मुंबई (वृत्तसंस्था) कथित भ्रष्टाचार प्रकरणात माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यासह अन्य आरोपींविरुद्ध माफिचा साक्षीदार होण्यासाठी सचिन वाझे (Sachin Vaze) याने विशेष CBI न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. सीबीआयने त्याच्या अर्जाला अटींसह होकार दिला आहे. आणि यावर ३० मे रोजी न्यायालयात सुनावणी होणार आहे.
मनी लाँड्रिंग प्रकरणात अनिल देशमुख सध्या कोठडीत आहेत. १०० कोटी वसुली प्रकरणात मागच्या अनेक दिवसांपासून अनिल देशमुख जेलमध्ये आहेत. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना एक पत्र लिहून या प्रकरणाची उकल केली होती. मनसुख हिरेन हत्या प्रकरणात याअगोदर सचिन वाझेचा हात असल्याचे याअगोदर रिपोर्टमधून समोर आले आहे. आता सोमवारी सचिन वाझेची सीबीआय कोर्टासमोर साक्ष होणार आहे. सचिन वाझे काय बोलतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे सध्या दोन मोठे नेते तुरुंगात आहेत. एक म्हणजे माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक. त्याचबरोबर शिवसेनेच्या अनेक लोकांवर भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले आहेत. अनिल परब, अर्जुन खोतकर, यशवंत जाधव, आनंदराव अडसूळ, भावना गवळी हे शिवसेना नेते ईडीच्या रडारवर आहेत.