जळगाव (प्रतिनिधी) जिल्हा प्रशासनाकडून प्राप्त झालेल्या अहवालानुसार जिल्ह्यात आज ६०५ कोरोनाबाधित रुग्ण नव्याने आढळून आले आहेत. तर दुसरीकडे ३०३ रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली असून आज पाच रुग्णाचा मृत्यू झाला आहे.
जळगाव शहर – २०५, जळगाव ग्रामीण-०६, भुसावळ- ५३, अमळनेर- १७, चोपडा-४५, पाचोरा-००, भडगाव-१७, धरणगाव-५२, यावल-१५, एरंडोल-३०, जामनेर-१८, रावेर-०७, पारोळा-२८, चाळीसगाव-७९, मुक्ताईनगर-२४, बोदवड-०१, इतर जिल्ह्यातील-०८ असे एकुण ६०५ रूग्ण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत रुग्णांची एकुण संख्या ६५ हजार ७४३ पर्यंत पोहचली असून ५९ हजार १३९ रूग्ण बरे होवून घरी परतले आहेत. तर आज पाच रुग्णाचा मृत्यू झाला आहे. त्यानुसार आतापर्यंत १४१५ रुग्णांचे मृत्यू झाले आहेत. तर ५१८९ रुग्ण सध्या उपचार घेताय.















