चोपडा (प्रतिनिधी) येथील आनंद निरामय योग व रोटरी क्लब चोपडा यांच्या संयुक्त विद्यमाने दहाव्या आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधून तीन दिवसीय योग शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराचा प्रारंभ करण्यात आला असून पुढील तीन दिवस हे शिबिर दररोज सकाळी सहा ते सात या वेळेत आनंदराज पॅलेस या ठिकाणी संपन्न होणार आहे.
उद्घाटन सत्रात योगशिक्षिका सौ. सपना निर्मल टाटिया यांच्या मार्गदर्शनाखाली व मनीषा पाटील, सीमा पाटील, मीनाक्षी पाटील, सारिका चौधरी यांच्या सहकार्याने योग साधकांनी योगाचे धडे गिरविले. शरीराच्या व्याधी आणि मनाची शुद्धता करण्यासाठी योग आवश्यक असल्याचे सांगत सौ सपना टाटिया यांनी विविध आसने करवून घेत त्यांचे जीवनातील महत्त्व सांगितले. यावेळी रोटरी क्लबचे अध्यक्ष रोटे. चेतन टाटिया यांनी सौ. सपना टाटिया यांचे स्वागत केले, मनीषा पाटील यांनी मनोगते व्यक्त करून नियमित योगसाधनेचे झालेले फायदे सांगितले. या शिबिरास रोटरी क्लबचे मानस सचिव रोटे. अर्पित अग्रवाल, प्रकल्प प्रमुख रोटे, सुरेखा मिस्त्री, सदस्य विपुल छाजेड, संजय बारी, राहुल राखेचा,यांच्यासह महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.