

बोदवड ग्रामीण रुग्णालयाचे उपजिल्हा रुग्णालयात रूपांतर करण्यात यावे : भोले महाकाल फाऊंडेशनची मागणी !

September 14, 2022

निखिल खडसे यांच्या जयंतीनिमित्त नाथ फाउंडेशनतर्फे विविध सामाजिक उपक्रम !

December 31, 2020

मद्यधुंद तरुणीचा धिंगाणा..अन्‌ थेट पोलीस कॉंस्टेबलची कॉलर पकडली ; व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

June 17, 2022

कोरोना विरुद्धच्या लढ्यासाठी धावणार ऑक्सिजन एक्स्प्रेस

April 18, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group
 

Loading Comments...