TheClearNews.Com
Wednesday, September 16, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

शेतीला व्यवसाय म्हणून पहा!

जैन हिल्सला फालीच्या अकराव्या अधिवेशनाच्या तिसऱ्या टप्प्यात शेतकऱ्यांशी विद्यार्थ्यांचा संवाद

vijay waghmare by vijay waghmare
May 3, 2025
in कृषी, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) जमिन कमी असली तरी चालेल मात्र त्याला व्यवसायीक दृष्टीने बघितले पाहिजे भांडवल, बाजारपेठ यासह जे जे नवतंत्र उपलब्ध आहे त्याचा वापर आवश्यकतेनुसार केला पाहिजे निर्यातक्षम उत्पादन घेतले पाहिजे. शेतीत सात्तत ठेवले पाहिजे, संघर्षाच्या काळातही ती करत राहिले पाहिजे, असा सल्ला शेतकऱ्यांनी विद्यार्थ्यांना दिला.

‘फ्युचर ॲग्रिकल्चर लीडर्स ऑफ इंडिया’ (FALI) अकरावे अधिवेशनच्या तिसऱ्या टप्प्याची आज जैन हिल्सला सुरवात झाली. जैन हिल्स येथील शेती संशोधन प्रात्यक्षिक केंद्रातील क्षेत्रभेटीनंतर फालीच्या विद्यार्थ्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. आकाश ग्राऊंडवर झालेल्या चर्चासत्रात बुरहानपूर जिल्ह्यातील फोफनार येथील सचिन मधुकर महाजन, चंदन विनायक महाजन, संदिप पाटील वढोदा ता. चोपडा, बापुसाहेब शिवाजी पाटिल तरळी ता. शिरपूर, अंकुश पाटील खिर्डी ता. रावेर या शेतकऱ्यांनी सहभाग घेतला. टरबूज, केळी, हळद, कापूस, जैन स्विट ऑरेंज, मोसंबी, लिंबू, हरभरा, गहू उत्पादनातील त्यांचे अनुभव सांगितले.

READ ALSO

अंधाराकडून प्रकाशाकडे नेणाऱ्या अभियंत्यांचा अहोरात्र सेवेबद्दल सन्मान

जून्या वादातून दोघ भावंडाकडून तरुणावर धारदार पट्टीने वार

शैक्षणिक पात्रतेतून शेतीत आलात तर आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करू शकतो. टिश्यूकल्चर रोपांची माहिती, शेती समोरील आर्थिक संकटे दूर करण्यात टिश्यूकल्चर रोपं महत्वाचे आहेत कारण त्या एका रोपापासून चांगले उत्पादन होते. असे सांगत मका, केळी, टरबूज पिकाचे आर्थिक गणित मांडले. मातीच्या अनुभवातून बियाण्याची निवड केली पाहिजे. पाण्यासह खतांचे काटेकोरपणे वापर केला पाहिजे. कृषीक्षेत्रातील नवसंशोधन त्याची फायदे आणि वापरातून शेतकऱ्यांची समृद्धता याविषयी शेतकऱ्यांनी प्रश्नोत्तरांद्वारे सांगितले. स्वयंचलित यंत्रणा ऑटोमेशन, विविध फिल्टरच्या वापरातून पाण्याचा कार्यक्षमतेने वापर करणे. वॉटर सोल्यूबल खतांचा वापर याविषयी सुद्धा माहिती दिली. शेतीतील भविष्य काय आहे त्यासाठी विद्यार्थ्यांनी निरक्षणातून कसे बदल करावेत याबाबत सखोल माहिती दिली. रेहांत फकिर, प्रणव पाटील, आकांशा सूर्यवंशी, आदिती मंदाळे, वेदांती चंदिवाल, रितु डाबी या फाली विद्यार्थ्यांनी लीड केले. रोहिणी घाडगे, जुली पटेल यांनी सूत्रसंचालन केले.

