मुंबई (वृत्तसंस्था) उद्धव ठाकरे यांच्यामुळे राज ठाकरे यांना शिवसेना सोडावी लागली, हा इतिहास महाराष्ट्राला माहीत आहे. शिवसेना हा पक्षच ठाकरेंच्या हातून निसटू जाताना दिसत आहे. शिवसेनेतला हा सत्तासंघर्ष शिगेला पोहोचला असताना. सध्याच्या बिकट प्रसंगात उद्धव आणि राज यांनी एकत्र यायला हवं, अशी भावना मनसे आणि शिवसेना कार्यकर्त्यांनीही बोलून दाखवत आहेत.
आता शिवसेनेची सत्ता असताना आणि स्वतः उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना 40 हून अधिक आमदारांनी बंड केल्यानं शिवसेना अडचणीत सापडलीय. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसाच्या जगण्यासाठी आणि विकासासाठी खूप योगदान दिले आहे. शिवसेना हा पक्षच ठाकरेंच्या हातून निसटू जाताना दिसत आहे. शिवसेनेतला हा सत्तासंघर्ष शिगेला पोहोचला असतानाच, आता हिंदुत्वासाठी उद्धव आणि राज या दोघा भावांनी एकत्र यावेत, अशी मागणी अनेकांकडून केली जात आहे. यासाठी आता कधीकाळी मनसेत असलेल्या आणि आता राष्ट्रवादीत असलेल्या रुपाली ठोंबरे पाटलांनी त्यासाठी पुढाकार घेतलाय.
उद्धव ठाकरे असतील किंवा राज ठाकरे असतील हे दोघेही हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचीच मुल आहेत. अशा परिस्थितीत संकटात सापडलेल्या भावासाठी समोर यावे आणि पूर्वीची भांडणे विसरून एकत्र होण्याची गरज आहे हेच हिंदुत्व शिकवते. हिंदुत्व लोकांना शिकवणाऱ्यांनी भावासाठी एकत्र येणे गरजेचे आहे, असं रुपाली ठोंबरे पाटील यांनी म्हटलं आहे.दरम्यान, येत्या एक-दोन दिवसांत एकनाथ शिंदे मुंबईमध्ये परतणार आहेत. मुंबईत आल्यानंतर ते राज्यपालांना पत्र देतील. ३७ बंडखोर आमदारांनी महाविकास आघाडी सरकारचा पाठिंबा काढला असल्याचे हे पत्र असणार आहे.