अमळनेर (प्रतिनिधी) शहरातील एका ठिकाणी राहणाऱ्या २१ वर्षीय विवाहितेने पतीविरुद्ध तक्रार दिल्याने लाथाबुक्क्यांनी मारहाण करून तिचा विनयभंग केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात पतीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यासंदर्भात अधिक असे की, दि. २६ एप्रिल २०२२ रोजी रात्री १०.०० वाजेच्या सुमारास २१ वर्षीय विवाहित महिला व त्याचे परिवार जेवण करून अंगणात बसले होती. यावेळी आपल्याविरुद्ध ४९८ अ ची केस केली याचा राग आल्याने पतीने विवाहितेस लाथाबुक्क्यांनी मारहाण करून स्त्री मनास लज्जा उत्पन्न होईल अशी शिवीगाळ करून विवाहितेचा विनयभंग केला आहे. याप्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात संशयित आरोपी पतीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पो.ना. सुनील महाजन हे करीत आहेत.