मुंबई (वृत्तसंस्था) सातव्या आंतरराष्ट्रीय योग दिवसाच्या निमित्तानं संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जनतेला शुभेच्छा दिल्या. प्रत्येक देश, प्रत्येक समाज आणि प्रत्येक व्यक्ती स्वस्थ असावा, अशी कामना या दिवसाच्या निमित्तानं पंतप्रधानांनी केली. कोरोना विरुद्धच्या लढाईत योगचा महत्त्वाचा वाटा आहे. प्राणायाम, योग केल्यानं प्रतिकारक शक्ती वाढत असल्याचंही मोदी यांनी सांगितलं आहे.
कोरोनामुळे सध्या ऑनलाइन शाळा सुरू आहेत. क्लास सुरू होण्याआधी अनेक शिक्षक मुलांकडून १५ मिनिटं योग करून घेतात त्यामुळे मुलांची प्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते. कोरोना विरूद्धच्या लढाईत हा खूप चांगला उपक्रम असल्यांचही पंतप्रधान मोदी म्हणाले.
पंतप्रधान मोदींच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे
– कोरोना काळात जनतेला योगचं महत्त्व कळलं
– अनेक डॉक्टर्स आणि कर्मचाऱ्यांनी योग केला.
– नकारात्मकतेकडून योग आपल्याला क्रिएटिव्हिचा रस्ता दाखवतं.
-रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी योग खूप महत्त्वाचा
-कोरोना काळात वैद्यकीय उपचारांसह योगही तितकाच महत्त्वाचा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत दिल्लीत योग दिन संपन्न होत आहे. आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त पंतप्रधान मोदी देशवासीयांना मार्गदर्शन केलं. उत्तम आरोग्यासाठी योग ही यंदाच्या योग दिनाची संकल्पना आहे. शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी योगसाधनेचा अवलंब करण्यावर यंदा भर दिला जाणार आहे.
मी जेव्हा कोरोना योद्ध्यांशी, डॉक्टरांशी चर्चा करतो तेव्हा तेही हेच सांगतात की त्यांनी कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी योगालाच आपलं सुरक्षा कवच बनवलं आहे. डॉक्टरांनीही योगाच्या माध्यमातून स्वत:ला मजबूत केलंय. तसंच आपल्या रुग्णांना लवकरात लवकर बरं करण्यासाठी याचा वापर केला. आज रुग्णालयांतूनही डॉक्टर आणि नर्सेस रुग्णांना योग शिकवत असल्याचे फोटो समोर येतात. प्राणाया, अनुलोम विलोम यांसारख्या श्वसन व्यायामांनी आपल्या श्वसन यंत्रणेला किती फायदा मिळतो, हे जगभरातील तज्ज्ञ स्वत: सांगतात, असं म्हणत मोदींनी यावेळी योगाचे फायदेही नमूद केले.