मुंबई (वृत्तसंस्था) प्रविण दरेकर (Pravin Darekar) यांनी मुंबई बँकेचे (Mumbai Bank) अध्यक्ष असतानाच्या काळात २ हजार कोटींचा घोटाळा केला आहे. सहकार विभागाने केलेल्या चौकशीत हा घोटाळा झाल्याचे समोर आले आहे. यामुळे प्रवीण दरेकर आणि त्यात सहभागी कोणी असेल तर त्याच्यावर सहकारी वर गुन्हे दाखल झाले पाहिजेत आणि फडणवीस यांनी देखील राजीनामा दिला पाहिजे अशी मागणी काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप यांनी केली.
पत्रकार परिषदेत बोलताना भाई जगताप म्हणाले, ‘एवढा श्रीमंत मंजूर असू शकतो याचे आश्चर्य वाटते, त्या मजुरांचे नाव म्हणजे प्रवीण दरेकर असं म्हणत त्यांनी दरेकरांच्या मजुर प्रकरणावरुन टीका केली. तसंच, जवळपास 2 हजार कोटींच्या या घोटाळ्यात कोण कोण सहभागी आहेत हे शोधावं लागेल. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि तेव्हाचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी तेव्हा गुन्हा दाखल का नाही केला ? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
हे सर्व देवेंद्र फडणवीस यांच्या काळातील आहे. जर देवेंद्र फडणवीस यांच्यात नैतिकता असेल तर त्यांनी देखील विरोधी पक्ष नेता पदाचा राजीनामा दिला पाहिजे. कलम 199, 200, 417, 420, 468 या अंतर्गत प्रवीण दरेकर आणि त्यात सहभागी कोणी असेल तर त्याच्यावर सहकारी वर गुन्हे दाखल झाले पाहिजेत आणि फडणवीस यांनी देखील राजीनामा दिला पाहिजे अशी मागणीही भाई जगताप यांनी यावेळी केली.
या प्रकरणात दोषी असणाऱ्या प्रत्येकाचा सज्जनतेचा बुरखा आम्ही फाडणार आहोत. प्रवीण दरेकर जेव्हा चेअरमन होते तेव्हा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते आणि ते दरवेळी त्यांना क्लीन चीट देत गेले. ते देवेंद्र फडणवीस नसून देवेंद्र फसणवीस आहेत. तसंच हा घोटाळा साधारण 2013-14 ते 2019 पर्यंतचा असल्याचंही जगताप म्हणाले.