अमळनेर (प्रतिनिधी) मनात इच्छाशक्ती व जिद्द असली की आपण कोणत्याही परीक्षेत सहज उत्तीर्ण होऊ शकतो. त्यासाठी मनाची तयारी खूप महत्त्वाची आहे. आपण पाहिलेले स्वप्न सत्यात उतरते तेव्हा मिळालेला आनंद हा सर्वात मोठा असतो. अशाच अमळनेर येथील मुंदडानगर भागात वास्तव्य करणाऱ्या व जळोद येथे जिल्हा प्राथमिक शाळेत उपशिक्षिका पदावर कार्यरत असलेल्या जयश्री संदीप पाटील (पवार) यांनी आपल्या बुद्धिमत्तेचा ठसा कोण होणार करोडपती येथे उमटवला. त्यांच्या या यशाचे अभिनंदन सर्वत्र होत आहे.
सोनी मराठी चैनलवर कोण होणार करोडपती मधे मुंदडा नगर (पाण्याच्या टाकी जवळ) अमळनेर जि.जळगाव येथे राहणाऱ्या श्री.संदिप रघुनाथ पाटील यांच्या पत्नी सौ.जयश्री संदिप पाटील (पवार) जि.प.शिक्षिका, जळोद ह्या दि. 8 व 9~6~2022 रोजी पंचवीस लाख रुपयाच्या प्रश्ना पर्यंत खेळल्या व बारा लाख पन्नास हजार रु जिंकल्या. त्याबद्दल त्यांचे अभिनंदन तसेच पुढील वाटचालीस प्रभागाच्या वतीने शुभेच्छा देतांना विश्वनाथ (रवि) पाटील तसेच पत्रकार ईश्वर महाजन, अशोक साळुंखे, रोहित तेले, किरण अहिरे, महेश पाटील इ. तसेच त्यांना प्रभाग क्रं 14 च्या वतीने नगरसेविका कमलबाई पितांबर पाटील यांनीही पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
जयश्रीताई यांनी कोण होणार करोडपती कार्यक्रमात आलेले अनुभव कथन केले. एवढ्या मोठ्या कार्यक्रमात जायला मिळालं हा माझ्या जीवनातील सर्वात मोठा आनंद आहे. यातून मला शिकायला सुद्धा खूपच मिळाले .यासाठी माझ्या परिवाराचे मला सहकार्य लाभले . सर्व स्तरातून माझे अभिनंदन करण्यात आले. आम्ही सर्वांचे ऋणी राहू असे त्यांनी सांगितले.