चोपडा (प्रतिनिधी) चोपडा बस स्थानकात चोपडा ते गणपुर जाणाऱ्या बसमध्ये चढताना अज्ञात चोरट्याने एका वृद्ध महिलेच्या गळ्यातील ५७ हजार रुपये किंमतीचे मंगळसूत्र लांबवल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सिंधुबाई छगन पाटील (वय ७५, रा. गणपुर ता.चोपडा) ह्या दि. २८ रोजी (शनिवार) दुपारी साडेबाराच्या सुमारास घरी जाण्यासाठी बसची वाट पाहत थांबल्या होत्या. चोपडा ते गणपुर जाणारी बस आल्यावर बसमध्ये चढणाऱ्या प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरटयाने सिंधुबाई यांच्या गळ्यातील ५७ हजार रुपये किंमतीचे १९ ग्रॅम वजनाची सोन्याची मंगळसूत्र पोत लांबवली. मंगळसूत्र पोतमध्ये ८ ग्रॅम वजनाचे मणी, ८ ग्रॅम वजनाच्या पतक्या, २.५ ग्रॅमचे राम पदक, अर्धा ग्रॅमचे २ मणी होते. दरम्यान, या प्रकरणी अज्ञात चोरट्यांविरुद्ध चोपडा शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोहेकॉ हरिषचंद्र पवार हे करीत आहेत.