तिसऱ्या टप्प्यातील पहिला दिवस
फाली उपक्रमात तिसऱ्या टप्प्यात ४०० विद्यार्थी व फालीचे शिक्षक सहभागी झाले. पहिल्या दिवशी जैन हिल्स येथील फळ व भाजीपाल निर्जलीकरण प्रकल्प, परिश्रम, जैन हिल्स शेती संशोधन प्रात्यक्षिक केंद्र, ड्रीप डेमो, अल्ट्रा हायडेन्सिटी प्लान्ट डेमो प्लॉट, फ्यूचर फार्मिंग, एअर आलू, टिश्यूकल्चर येथे भेट दिली. जगप्रसिद्ध अशा गांधी तीर्थच्या म्युझियमला देखील भेट दिली. त्याचप्रमाणे टिश्यूकल्चर पार्क, फळ प्रक्रिया प्रकल्पास भेट देऊन तेथील निर्मितीची प्रक्रिया जाणून घेतली. याच्या यशस्वीतेसाठी जैन इरिगेशनचे अधिकारी, सहकारी तसेच फालीचे हर्ष नौटियाल यांनी परिश्रम घेतले.

अधिकारी व शेतकरी यांच्यासमवेत विद्यार्थ्यांची गट चर्चा
दुपार सत्राच्या या कार्यक्रमात परिश्रम जैन हिल्स येथे राऊंट राबिन गट चर्चा झाली. यामध्ये जैन इरिगेशनचे आंतरराष्ट्रीय डॉ. सुब्रमण्यम, डॉ. कल्याणी मोहरीर, किशोर रवाळे, अतिन त्यागी, हे तसेच शिवकुमार, विजय वर्धन वासीरेड्डी (आयटी सी), आयुषी मित्तल, दिव्या छांगलानी (प्रोमेप्ट), स्विटी वेगुंठा (हेरिटेज न्युट्रीव्हेर), मंगेश देशमुख (गोदरेज), अमित तायडे (नाबार्ड) , कैलास कालबंधा, प्रविणकुमार कासट (स्टार अग्री) त्याच प्रमाणे जामनेर तालुक्यातील हिंगणे येथील प्रगतशील शेतकरी निलेश पाटील, शैलेश कृष्णा पाटील (पहूर) सहभागी झाले होते.

फालीचा ११वा वर्धापन दिन
फाली कार्यक्रमाचा आज ११ वा वर्धापन दिन होता या निमित्ताने फालीच्या संस्थापिका नॅन्सी बॅरी यांच्यासह शिक्षक, अधिकारी आणि शेतकरी यांच्या उपस्थितित केक कापण्यात आला.

आज इनोव्हेशन आणि व्यवसाय योजनांचे सादरीकरण

फाली-११ मध्ये सहभागी होणाऱ्या शाळांमधील फालीचे विद्यार्थी शालेय स्तरावरील व्यवसाय योजना आणि अॅग्रीटेक इनोव्हेशन स्पर्धांचे विजेते आहेत. हे विद्यार्थी जैन हिल्सच्या आकाश ग्राऊंड कृषी क्षेत्रातील संशोधनाविषयी सादरीकरण करणार आहेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaon

Related Posts

जळगाव

अंधाराकडून प्रकाशाकडे नेणाऱ्या अभियंत्यांचा अहोरात्र सेवेबद्दल सन्मान

September 16, 2026
गुन्हे

जून्या वादातून दोघ भावंडाकडून तरुणावर धारदार पट्टीने वार

September 16, 2026
गुन्हे

गुलाल अंगावर पडल्यामुळे बोलण्यासाठी गेलेल्या भावंडांवर दगडफेक

September 16, 2026
गुन्हे

अमळनेरात चोरट्यांनी दोन बंद घर फोडले

September 15, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 15 सप्टेंबर 2026 !

September 15, 2026
गुन्हे

दागिन्यांसाठी मावशीचा गळा आवळून खून

September 14, 2026
Next Post

साप्ताहिक राशिभविष्य 04 मे 2025 ते 10 मे 2025

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जळगावात आ. राजूमामांचा “मॉर्निंग वॉक” प्रचार, नागरिकांचा सकारात्मक प्रतिसाद !

November 2, 2024

‘समजने वाले को इशारा काफी है’ : भाजप नेते चंद्रकांत पाटील

June 21, 2022

सोन्याचे दागीने चोरून नेणाऱ्या चोरट्याला चोवीस तासांत अटक ; एलसीबीची कारवाई

March 24, 2021

आता घरोघरी लसीकरण मोहीम राबवा ; मोदींचा देशवासीयांना नवा मंत्र

November 3, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group