हिंगोली (वृत्तसंस्था) सेनगाव तालुक्यातील वटकळी येथील महिला सरपंचाच्या पतीने सिंचन विहीर मंजूर करण्याच्या कामासाठी पाच हजार रुपयांची लाच घेताना लाच लुचपत प्रतिबंधक पथकाने रंगेहाथ पकडल्याची घटना शुक्रवारी (दि.२५) घडली.
वटकळी येथील एका तक्रारदाराने हिंगोली लाचलुचपत विभागाकडे २४ जानेवारी रोजी तक्रार दाखल केली होती. लाचलुचपत विभागाने लाच मागणीची पडताळणी केली. वटकळी येथील एका लाभार्थ्याला त्याच्या वडिलांचा एमआरजीएस या योजनेमध्ये अहिल्यादेवी सिंचन विहीर मंजूर करण्यासाठी ठराव मंजूर करून त्या मंजूर ठरावाचे व सिंचन विहिरीचे पुढील कामात सहकार्य करण्यासाठी महिला सरपंचाचे पती शेकुराव शिंदे यांनी पाच हजार रुपये लाचेची मागणी केली होती.
पोलीस अधीक्षक डॉ. राजकुमार शिंदे, अप्पर पोलीस अधीक्षक रमेश कुमार स्वामी, पोलीस उपअधीक्षक अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली लाच लचलुचपत विभागाचे पोलीस निरीक्षक विनायक जाधव, प्रफुल अंकुशकर, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शेख युनुस, विजय शुक्ला, पोलीस ज्ञानेश्वर पंचलिंगे, गजानन पवार, राजाराम पोपटे, भगवान मंडलिक, रवी वरने, अकबर, योगिता अवचार, शिवाजी जाधव यांच्या पथकांनी शेकुराव शिंदे याला गुरूवारी तक्रारदाराकडून ५ हजार रुपयाची लाच घेताना रंगेहाथ पकडले.