नवी दिल्ली (वृत्तसंस्था) एसबीआय कार्ड अँड पेमेंट सर्व्हिसेस ने डिजिटल पेमेंट प्लॅटफॉर्म पेटीएम बरोबरच्या भागीदारीतून क्रेडिट कार्ड सादर केले आहे. ‘पेटीएम एसबीआय कार्ड’ आणि ‘पेटीएम एसबीआय कार्ड सिलेक्ट’ असे दोन प्रकारची कार्ड सादर केल्याची माहिती कंपनीने बुधवारी दिलेल्या निवेदनात दिली आहे. ही दोन्ही कार्डे व्हिसा प्लॅटफॉर्मवर काम करतात.
कंपनीने म्हटले आहे की, या भागीदारीच्या माध्यमातून नवीन क्रेडिट कार्डधारक औपचारिकरीत्या अर्थव्यवस्थेला रुळावर आणण्यासाठी हातभार लावणार आहे. ही कार्डे पेटीएम सिस्टममध्ये वापरली जाऊ शकत असून, ती कार्डे एनएफसी तंत्रज्ञानाने सज्ज असतील. तसेच या कार्डांच्या माध्यमातून ग्राहकांना कॉन्टॅक्टलेस पेमेंटची सुविधा मिळेल. एसबीआय कार्डने ग्राहकांना विविध प्रकारची उत्पादने देण्याचे कंपनीचे धोरण असल्याचे म्हटले आहे. जेणेकरून त्यांना त्यांच्या खर्चाच्या गरजेनुसार जास्तीत जास्त किमतीची उत्पादने दिली जाऊ शकतात आणि त्यांना डिजिटल पेमेंटसाठी प्रोत्साहित केले जाऊ शकते. देशातील क्रेडिट कार्ड उद्योगात अद्याप फारसा विस्तार झालेला नाही. त्याच वेळी डिजिटल पेमेंटबद्दल लोकांचा कल देखील वाढला आहे. अशा परिस्थितीत पेटीएमशी केलेल्या भागीदारीतून क्रेडिट कार्ड सर्वांसाठी उपलब्ध होईल. स्टेट बँक ऑफ इंडियाने नुकत्याच आपल्या चालू आर्थिक वर्षाच्या दुसर्या तिमाहीचे निकाल जाहीर केला.
‘पेटीएम एसबीआय कार्ड’ आणि ‘पेटीएम एसबीआय कार्ड सिलेक्ट’ असे दोन प्रकारची कार्ड सादर केल्याची माहिती कंपनीने बुधवारी दिलेल्या निवेदनात दिली आहे