जळगाव (प्रतिनिधी) मांजरीला दगड मारल्या कारणावरुन दाम्पत्याने महिलेला मारहाण करीत तीचा विनयभंग केला. ही घटना दि. २३ रोजी दुपारच्या सुमारास घडली. याप्रकरणी संशयित ईस्माइल गुलाम दस्तगीर व निलोफर ईस्माइल दस्तीगर (दोघ रा. शिवाजी नगर, मुगल गार्डनजवळ) यांच्याविरुद्ध शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील एका भागात ३२ वर्षीय विवाहिता वास्तव्यास आहे. त्यांच्या घराजवळ राहणारे ईस्माइल दस्तीगर यांनी मांजर पाळली असून दि. २३ रोजी दुपारी ते महिलेच्या घराजवळ आले. त्यांनी तु माझ्या पाळलेल्या मांजरीला दगडमारुन तीचा पाय लंगडा केला असे म्हणू लागले. त्यावर विवाहितेने मी तुमच्या मांजरीला दगड मारलेला नाही असे सांगितले असता, त्यांनी शिवीगाळ करुन मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यानंतर ईस्माइल दस्तगीर व त्याच्या पत्नीने विवाहितेच्या घरात शिरुन त्याने विवाहितेचे केस ओढून त्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी त्या विवाहितेचा विनयभंग देखील केला. हा प्रकार विवाहितेने पतीला घरी बोलावून सांगितल्यानंतर त्यांनी शहर पोलिसात तक्रार दिली. त्यानुसार संशयित ईस्माइल गुलाम दस्तगीर व निलोफर ईस्माइल दस्तीगर (दोघ रा. शिवाजी नगर, मुगल गार्डनजवळ) यांच्याविरुद्ध शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला