जळगाव प्रतिनिधी : महिलेशी झालेल्या ओळखीतून तिला लग्नाचे आमिष दाखवत मनोज दादाभाऊ निकम (३५, रा. भोईटे नगर, जळगाव) याने तिच्यावर अत्याचार केला. तसेच वेगवेगळ्या कारणांनी तरुणासह त्याच्या आई-वडिलांनी एक कोटी २० लाख रुपये घेतले. हा प्रकार फेब्रुवारी २०२१ ते ४ जानेवारी २०२४ दरम्यान घडला.
३९ वर्षीय महिला नवी मुंबई येथे कंपनीमध्ये कार्यरत असताना तिची मोहन निकम याच्याशी ओळख झाली. फेब्रुवारी २०२१ मध्ये कोरोना काळात रिक्षातून जाण्यासाठी एकाच प्रवाशाला परवानगी असल्याने सदर महिला निकम याच्या रिक्षातून दररोज कंपनीतून ये-जा करीत, असे प्रवासादरम्यान ती कंपनीमधील रक्कम गुंतवणूक करून सभासद जोडण्याच्या योजनेविषयी कंपनीतील मंडळींशी बोलत असे. त्यामुळे निकम यानेही योजनेत गुंतवणुकीविषयी इच्छा व्यक्त केली. मात्र आर्थिक परिस्थिती ठीक नसल्याचे सांगून त्याच्या आई-वडिलांशी बोलणे करून दिले. आई-वडिलांनी गुंतवणुकीसाठी महिलेकडे एक लाख ५० हजार रुपये उसनवार मागितले. त्यानुसार महिलेने मनोजला ऑनलाईन रक्कम पाठविली.
रिक्षातून जात असताना मनोजने सदर महिलेला तिच्या वाढदिवसाविषयी विचारणाकरून तिला वाढदिवसाच्या दिवशी मोबाईल भेट दिला. त्यानंतर दोघांध्ये मैत्री वाढली. तसेच सदर महिलेचा पती मद्यपान करीत असल्याचे माहिती पडल्याने तरुणाने महिलेला पतीपासून वेगळी हो मी तुझ्याशी लग्न करेल असे अमिष दाखविले. त्यास महिलेनेदेखील सहमती दर्शविली. त्यानंतर तो तिला एका हॉटेलमध्ये घेऊन गेला व तिच्याशी जबरदस्ती शारीरिक संबंध केले. सन २०२१ च्या दिवाळी जळगावातील घरी घेऊन कालावधीत महिलेला आला. चार दिवस येथे असतानादेखील तिच्याशी शारीरिक संबंध केले. जळगावातून मुंबई येथे दोघेजण परतल्यानंतर महिलेच्या पतीला त्याच्या मूळ गावी पाठविण्याचे सांगितले. त्यानंतर तेथे महिलेच्या घरी येऊन त्याने पुन्हा मनोज निकम, त्याच्या आई-वडिलांनी सुरुवातीला योजनेमध्ये गुंतवणूक करण्यासाठी दीड लाख, नंतर मनोज याने सोन्याची चैन, या सोबतच वारंवार मागणी केल्यानंतर १० हजार, २० हजार, ५० हजार रुपये महिलेने तरुणाला दिले. नोव्हेंबर २०२२ मध्ये लग्नासाठी दागिने घ्यायचे असल्याने तरुणाच्या आई-वडिलांनी महिलेकडून एक लाख, घरासाठी ४० लाख, तरुणाच्या बहिणीच्या लग्नासाठी १० लाख, मालमत्ता घेण्यासाठी ४८ लाख, पाच लाख, दुकान घेण्यासाठी ३५ लाख असे वेगवेगळे कारण सांगत तिघांनी वेळोवेळी सदर महिलेकडून १ कोटी २० लाख रुपये घेतले.
रक्कम परत मिळाली नाही व लग्नाचे अमिष दाखवून फसवणूक झाल्याने सदर महिलेने जळगाव शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून मनोज निकम, त्याचे वडील दादाभाऊ निकम, आई उषाबाई निकम या तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास दीपक सुरवडकर करीत आहेत.
















