यावल (प्रतिनिधी) तालुक्यातील एका गावात अल्पवयीन तरुणीचा विनयभंग केल्याप्रकरणी बाप-लेकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ऋषिकेश गोपाल पाटील, गोपाल भास्कर पाटील (रा. चिखली बु. ता. यावल) असे संशयित आरोपींचे नाव आहे.
या संदर्भात अधिक असे की, २४ फेब्रुवारी रोजी ११वाजेच्या पिडीत तरुणी आपल्या घरासास्मोर उभी होती. याचवेळी मागील भाडणाच्या कारणावरून ऋषीकेश गोपाल पाटील व त्याचे वडील गोपाल भस्कर पाटील यांनी पिडीत तरुणीसह तिच्या आईला चापटा बुक्कयांनी मारहाण केली. तसेच लज्जा वाटेल असे कृत्य केले. या प्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहा. पोलीस निरीक्षक सिध्देश्वर आखेगावकर हे करीत आहे.