नवी दिल्ली (वृत्तसंस्था) महिलांच्या जिन्सवरुन वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या उत्तराखंडचे मुख्यमंत्री तीरथसिंग रावत यांनी पुन्हा एकदा त्यांच्या इतिहासाच्या ज्ञानाचा परिचय करुन दिला आहे. एका कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्री रावत म्हणाले की, कोरोना काळात अधिक धान्य मिळवण्यासाठी तुम्ही अधिक मुलं जन्माला का घालत नाही?, असा विचित्र प्रश्न त्यांनी उपस्थितांना विचारला आहे.
उत्तराखंडचे नवे मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत यांच्यावर सध्या वादग्रस्त विधानामुळे जोरदार टीका होत आहे. एका कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्री रावत यांनी महिला वापरत असलेल्या जीन्सवर विधान केलं असून यामुळे नवा वाद निर्माण झाला. रावत आपल्या एका विधानामुळे खूपच चर्चेत आले आहेत. याच दरम्यान आता पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केलं आहे. ते म्हणाले, भारत २०० वर्षे अमेरिकेचा गुलाम होतं. ज्या अमेरीकेनं जगावर राज्य केलं, तोच अमेरीका अता कोरोना काळात संघर्ष करत आहे. भारतावर अमेरिकेने नाही तर ब्रिटनने राज्य केले होते.
मिळालेल्या माहितीनुसार, नैनीताल जिल्ह्यातील रामनगरमध्ये एका कार्यक्रमादरम्यान धान्यवाटपाविषयी बोलताना त्यांनी हे वादग्रस्त विधान केलं आहे. “कोरोना काळात प्रभावित झालेल्या प्रत्येक कुटुंबाला प्रती सदस्य ५ किलो धान्य मिळाले आहे. ज्यांच्या घरात १० सदस्य आहेत त्यांना ५० किलो धान्य मिळालं. तसेच ज्यांच्या घरात २० सदस्य आहेत त्यांना एक क्विंटल धान्य मिळालं. ज्या घरात २ सदस्य आहेत त्यांना केवळ १० किलो धान्य मिळाले. अनेक लोकांनी हे धान्य साठवलं आणि ते विकलं” असं रावत यांनी म्हटलं आहे.
आपल्याकडे वेळ असताना दोनच मुलांना जन्म दिल्याबद्दल तुम्हाला वाईट वाटेल
“मी असा चांगला तांदुळ कधीही खालेला नाही. आता याचा दोष कुणाला द्यायचा? आपल्याकडे वेळ असताना आपण दोनच मुलांना जन्म दिल्याबद्दल आता तुम्हाला वाईट वाटेल. आपण २० मुलांना जन्म का दिला नाही असंही तुम्हाला वाटत असेल” असंही तीरथ सिंह रावत यांनी म्हटलं आहे.