जळगाव (प्रतिनिधी) होय, मला ईडीची नोटीस मिळाली अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी दिली. दरम्यान, काल खडसे यांनी अद्याप मला ईडीची नोटीस मिळाली नसल्याचे सांगितले होते.
एकनाथराव खडसे यांना ईडीने नोटीस पाठवल्याची बातमी शुक्रवारी रात्री समोर आली होती. ईडीची नोटीस आल्यानंतर मला महाराष्ट्रातून फोन येत आहेत. मला सहानुभूतीच मिळत आहे. लोकांना हे आवडत नाही, असेही खडसे म्हणाले. ईडीची नोटीस आल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रभरातून मला जे फोन येत आहे त्यातून सहानुभूती व्यक्त केली जात आहे. लोकांना असं वाटते की हा एक प्रकारचा माझ्यावर अन्याय आहे. वारंवार चौकशा लोकांना आवडलेल्या दिसत नाहीत, असेही खडसे म्हणाले. ईडी खडसे यांना ३० डिसेंबरला चौकशीसाठी बोलावले आहे.