नवी दिल्ली (वृत्तसंस्था) गुजरातमधील (Gujarat) पाटीदार नेते हार्दिक पटेल (Patidar leader Hardik Patel) यांच्या राजकीय भवितव्याबाबत बऱ्याच चर्चा सुरू आहेत. ज्यांनी काही दिवसांपूर्वीच काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आहे. मात्र एका मुलाखतीदरम्यान हार्दिक पटेल यांनी येत्या 10 दिवसांत मोठी घोषणा करण्याचे संकेत दिले आहेत.
गुजरात निवडणूक जवळ असतानाच हार्दिक पटेल यांनी राजीनामा दिला आहे. मुलाखतीत बोलताना हार्दिक पटेल यांनी आपण जेव्हा काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता तेव्हा वडील नेहमी तू चुकीचा पक्ष निवडला आहेस सांगायचे असा खुलासा केला. यावेळी हार्दिक पटेल यांनी कोणत्या पक्षात प्रवेश करणार या प्रश्नावर उत्तर देण्यास नकार दिला. निर्णय झाला आहे आणि लवकरच तुम्हा सर्वांना याची माहिती मिळेल. प्रत्येक व्यक्ती आपल्या राजकीय आयुष्यात चार मुद्दे सोबत घेत पुढील वाटचाल करत असतो, ज्यामध्ये समाज, देस आणि राज्याच्या भल्याचाही विचार असतो,” असं हार्दिक पटेल यांनी सांगितलं.
पुढील वाटचाल करत असताना काँग्रेस पक्षात राहून जे मी मिळवू शकलो नाही ते सर्व मिळवायचं आहे. मी त्याच मार्गावर चालणार असून गुजरातमधील जनतेच्या भल्यासाठी काम करणार आहे,” असंही ते म्हणाले. भाजपामध्ये प्रवेश कऱणार का? असा प्रश्न विचारण्यात आला असता हार्दिक पटेल यांनी पुढील १० दिवसांत आपला निर्णय जाहीर करु असं सांगितलं. यावेळी त्यांनी काँग्रेस पक्षावर जोरदार टीका करत मी सांगितलेल्या चार मुद्द्यांवर काम करण्यास काँग्रेस पक्ष तयार होता असं वाटत नसल्याचं म्हटलं.
“मी गेल्या सात वर्षांपासून राजकारणात आहे. काँग्रेस गेल्या अनेक वर्षांपासून सत्तेत नाही. गुजरातमधील जनतेला काँग्रेस पक्ष आवडत नसून त्यांना स्वीकारण्यास ते तयार नाहीत. त्यांची पसंती भाजपाला आहे. मी ज्या चार मुद्द्यांबाबत बोलत आहे ते सत्तेत असणाऱ्या पक्षाशी सुसंगत आहेत. पुढील १० दिवसांत माझा निर्णय सर्वांसमोर असेल,” असं हार्दिक पटेलने सांगितलं.