नवी दिल्ली (वृत्तसंस्था) संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधी पक्षाच्या १२ खासदारांना राज्यसभेतून निलंबित करण्यात आले. या १२ खासदारांवर संपूर्ण हिवाळी अधिवेशनासाठी निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. या १२ खासदारांमध्ये काँग्रेसचे सहा, टीएमसी आणि शिवसेनेचे प्रत्येकी दोन, तर सीपीएम आणि सीपीआयच्या प्रत्येकी एका खासदाराचा समावेश आहे.
संसदेच्या पावसाळी अधिवेशनात गोंधळ घातल्यानं राज्यसभेच्या एकूण १२ सदस्यांना निलंबित करण्यात आलं. ही कारवाई हिवाळी अधिवेशनासाठी करण्यात आली आहे. त्यामुळे १२ खासदारांना आजपासून सुरू झालेल्या अधिवेशनात सहभागी होता येणार नाही.
कोण कोण निलंबित?
१. एलामरम करीम (सीपीएम)
२. फुलो देवी नेताम (काँग्रेस)
३. छाया वर्मा (काँग्रेस)
४. रिपुन बोरा (काँग्रेस)
५. बिनय विश्वम (सीपीआय)
६. राजामणी पटेल (काँग्रेस)
७. डोला सेन (तृणमूल)
८. शांता छेत्री (तृणमूल)
९. सय्यद नासिर हुसेन (काँग्रेस)
१०. प्रियंका चतुर्वेदी (शिवसेना)
११. अनिल देसाई (शिवसेना)
१२. अखिलेश प्रसाद सिंह (काँग्रेस)